नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

भक्त ध्रुव (अढळ ध्रुवतारा)

वंदीतो मी ध्रुवबाळ, भक्ति सामर्थ्याचे बळ, मिळवी पद अढळ विश्वामध्यें ।।१।। असोनी लहान बालक, वाकविले विश्वचालक, हेच तपाचे प्रतीक, प्रभूचे राज्यीं ।।२।। प्रभू प्राप्तीचे फळ, ह्यासी न लागे काळवेळ, श्रद्धा आणि तपोबल, अंतर्मनी पाहिजे ।।३।। ब्रह्माचा खेळ न्यारा, बहूत त्याच्या रंगधारा, समज न येई हा पसारा, प्रभूच्या लिलेचा ।।४।। खेळाच्या ठेवल्या मर्यादा, बसणे पळणे चालूं सदा, […]

श्री महाकवि वाल्मिकी

नमन माझे आद्यकवीला । रामायण ग्रंथ रचित्याला ।। प्रतिभावंत कवि अवतरला । ह्या जगती ।।१।। रामायणासारखा ग्रंथ । श्रेष्ठत्व मिळे ह्या जगांत ।। अप्रतीम ते काव्य होत । कवि श्री वाल्मिकीचे ।।२।। महाकवि वाल्मिकी । जीवन ज्याचे सार्थकीं ।। प्रभूचरणीं अर्पित मस्तकी । इतिहास घडविला ।।३।। सरस्वति प्रसन्न झाली । लेखणीतून अवतरली ।। महान काव्य रचना […]

सती सावित्री

( अर्थात वटपौर्णिमा व्रत )  स्त्री जातीचा मुकुटमणीं    महासती मान मिळोनी धन्य झाली जीवनीं    पतीव्रता सावित्री   //१// ब्रह्मा लिखित अटळ   ह्या सूत्रीं केला बदल हे तिच्या तपाचे फळ   सावित्रीने मिळविले   //२// जरी येतां काळ   चुकवावी वेळ बदलेल फळ    हेच दाखविले तीने   //३// समजण्या धर्म पतिव्रता   ऐकावी सावित्री कथा मनीं भाव भरुनी येतां   आदर वाटे तिच्या परीं   //४// […]

श्री नृसिंह अवतारकथा

प्रल्हादासी करितो नमन   बालक असुनी महान अणुरेणूंत असे भगवान   दाखवूनी देई जगाला   ।।१।। बघावी सृष्टी   ठेऊनी संत द्दष्टी त्यासी दिसेल जगत् जेठी   सर्व ठिकाणीं   ।।२।। प्रल्हादाचे तत्वज्ञान   प्रभुमय सारे जग् जीवन त्यासी घ्यावे ओळखून  श्रद्धा द्दष्टीनें   ।।३।। अपूर्व प्रभू भक्ति  उन्मत्त असूरी शक्ति संघर्षकथा होती   भक्त  प्रल्हादाची   ।।४।। बहूत महान वीर  प्रभुपुढे कोण टिकणार परि प्रभूसीच […]

श्री विठ्ठल अवतार

(श्री भक्त पुंडलीक कथा) श्री विठ्ठलाचे चरणीं   विनम्र होऊनी दर्शन घेई मागुनी    मी तुझा भक्त   १ पुंडलीकास देई दर्शन    नसूनी भक्ती तव चरण सेवा माता-पित्यांची करुनी    तुजसी पावन केले   २ सेवा आई-वडीलांची करीसी    परी प्रभू पावन झालासी ही भक्तिची रित कैसी    समज न येई कुणा   ३ तपाचे मार्ग वेगवेगळे    सर्व प्रभू चरणी मिळे हे कुणास न […]

श्री. गंगावतरण

श्री गंगामाई तूं माते । पावन करिसी सर्वाते ।। धुवूनी काढसी पापाते । तुझ्या स्पर्शाने ।। १।। जया होई गंगास्नान । जाईल तो उध्दरुन । गंगादेवी पतीत पावन । किर्ति असे तुझी ।।२।। कहानी ऐका गंगेची । पृथ्वीवरी अवतरण्याची ।। पराकाष्ठा केली प्रयत्नाची । भगीरथाने ।।३।। समुद्राचे झाले मंथन । अमृत निघाले त्यांतून ।। विष्णु कुंभ […]

।। श्री शंख जन्म कथा ।।

देव्हाऱ्यातील देव अनेक    शंख तयांमध्ये एक महत्त्व त्याचे जाणोनी ठीक     सकलजन हो ।। १।। हिंदूची दैवते अनेक     रूपे देवांची कित्येक इष्ट देवता पूजितो प्रत्येक     सर्व देवांमध्ये ।।२।। देव्हाऱ्यातील देवांत    शंखघंटा असावी त्यांत प्रथा पूजेची असण्यात    हिंदूच्या ।।३।। शंखास पूजेतील मान    प्राप्त होई ‘वर’ मिळोन कथा त्याची जाणून    घ्यावी तुम्ही ।। ४।। सांदिपनी ऋषीच्या आश्रम     शिष्यगण करिती […]

श्री. तुलसी वृदांवन जन्मकथा

तुलसीचे झाड अंगणीं । सर्वांच्या घरातुनी ।। त्याचे महत्त्व जाणूनी । गृहलक्ष्मीसाठीं ।।१।। पवित्रता धर्म एक । घर गृहस्थीचे सुख ।। पवित्रतेचे प्रतीक । तुलसी असे ।।२।। तुलसीचे झाडास । परमेश्वराचा सहवास ।। गृहसुख त्या घरास । लाभत असे ।।३।। तुलसी झाडास मोठेपणा । मिळत असे ‘वर’ मिळोन ।। कथा ऐकवी चित्त देवून । सकळ जन […]

रामायणातील कांहीं स्त्रिया : थोडें विवेचन

सीता ते कैकेयी, शूर्पणखा ते मंदोदरी, अहिल्या ते तारा, सार्‍या स्त्रियांची स्थिती समाजात कुठेतरी ‘खालची’ असलेली दिसते. या लेखात, त्यांच्या एकूण-आयुष्याचें या बाबतीतील अल्प-विवेचन आहे. […]

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दीपमाळ आणि ‘चास’चा किल्लेवाडा

मी दिव्यांचा संग्रह करायला सुरुवात केल्याला आता ५० वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने सध्या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दीपमाळांचा शोध घेत आहे. पुण्याच्या राजगुरुनगरजवळ चासकमान येथील सोमेश्वर मंदिरातील २५६ दिव्यांची दीपमाळ ही अत्यंत देखणी दीपमाळ आहे. ही संपूर्ण दीपमाळ, चारही बाजूच्या भिंतीतील कोनाडे आणि गावातील नदीकाठावरील शेकडो कोनाडे दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांनी उजळलेले पाहायला प्रत्यक्ष सोमेश्वर नक्कीच अवतरत असेल ! या दीपमाळेसह आणखी काही वैभवशाली इतिहासाच्या श्रीमंत खुणा पाहायला मिळाल्या. […]

1 40 41 42 43 44 77
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..