जुन्या मराठी पंगतीतील श्लोक आणि मजेदार गाणी ( भाग २ )
महाराष्ट्रामध्ये विविध कारणांसाठी एकत्र जेवणावळींची खूप जुनी प्रथा आणि जेवण सुरु असतांना देवाचे आणि सुसंगत विषयांवरील संस्कृत किंवा मराठी श्लोक म्हणणे, त्यातील वैविध्य याबद्दल मी या आधीच्या भागात लिहिलेले आपण वाचले असेलच. तेथे म्हटला जाणारा अर्ज आपण पहिला तशी एक निमंत्रण पत्रिका ( त्यावेळी कुंकुम पत्रिका, कुंकोत्री, कंकोत्री इत्यादी म्हटले जाई ) देखील असायची. चि. सौ. कां. जिलेबीबाई हिचा शुभविवाह चि. मठ्ठेराव यांचेशी …. इत्यादी […]
