नवीन लेखन...

शैक्षणिक

प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती

शाळेच्या वयापासूनच आपण गणित आणि भूमिती हे विषय म्हटले की थोडा धसकाच घेतो, नाही का? काही जणांना गणिताची मुळात आवड असते पण काही मात्र त्याकडे रुक्ष विषय, आकडेमोड म्हणूनच पाहतात. पण भारतीय व्यवहारात आणि इतिहासात गणिताची सुरुवात आणि रुजवात कशी झाली हे समजून घेण मात्र तितकच रंजक आहे बर का! हा विषय तसा विस्ताराने मांडण्याचा आहे. पण वाचकांची उत्सुकता वाढवून त्यांना या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि त्यासाठी किमान काही प्राथमिक माहिती हाती असावी इतकाच या लेखाचा मर्यादित उद्देश आहे. […]

शिक्षक दिन

पूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यांच्यात खूप तफावत दिसून येते. अहो म्हणजे पूर्वीचे शिक्षक मजा घेत शिकवत. आताच्या शिक्षकांना प्रचंड तणावाखाली वावरायला लागतं. त्यामागची कारणंही तशीच आहेत म्हणा. पूर्वी पालकच शिक्षकांना पूर्ण मुभा देत असत की , तुम्हाला वाटेल ते करा ठोका , मारा पण आमच्या मडक्याला घडवा , पण आता जरा जरी शिक्षक ओरडले तरी किंवा फटकावलं तर लगेच पालक असे व्यक्त होतात की जणूकाही शिक्षकांनी जीव घ्यायचाच बाकी ठेवला आहे. […]

सर्वोत्तम व्हा, सर्वोत्तम द्या

खरे तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना हे असे चार रस्ते क्षणोक्षणी एकत्र येतात. छोटे मोठे निर्णय हे सतत घ्यावे लागतात. गुगल मॅप सारखे सतत कुणीतरी सोबत असतेच असं नाही. आणि कुणी असे असलेच सोबत तर कधी कधी त्या सिग्नल नसलेल्या मोबाईल सारखी अवस्था होऊ शकते की! अशावेळी निर्णय हा स्वतःलाच घ्यावा लागतो. […]

शिकाल तर टिकाल!

आज येऊ घातलेली मंदी, नोकऱ्यावर येणाऱ्या गदा या सगळ्याचा विचार केला तर ही परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे. येत्या काही वर्षात मुलांनी उच्चशिक्षणाची वाट न धरता लवकरात लवकर नोकरी कशी करता येईल असा विचार करायला सुरुवात केली तर याचे परिणाम खोलवर जाणवतील हे नक्की! […]

पैशाची चणचण आपल्या मुलीच्या शिक्षणाच्या आड येऊ देऊ नका!

या लेखाद्वारे, मुलींसाठीच्या खास अशा एका संधीची ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या संधीचा आपण लाभ घेतलात तर जवळ जवळ शून्य खर्चात आपली मुलगी डिप्लोमा इंजिनिअर बनू शकते आणि नुसते डिप्लोमाचे प्रमाणपत्रच नाही तर कोर्स संपल्यावर तिच्याकडे एका वर्षांचा इंडस्ट्री मधील कामाचा अनुभव देखील असेल ज्याच्या जोरावर तिला नोकरी मिळविण्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत! […]

शिक्षक पात्रता परीक्षा आणि वस्तुस्थिती

सर्व प्रकारची शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता धारण केलेल्या बेरोजगारांची शिक्षकभरती आणि प्राध्यापक भरतीसाठी चाललेली आरडाओरड कोणत्याही राज्यकर्त्यांना दिसून येत नाही. किंबहुना दिसत असली तरी राजकीय स्वार्थासाठी कायम दुर्लक्ष करणे यातच हीत मानले जाते. फक्त आश्वासनाचे पीक घेणारे थोडा दिलासा देऊन जातात, मग मात्र सब घोडे बारा टक्के. […]

मार्कांचा महापूर…!

दहावीच्या परीक्षेत 83000+ विद्यार्थ्यांना मिळालेल्या 90% पेक्षा अधिक मार्कांची कारणमीमांसा आणि त्याचे असंभाव्य परिणाम…! […]

सोळाव वरीस धोक्याच

सोळावे वर्ष हे असे वर्षे असते जिथे विद्यार्थ्यांच्या मन आणि शरीरात अमुलाग्र बदल होत असतात. सोळावे वर्ष हे आपण तारुण्याच्या पदार्पनाचे वर्ष मानतोत. शाळेच्या कडक शिस्ती मधून विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या मुक्त जीवनामध्ये प्रवेश केलेला असतो. जिथे बारावीला उत्तम मार्क घेऊन पुढील आयुष्याच्या दिशा ठरवायच्या असतात त्याच क्षणी या वयात विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी भुरळ घालण्याचा प्रयत्न करत असतात. […]

हिंदी भाषा – इतिहास, भूगोल आणि अंकगणित

नागपूरातील कोणतीही मराठी व्यक्ती घराच्या बाहेर पाऊल टाकल्या हिंदीमध्ये बोलचाल सुरू करते मग समोरची ब्यक्ती मराठी पानवाला, रिक्षावाला, भाजीवाला किंवा चहावाला का असेना. कारण त्याच्या रक्तातच हिंदी असते. त्याचेसाठी वर्षाचा प्रत्येक दिवसच राष्ट्रभाषा दिवस असतो. याच्याविरुध्द परिस्थिती म्हणजे ७० ते ८० वर्ष नागपूरात वास्तव्य करणारे अमराठी. ते कधीही मराठी बोलण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करणार नाहीत, मराठी बातम्या ऐकणे तर दूरच. कारण नागपूरचे मराठी लोक त्यांच्याशी हिंदीतच बोलतात. भारताच्या कोणत्याही शहरात हे दृष्य तुम्हाला दिसणार नाही. […]

वनसंवर्धन दिन

आज दिनांक २३ जुलै. आज वनसंवर्धन दिन साजरा केला जातो. मंडळी नावातच हा दिन का साजरा केला जातो ह्याचा एक अंदाज आपल्याला येतो. आपण नेहमी ऐकतो की निसर्ग आपला मित्र आहे. खरोखरच हे वाक्य अगदी सत्य आहे. अगदी जगद्गुरू संत तुकोबारायांनीही त्यांच्या अभंगात वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे असे सांगितलं आहे. […]

1 106 107 108 109 110 168
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..