नवीन लेखन...

शैक्षणिक

जाहिरातींचे मायाजाल

जो खोटे बोलतो तो सर्वात मोठ्याने ओरडून सांगतो, हा मानसिकतेचा नियम आहे. चोवीस तास टीव्ही व रेडिओ वर साबण, तेल, सुंदर दिसण्याची क्रीम, शीतपेय, टूथपेस्ट, यांच्या हास्यास्पद जाहिराती आपल्याला दाखवतात यातून आम्ही काय बोध घ्यावा हेच समजत नाही. आजकाल हिंदी चित्रपटातील हिरो शितपेयातील जाहिरातीत सुपरमॅन सुद्धा न करू शकणारे स्टंट करून दाखवतात व शेवटी शीतपेय पिताना […]

आज १८ मार्च – जागतिक निद्रा दिवस

दरवर्षी १८ मार्च हा दिवस ‘जागतिक निद्रा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी निद्रेविषयी आजारांची जनजागृती करण्यात येते. झोप न लागणे हा आजार आहे, याविषयी सामान्य जनता अनभिज्ञच आहे. त्यामुळे झोप न येणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एकचतुर्थांश व्यक्तीच झोप येत नसल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. सर्व शारीरिक क्रियांप्रमाणेच झोप ही क्रियादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेमुळे […]

शोध – यशाचा

“यश हा एक प्रवास आहे. ते केवळ अंतिम ठिकाण किंवा साध्य नव्हे.” – बेन स्वीटलँड, लेखक “यश म्हणजे काय? मला वाटतं यश हे अनेक विचारांचं अजब मिश्रण असतं. तुम्ही जे करताय, तेवढंच पुरेसं नाही, तुम्हाला आणखी कष्ट करायला हवेत आणि या सगळ्यात काहीतरी प्रयोजनही नक्की हवं. यश या साऱ्या विचारातून घडत जातं.” – मार्गारेट थॅचर, ब्रिटनच्या […]

खेळ आकड्यांच्या

• महाराष्ट्राचा अर्थसंकल्प १८ मार्च रोजी मांडला जाणार आहे. • दरडोई उत्पन्न आणि मानव विकास निर्देशांक यांच्या बाबतीतही महाराष्ट्राचा देशात अनुक्रमे तिसरा आणि सातवा क्रमांक लागतो. • गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सरासरी १० टक्क्यांनी वाढते आहे. सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्राचे सकल राज्य उत्पन्न मागील वर्षांपेक्षा १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, तर सन २०१५-१६ मध्ये हीच […]

ताण परीक्षांच्या तयारीचा

ताणावर उपाय काय? *अभ्यासाचे वेळापत्रक बनवा, वेळेचा अपव्यय टाळा *ताण आल्यासारखे वाटेल तेव्हा खोल श्वास घ्या *नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक बाजूला सारून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा *रोज थोडा वेळ व्यायाम करा *ताण घालवण्यासाठी थोडा वेळ विनोद किंवा गाणी ऐका *बागेत फेरफटका मारून या *मित्र-मैत्रिणींबरोबर थोडा वेळ गप्पा मागल्यानेही मनावरचा ताण कमी होईल. या गप्पांत एकमेकांशी तुलना […]

मिठास जागा, मिठावर जगू नका

श्रीकृष्ण रुक्मिणी एकांतात गप्पा छाटत होते, अचानक रुक्मिणी लाडात येऊन म्हणाली, मी तुम्हाला कशी आहे असे वाटते. श्रीकृष्ण स्मित हास्य करून म्हणाले, रुक्मिणी काय सांगू तुला, तुझे महत्व माझ्यासाठी अनमोल आहे, तू अगदी मिठासारखी आहेस. का………..य, मी मिठासारखी खारट वाटते तुम्हाला, आणि मुसमुसून रडायला सुरवात झाली. श्रीकृष्ण तिला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण रुक्मिणी काही […]

अन्न शिजवताना भांडे कोणते वापरावे ?

अन्न शिजवताना जे भांडे वापरले जाते, त्या भांड्याचे गुण अन्नामधे उतरतात. पूर्वीची भांडी तांब्यापितळीची होती. त्याला कल्हई लावली जाई. कल्हई म्हणजे झिंक / जस्त. या कल्हई केलेल्या भांड्यात जेव्हा फोडणी दिली जाई किंवा डाळ शिजवली जाई, तेव्हा शिजत असलेल्या अन्नात आपोआपच जस्ताचा सूक्ष्म अंश जात होता. शिवाय तांब्यापितळीचे औषधी गुणपण मिळत होते. आजचे संशोधन असे सांगते, […]

सू-अभूतपूर्व लोकलढा

म्यानमार (वर्मा) मधील असंख्य आबालवृद्धांची ही अजूनही ‘शान’ आहे.त्यामुळेच तेथील युवक-युवतींच्या टी शर्टवर तिचे छायाच असते, तसेच इतर जीवनोपयोगी वस्तूंवरही तिच्या छायाचित्रांचे दर्शन होते. कारण एकच म्यानमारमधील जुलमी राजवटीविरुद्ध तिने सुरू केलेला संघर्ष. या संघर्षाला तेथील जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिला होता. या शांततापूर्ण चळवळीबद्दलच तिला १९११ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. त्या महिलेचे नाव […]

पृथ्वीचं पुस्तक

आपली पृथ्वी कधी निर्माण झाली? तिच्यात कोणकोणती स्थित्यंतरं घडली? तिचं आणि तिच्यावर राहणार्या सजीवांचं अस्तित्व किती काळ टिकणार आहे? आणि शेवटी पृथ्वीचा अंत कधीकाळी आणि कशारितीनं होणार आहे? हे प्रश्न, मानव विचार करू लागला तेव्हापासूनच त्याला सतावीत आहेत आणि तो या प्रश्नांची अुत्तरंही तेव्हापासूनच शोधतो आहे. […]

1 148 149 150 151 152 168
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..