खरं काय अन् खोटं काय?
आपल्या ऐकण्यात व वाचण्यात पॉलीग्राफ, नार्को असे शब्द येत असतात. त्याची माहिती व्हावी हा या लेखामागचा उद्देश. […]
शैक्षणिक
आपल्या ऐकण्यात व वाचण्यात पॉलीग्राफ, नार्को असे शब्द येत असतात. त्याची माहिती व्हावी हा या लेखामागचा उद्देश. […]
आपल्याला सुपरिचित असलेलं एक पाश्चात्य वाद्य म्हणजे व्हायोलिन. या वाद्याला सतराव्या शतकाच्या अखेरीस आजचं आधुनिक रूप प्राप्त झालं. हे रूप प्राप्त करून दिलं ते अँटोनिओ स्ट्रॅडिवरी या सुप्रसिद्ध इटालिअन वाद्यनिर्मात्यानं. स्ट्रॅडिवरी यानं पारंपरिक व्हायोलिनच्या आकारात काही बदल करून या वाद्याला अधिक सुस्वर बनवलं. आजची व्हायोलिन ही या बदललेल्या रूपानुसार तयार केली जातात. ही आजची व्हायोलिन जरी […]
केळ्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न बराच पूर्वीपासून सुरू आहे. लागवड केली जाणारी आजची केळी ही केळ्यांच्याच विविध जाती-उपजातींत झालेल्या संकरातून निर्माण झाली आहेत. आजच्या मुसा अॅक्युमिनाटापासून निर्माण झालेल्या केळ्यांत, या जातीच्या जनुकांबरोबरच इतर काही जंगली केळ्यांतील जनुकही अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे. […]
अंटार्क्टिका खंडावरच्या जमिनीचा मोठा भाग बर्फानं व्यापला आहे. या बर्फाच्या थराखाली पाण्याचे अनेक ‘तलाव’ अस्तित्वात असल्याचं, यापूर्वीच्या संशोधनातून दिसून आलं आहे. हे तलाव बर्फाच्या तळाशी, पृष्ठभागापासून दोन ते चार किलोमीटर खोलीवर वसले आहेत. यातले काही तलाव एकमेकांना जोडले आहेत. […]
– सागरतळावरचं व्ही-१३०२ जहाज…(Image credit: Frontiers in Marine Science) इंग्लंडच्या पूर्वेला असणारा ‘नॉर्थ सी’ हा समुद्र पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत होता. इंग्लड, फ्रान्स, बेल्जिअम, नेदरलँड्स, जर्मनी आणि डेन्मार्क या देशांना चिकटून वसलेल्या या समुद्रातून, महायुद्धांच्या काळात मोठ्या प्रमाणात युद्धनौकांचा संचार होत असे. युद्धाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील झालेल्या या प्रदेशात, दोन्ही महायुद्धांदरम्यान शेकडो […]
दक्षिण आफ्रिकेतल्या फ्री स्टेट इलाख्यात व्रेडफोर्ट नावाचं एक लहानसं शहर आहे. या शहराचं वैशिष्ट्य हे आहे की, हे शहर एका विवरात वसलं आहे. व्रेडफोर्टचा परिसर हा डोंगराळ भाग आहे. हा डोंगराळ भाग प्रत्यक्षात, प्राचीन काळातल्या एखाद्या ज्वालामुखीचे अवशेष असल्याची शक्यता पूर्वी व्यक्त केली गेली होती. परंतु व्रेडफोर्टचा हा परिसर म्हणजे अशनीच्या आघातामुळे निर्माण झालेलं एक विवर […]
गणपतीला ‘नवीन आरंभाची देवता’ म्हणून ओळखले जाते आणि हे आपल्याला आठवण करून देते की कोणत्याही प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग प्रथम सुरू करणे आहे. म्हणूनच लोक सहसा ‘श्री गणेशा करूया’ असे म्हणतात ज्याचा अर्थ ‘चला सुरू करा’ असा होतो. इथेच आम्ही आमचा पहिला धडा शिकतो की जेव्हा पैसे कमवायचे असतात तेव्हा तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याचे पहिले पाऊल उचलले पाहिजे […]
आजचा माणूस सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे तो दोन पायांवर चालू शकत होता. पण तेव्हा माणूस हाच फक्त काही द्विपाद प्राणी नव्हता. माणूस जन्माला येण्याच्या सुमारे एक लाख वर्षं अगोदर जन्माला आलेल्या निअँडरटालसारखे, माणसाचे इतर भाऊबंदसुद्धा दोन पायांवर चालू शकत होते. इतकंच काय, पण त्या अगोदर चाळीस लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या […]
गेलं हिमयुग हे सुमारे एक लाख वर्षांपूर्वी सुरू झालं आणि बारा हजार वर्षांपूर्वी संपुष्टात आलं. या हिमयुगाची कमाल शीतावस्था वीस-एकवीस हजार वर्षांपूर्वी होऊन गेल्याचं, विविध पुराव्यांद्वारे दिसून आलं आहे. या कमाल शीतावस्थेच्या काळात पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं सरासरी तापमान हे, आजच्या सुमारे पंधरा अंश सेल्सिअस या सरासरी तापमानापेक्षा सुमारे सात अंश सेल्सिअसनं कमी होतं. पृथ्वीवरचं त्याकाळातलं पृष्ठभागावरचं तापमान […]
पृथ्वीवरील सजीव आणि वनस्पती यांच्यात, सध्याच्या वेगानं संकर होत राहिला तर कदाचित, हजारो वर्षानंतर, अेकच संमिश्र किंवा संकरीत प्रजाती अस्तित्त्वात राहतील. मानवाच्या बाबतीत, सर्व मानववंशात संकर होअून, कदाचित अेकमेव वंश निर्माण होण्याची शक्यता आहे. कसा असेल तो मानव? त्या संमिश्र प्रजाती? पण तोच खरा `पृथ्वीमानव` असेल आणि पृथ्वीवरील त्याच पृथ्वीप्रजाती असतील. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions