‘जुळ्यांची’ ऑनलाईन शाळा
जुळ्यांना वाढवताना एक मंत्र मी कायम जपलाय, तो म्हणजे त्यांना स्वयंभू बनवणं! आणि यापूर्वी देखील इतर मुलांकडे बघताना हे असंच असंलं पाहिजे हे नेहमी वाटायचं. […]
शैक्षणिक
जुळ्यांना वाढवताना एक मंत्र मी कायम जपलाय, तो म्हणजे त्यांना स्वयंभू बनवणं! आणि यापूर्वी देखील इतर मुलांकडे बघताना हे असंच असंलं पाहिजे हे नेहमी वाटायचं. […]
… अशा एक ना अनेक प्रश्नांना आम्ही जुळ्यांचे आईवडील सामोरे जात असतो. ओह! तुमचेही हेच प्रश्न आहेत का? तर मग तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं घेऊन येत आहोत आम्ही.. या नव्या मालिकेत.. ‘जुळ्यांना वाढवताना..’ […]
डॉ. डॅनिएल मॅन्सफिल्ड यांचं हे सर्व संशोधन, भूमिती-त्रिकोणमिती या गणिती शाखांचा उपयोग ग्रीकांच्या कित्येक शतकं अगोदर बॅबिलोनिआत केला जात असल्याचं स्पष्ट करतं. पाटीवरची ही आकृती, उपयोजित गणिताकडून शुद्ध गणिताकडे होणारी वाटचाल दाखवते. […]
जुडिथ क्लॅट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयोगांनुसार हा सोळा तासांचा कालावधी, जीवाणूंकडून होणाऱ्या प्राणवायूच्या निर्मितीच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला होता. दिवसाचा कालावधी सोळा तासांपर्यंत पोचल्यानंतर, जीवाणूंकडून होणारी प्राणवायूची निर्मिती वाढून वातावरणातल्या प्राणवायूचं प्रमाण वाढू लागलं. […]
बर्फाच्या वितळण्याची भाकितं करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीतली अडचण ही आहे की, समुद्रावरच्या बर्फाचं प्रमाण हे अनेक घटकांवर अवलंबून असतं – वातावरणातल्या घटकांवर तसंच समुद्राच्या पाण्यातल्या घटकांवर! त्यामुळे या प्रारूपांची अचूकता ही काहीशी मर्यादितच असते. […]
शनीला घन स्वरूपाचा पृष्ठभाग नाही. तरीही या संशोधनामुळे, त्याच्या गाभ्याच्या रचनेची माहिती करून घेणं, हे शक्य झालं. कारण क्रिस्टोफर मँकोविच आणि जीम फ्यूलर यांनी शनीच्या कड्यांनाच प्रचंड ‘भूलहरीमापक यंत्रा’चं स्वरूप दिलं आहे. या संशोधनातून शनीचा गाभा आगळा-वेगळा असल्याचं दिसून आलं. […]
२९ घटना समुद्राच्या पातळीतील मोठ्या बदलांच्या, १२ घटना सागरी जीवसृष्टीच्या नाशाच्या, ९ घटना जमिनीवरील जीवसृष्टीच्या नाशाच्या, १३ घटना ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या, १० घटना समुद्राच्या पाण्यातील प्राणवायूचं प्रमाण कमी होण्याच्या, ८ घटना समुद्राच्या तळाची जमीन दुभंगण्याच्या आणि ८ घटना या भूपट्टांच्या हालचालींशी संबंधित आहेत. […]
सध्या अनेक इंटरनॅशनल चेस ट्रैनिंग्ज ऑरगॅनिझशन व कंपन्याद्वारा ट्रैनिंग्ज प्लॅटफॉर्म विकसित करून ते संकेतस्थळा वर उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यामधे chess.com व lichess.org हे जगप्रसिद्ध संकेतस्थळ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. […]
दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अरसिबो दुर्बीण कोसळली… वेस्ट इंडिजच्या परिसरातील प्युर्तो रिको या बेटावर असलेली ही जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बीण कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून यापूर्वीच व्यक्त केली गेली होती! या दुर्बिणीच्या ३०५ मीटर व्यासाच्या तबकडीवरून परावर्तित होणारे रेडिओ किरण या तबकडीपासून सुमारे दीडशे मीटर उंचीवर असणाऱ्या साधनांद्वारे टिपले जात होते. ही साधनं […]
पावसाळी ढगांतील पाण्याचे थेंब हे विद्युतभारित असतात. किंबहुना, धूळ किंवा हवेतील तत्सम पदार्थांवरील विद्युतभार पावसाळी ढगांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतो. तसंच ढगातील पाण्याच्या थेंबांच्या आकारावरही या विद्युतभाराचा परिणाम होत असल्यानं, या विद्युतभारावर पावसाची तीव्रता अवलंबून असते. हवामानाचा अभ्यास करणारे संशोधक या विद्युतभाराचा आणि पावसाचा संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न पूर्वीपासून करीत आहेत. अलीकडेच केल्या गेलेल्या एका संशोधनासाठी, […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions