नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

असा छंद असा आनंद : मराठी आडनावांचा संग्रह.

कुणाला काेणता छंद जडेल याचा काही नियम नाही. मराठी ज्यांची मातृभाषा आहे, अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याचा छंद मला जडला. आतापर्यंत सुमारे ६० हजार आडनावे संग्रहित झाली आहेत. त्या निमित्ताने मराठी आडनावांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले. त्याचेच विवेचन या लेखात वाचावे. […]

सजीवांचे शरीर आणि आत्मा

आत्मा म्हणजेच पिंडात सर्वठायी असलेले चैतन्य. आत्मा म्हणजेच शरीरात सर्वठायी असलेली ऊर्जा. आत्मा म्हणजेच सजीवांचा लाईफ फोर्स…जीवनबल. आत्मा म्हणजेच डीएनए आणि जनुकांच्या स्वरूपात असलेले आनुवंशिक संकेत आणि या संकेतांचे उलगडीकरण आणि विस्तार पावण्याची क्रिया सुरू होणे म्हणजेच सजीवाचा जन्म होणे आणि ही क्रिया बंद पडणे म्हणजेच सजीवाचा मृत्यू होणे. सजीवाच्या प्रत्येक पेशीत, आनुवंशिक तत्व, जेनेटिक मटेरियल असते आणि तोच पेशीचा आत्मा. सजीवांचा आत्मा प्रत्येक पेशीत म्हणजे सर्व शरीरातच असतो.
[…]

मैत्री : निखळ, निकोप, निर्व्याज (फ्रेंडशिप डे विशेष)

मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. ‘तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे’ असं मैत्रीचं स्वरुप असायला हवं. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पहायला मिळतो.
[…]

पाकिस्तानचे अफ-ताल-काश्मिर धोरण

सशस्त्र कट्टर जिहादींच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या घुसखोरीमुळे तसेच पश्तुनी भाषेत बोलणार्या कट्टर तालिबानी जिहादींकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मिरमध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही कारणांमुळे भारतीय नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षादलांनी व १ पॅरा स्पेशल फोरर्सेस यांनी आक्रमक हालचाली करून घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
[…]

1 93 94 95