नवीन लेखन...

शैक्षणिक

वार्धक्य एक आनंदयात्रा

मूत्रपिंडांच्या धमन्यांत थर साचल्यास मूत्रपिंडाचे कार्य मंदावते. धमनीचित्रण करून स्टेण्ट टाकल्यावर (रक्तप्रवाह सुरळीत होऊन कार्य पूर्ववत चालू होते. मूत्रपिंडे बिघडल्यास अपोहन (डायलिसीस) व शेवटी प्रतिरोपणाचा पर्याय असतो. शरीरातील स्नायू ताठरतात व हालचालींचा वेग मंदावतो. सांधेपण आखडतात व दुखतात. व्यायामाने स्नायू व सांधे सुटतात म्हणून व्यायाम महत्त्वाचा. जवळचे बघायला चाळीशीनंतर त्रास होतो. चष्म्याने दृष्टी सुधारते; पण तो […]

कर्करोगाची लक्षणे

कर्करोग हा छुपा रोग आहे. त्याच्या पेशींची वाढ होऊन कर्करोगाची गाठ तयार होण्यास कित्येक वर्षे लागतात. या अतिपूर्व स्थितीत माणसाला कोणताही त्रास जाणवत नाही; परंतु एक दिवस त्याला शारीरिक अडचण जाणवते व डॉक्टरांकडे जावे लागते. कर्करोगाच्या पूर्वस्थितीत कर्करोगांच्या पेशींची थोडीफार वाढ तयार झाल्यानंतरच हा रोग त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. त्यामुळे कर्करोग झाला आहे किंवा तो […]

नॅटुफिअन बासऱ्या

वाद्यांना विविध मानवी संस्कृतींत महत्त्वाचं स्थान आहे. वाद्यांचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो – करमणूक म्हणून, संदेश पाठवण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी, वगैरे. वाद्यांचा असा उपयोग आजच नव्हे, तर प्राचीन काळीही केला जात असे. त्यामुळे प्राचीन काळी कोणत्या संस्कृतींत कोणती वाद्यं वापरात होती, हा अभ्यासकांच्या दृष्टीनं एक उत्सुकतेचा विषय आहे. […]

कर्करोग व आनुवंशिकता

कर्करोग हा साथीच्या रोगांसारखा किंवा सर्दी-पडशासारखा सर्वांना होणारा रोग नसल्याने तो क्वचितच एखाद्यास होतो; पण कधी कधी एखाद्या कुटुंबातील एकाच पिढीतील किंवा वेगवेगळ्या पिढीतील नातेवाईकांना कर्करोग झाला असल्याचे दिसून येते. आई-वडिलांकडून मिळालेल्या जनुकांच्या वारशामुळे सिस्टीक फायब्रोसीस, सिकल सेल अॅनिमिया यासारखे रोग होतात. कर्करोग मात्र आनुवंशिक नसून, मुख्यत्वे माणसाच्या जीवनशैलीमुळे होतो, असे दिसून येते. त्यामुळे प्रश्न पडतो, […]

वंध्यत्व – भाग पहिला

एखाद्या वैवाहिक जोडप्याला एकत्र नांदूनही २ वर्षांत मूल न होणे याला वंध्यत्व म्हणतात. या जोडप्यात पत्नीचे वय ३५ वर्षांखालील असणे आवश्यक असते कारण नंतर स्त्रीबीजाचा दर्जा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे फलनाची क्रिया खालावू शकते. लग्नानंतरच्या दोन वर्षांत या जोडप्याने मूल होऊ न देण्यासाठी कोठचेही कुटुंबनियोजनाचे उपाय मात्र अमलात आणलेले नसावेत. कधी कधी गर्भधारणा होऊन नंतर […]

मलेरिया : प्रतिबंधात्मक उपाययोजना – २

डासांच्या दंशाचा प्रतिबंध करण्यासाठी झोपताना अंगभर कपडे घालावे, उघड्यावर झोपू नये. शक्यतो कीटकनाशक द्रव्यात बुडवून मग सावलीत वाळविलेल्या मच्छरदाण्या वापराव्यात. सुतापेक्षा नॉयलॉन टिकते व त्यावर कीटकनाशकही टिकते त्यामुळे नॉयलॉन मच्छरदाण्या जास्त चांगल्या. कीटकनाशक मच्छरदाण्या न धुता ६ महिन्यांपर्यंत वापरू शकतो. नंतर पुन्हा त्या कीटकनाशक द्रव्यात बुडवून ठेवून सावलीत वाळत घालून वापरता येतात. मच्छरदाणी शक्यतो पांढरी असावी […]

मलेरिया : प्रतिबंधात्मक उपाययोजना – १

मलेरिया (हिवताप) या रोगाचा प्रतिबंध करणे हे आपल्यापुढे एक मोठे आव्हानच आहे. पावसाळ्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात ॲनोफिलिस डास हे मलेरियाच्या ‘जंतू वाहकाचे’ काम करीत असतात. मलेरिया हा अॅनोफिलीस डासाची मादी चावल्याने पसरणे. सरकारला डासांचे निर्मूलन करण्यात अपयश आले याचा आक्रोश केला जातो; परंतु सरकार बरोबरच डासांची उत्पत्ती रोखायची जबाबदारी आपण सर्वांची आहे. ॲनोफिलीस हा डास […]

लेप्टोस्पायरोसीस (भाग २)

सेप्टिसेमिक सेजच्या या पहिल्या टप्प्याच्या आजारानंतर ‘इम्युन फेज’ची सुरुवात होऊ शकते. हा टप्पा आपल्या शरीराच्याच प्रतिकारशक्ती प्रणालीमुळे (इम्युन मिडियेटेड) होणाऱ्या अवयवांच्या हानीमुळे होतो. यकृताला सूज येऊन कावीळ होऊ शकते किंवा यकृत काही प्रमाणात निकामी होऊ शकते. मूत्रपिंडाचे कामही कमी होऊ शकते. मेंदूला सूज येऊन मेनिंजायटीस किंवा मस्तिष्कदाह होऊ शकतो. फुप्फुसाला इजा होऊन (एआरडीएस) ही अतिउग्र परिस्थिती […]

लेप्टोस्पायरोसीस (भाग १)

गेल्या काही वर्षांत लेप्टोस्पायरोसीस या आजाराने पावसाळ्यात अनेक बळी घेतल्याचे आपण वाचले असेल. हा आजार नेमका कशामुळे व कसा होतो हे आज आपण थोडे समजून घेऊ या. या आजाराचा पहिला उल्लेख एडॉल्फ विल यांनी सन १८८६ मध्ये केला होता, म्हणून याला ‘विल्स डिसीज’ असेही म्हणतात. लेप्टोस्पायरोसीस हा आजार लेप्टोस्पायरा जातीच्या स्पायरोकीट या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूच्या […]

मधुमेहींसाठी आहारनियमन

हल्ली समाजात डायबिटीस झालेल्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आढळतात. तरीही कोणतीही व्याधी किंवा आजार हा आपल्याला होणारच नाही, अशी समजूत बऱ्याच जणांची असते; परंतु एकदा का एखाद्या आजाराचं निदान झालं, विशेषतः डायबिटीसच, की अशी मंडळी घाबरून जातात. एकतर डायबिटीसमुळे शारीरिक तणाव असतोच शिवाय मानसिक तणावही येतो. अनेकदा लोकं गोंधळून जातात. आपण नक्की काय करावं, काय खावं, […]

1 30 31 32 33 34 155
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..