नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

जुन्या मराठी पंगतीतील नैवेद्य आणि चित्राहुती मागील विज्ञान ! 

पूर्वी जेवणाची पंगत घरातील असो किंवा सार्वजनिक समारंभातील असो, त्याचे बरेचसे पैलू हे Eco friendly असत. जेवणासाठी पत्रावळ किंवा केळीचे पान वापरले जाई. पान वाढल्यावर नैवेद्य दाखवताना पानाभोवती दोनवेळा ( मंत्रांसह ) पाणी फिरवले जाई. ( पितृकार्यामध्ये पानाभोवती थोडेथोडे भस्म टाकले जाई ). काहीजण याबरोबरच आपल्या उजव्या हाताला, भाताच्या छोट्याछोट्या राशी, चित्राहुती म्हणून घालत असत. या ” शास्त्रा ” मागील ” शास्त्र आणि अन्य गोष्टी ” पाहू या. […]

मला कळलेले श्री गुरूदेव दत्त

‘डिजिटल’ हा शब्द आला, की त्याला जोडून ‘डाटा’ हा शब्द येतोच. ‘डिजिटल’ पद्धतीने साठा केलेल्या ज्ञानाला किंवा माहितीला ‘डाटा’ म्हणतात हे आता बहुतेक सर्वांनाच कळतं. ह्या ‘DATA’तच मला ‘DAT(T)A’ दिसतो. Data आणि Datta यातील साम्य मला हेच सांगते, की ‘दत्त’ म्हणजे ‘ज्ञान’..! […]

कीर्तनाची प्लास्टिक सर्जरी

शेगड्या, चुली जाऊन गॅस आला. बैलगाडी, घोडागाडी जाऊन बस रेल्वे विमानं आली. वायरचा फोन जाऊन मोबाईल आले, कॅसेट जाऊन CD आणि आता क्लाउड वरून डाउनलोड करणे सुरू झाले. इतके सारे बदल जवळजवळ दोन पिढ्यात आत्मसात झाले. मग असं असेल तर कीर्तन प्रवाचनांची आधुनिक काळाप्रमाणे प्लास्टिक सर्जरी करून आणि त्या नवीन रुपाला लोकमान्य करून सिनिअर सिटीझन क्लब मध्ये हळू हळू तरुण चेहरे दिसायला लागले तर ते भारतीय संस्कृतीसंवर्धनाच्या दृष्टीने चांगल ठरणार नाही का? […]

कुटुंब आणि आजची स्त्री

कुटुंब आणि आजची स्त्री या विषयावर लेख लिहिताना प्रथंम एक गोष्ट मला आवर्जून नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत एवढ्या त्या एकरुप झालेल्या आहे. कुटुंबाची व्याख्या एकवेळ पुरुषाशिवाय पुरी करता येईलही, परंतू स्त्रीशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही. माझे मालवणीतून अर्थवाही कविता करणारे मालवण स्थित कविमित्र श्री. विनय सौदागर यांनी […]

देवपूजा, अभिषेक आणि रिसायकलींग

एका देवळात एका रिसायकल होणार्‍या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !! […]

नमस्काराचे महत्व

जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. […]

शनिकथा व इतिहास

आपल्या दैनदिन जीवनात तेजपुंज आणि शक्तिशाली शनीचे आगळे वेगळे महत्व आहे. तसेच शनी सौर जगतातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे. याला ज्योतिष शास्त्रात अशुभ मानले जाते. आधुनिक खगोल शास्त्रानुसार शनीचे पृथ्वी पासूनचे अंतर जवळपास नऊ कोटी मैल आहे. याचा व्यास १ अब्ज ४२ कोटी ६० लाख किलोमीटर इतका आहे. […]

पद्मावती – भाग दोन आणि जास्त महत्वाचा

आज सकाळी मी पोस्ट केलेल्या ‘पद्मावती’ या लेखातील श्री. संजय लीला भन्सालींच्या वडीलांचा मी केलेला उल्लेख बहुसंख्यांना खटकला, हे चांगलं की वाईट हे नंतर ठरवू, पण माझ्या लेखातून माझ्याकडून ती चुक का ‘झाली’ हे सांगणं माझं कर्तव्य ठरतं. […]

पद्मावती

मला वाटतं, आपल्याला भन्सालींसारख्या नतद्रष्टांना धडा शिकवण्यासाठी, आपण त्यांच्या चित्रपटावर वा कलाकृतींवर अशी बंदीची मागणी न करता, असे चित्रपट आपण कोणी पाहायचेच नाहीत असं ठरवावं. लोकशाहीत कोणत्याही विषयावर चित्रपट काढायला किंवा भाष्य करायला बंदी नाही. याला अविष्कार स्वातंत्र्य असं म्हणतात. त्याच लोकशाहीत तो चित्रपट पाहायलाच हवा असंही बंधन नाही. मग आपल्या हातात हे घटनात्मक हत्यार असताना, आपण बंदीची मागणी का करतोय हे अनाकलनीय आहे. […]

करवा चौथ

दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात. […]

1 42 43 44 45 46 77
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..