भारतीय आहार पद्धतीमध्ये जेवण बनवीत असताना आपण बर्‍याच जिन्नसांचा वापर आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये करत असतो. आपली भारतीय आहार पद्धती अतिशय विशाल आणि समृद्ध आहे. आपल्याला हे माहीत आहे का की आपण आपल्या जेवणामध्ये वापरत असलेले बरेचसे पदार्थ हे जरा वेगळ्या पद्धतीने वापरले तर आपण त्यांचा उपयोग घरच्या घरीच शरीराच्या छोट्या मोठ्या तक्रारी बर्‍या करण्याकरीता करू शकतो.

चला तर मग किचन क्लिनीक ह्या आपल्या सदरा मार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करून घेऊया.

किचन क्लिनीक – तुप कसे वापरावे

१)शरद ऋतुमध्ये शरीरात पित्त वाढते त्यामुळे ह्या ऋतूत तुप सेवन करावे. २)उन्हाळ्याच्या दिवसात रात्री तुपाचे सेवन केल्यास फायदा होतो. ३)हिवाळयात तुप दिवसा सेवन करणे चांगले. ४)जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तूप जेवणा सोबत घ्यावे. ५)अजीर्णाचा त्रास असताना तुप सेवन करू नये. ६)तुपाचा वापर करत असताना नियमीत गरम पाणीच वापरावे. तुप कोणी खाऊ नये: स्थूल मेदस्वीव्यक्ती,आमवात,भुकनसणे, […]

किचन क्लिनीक – तुपाचे प्रकार व गुण भाग २

४)मेंढीचे तुप: पचायला जड,तत्काळ पोषण व बल गाणारे,शरीर पुष्ट करंणारे.नाजूक प्रकृतीच्या माणसांनी ह्याचे सेवन करू नये. ५)ताजे तुप: श्रमनाशक,तृप्तीकर,नियमीत भोजनात सेवन केल्यास अशक्तपणा,रक्ताची कमतरता भरून काढते.तसेच डोळंयाना हितकर आहे. ६)जुने तुप: दहा वर्षांवरील तुपास रसायन म्हणतात.शंभर वर्ष जुन्या तुपाला कुंभसर्पि म्हंणतात.त्याहीपेक्षा जुने तुप म्हणजे महाघृत होय.जसजसे तुप जुने होत जाते तसे ते अधिक गुणकारी होते.जुने तुप […]

किचन क्लिनीक – तुपाचे प्रकार व गुण

१)गाईचे तुप: बुद्धि,कांती,स्मृती,धारणाशक्ती वाढविते,स्त्रोतसांचे शोधन करते,वातनाशक,स्वर चांगला ठेवते,पित्तनाशक,पुष्टीदायक,भुक वाढविते,वृष्य,आयुष्यकारक,गोड असून सर्व तुपांत श्रेष्ठ आहे.हे विषनाशक,डोळ्यांना हितकर,रसायन असून आरोग्यदायक आहे. २)म्हशीचे तुप: धारणाशक्तीवाढविणारे,सुखदायक, कांतीवर्धक,कफवातनाशक,शक्तिवर्धक शरीरवर्ण सुधारणारे,मुळव्याध नाशक,भुक वाढविणारे व डोळ्यांसाठी हितकर आहे. ३)शेळीचे तुप: भुक वाढविते,डोळ्यांनाहितकर,बलवर्धक, खोकला,दमा कमी करणारे,पचायला अत्यंत हल्के असते. (क्रमश:) (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती) वैद्य स्वाती हे.अणवेकर आरोग्य […]

किचन क्लिनीक – घृत/साजूक तूप

तेल ही गेले तुप ही गेले हाती आले धुपाटणे हि मराठी मधील एक प्रचलित म्हण आहे.अशीच काहीशी गत आपण आपल्या आरोग्याची करून घेतली आहे ती देखील तुपा बद्दल आपल्या मनात असलेल्या गैरसमजांमुळे.तुप खाणे आरोग्यास चांगले नाही,तुपा हृदयाचा आरोग्यास हानीकारक आहे,तुप खाल्ल्याने कोलेस्टेराॅल वाढते इ.त्यामुळे बरेच लोक वनस्पती तुप अर्थात डाल्डाचा सर्रास वापर आपल्या आहारात करतात.पण डाल्डा […]

किचन क्लिनीक – लोण्याचे औषधी उपयोग भाग २

ब)ताकावरचे लोणी: १)हे लोणी लहान मुलांना अत्यंत पोषक आहे.त्यांना जेवणासोबत ३ भाग लोणी व १ भाग मध असे मिश्रण द्यावे(फक्त शाकाहार करत असतानाच हा उपाय करावा मांसाहार जेवणासोबत नाही). २)रसायनांशी संपर्क,उन्हाचा प्रभाव ह्यामुळे त्वचेचा वर्ण खराब होतो तेव्हा त्वचेवर लोण्याचा लेप लावावा व पोटात देखील लोणी घ्यावे वर्ण सुधारतो. ३)गर्भिणी स्त्रीने नियमीत आपल्या आहारात लोणी ठेवावे […]

किचन क्लिनीक – लोण्याचे औषधी उपयोग

अ)दूधापासून तयार केलेले लोणी: १)वारंवार पातळ भसरट संडास होत असल्यास १० ग्राम लोण्याचा समावेश दोन्ही वेळच्या जेवणात करावा. २)ज्यांना वारंवार नाकाचा घोळणा फुटण्याची सवय असते त्यांनी जेवणानंतर १ मोठा चमचा लोणी समभाग साखर घालून खावे व त्यावर तासभर पाणी पिऊ नये. ३)डोळ्यांची आग होत असल्यास,वाचताना डोळे दुखत असल्यास,डोळे कोरडे वाटत असल्यास १ चमचा लोणी,१ चमचा मध,व १ […]

किचन क्लिनीक – ताक प्यायचे नियम

आता आपण ताक कधी पिऊ नये व कोणी पिऊ नये ते पाहूयात: १)फुफ्फुसाला जखम होऊन थुंकीमधून रक्त पडत असल्यास त्या व्यक्तिने ताक पिऊ नये. २)अशक्त व कृश व्यक्तिने ताक पिऊ नये. ३)बेशुद्ध पडणे,चक्कर येणे,अंगाची आग होणे ह्या तक्रारीमध्ये ताक पिऊ नये. ४)कोड,त्वचा रोग,अंगावर पुरळ येणे,गळवे होणे,मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव अधिक होणे अशा तक्रारी मध्ये ताक प्यायचे […]

किचन क्लिनीक – नवनीत(लोणी)

ज्या खाद्य पदार्थाभोवती कृष्णाच्या नटखट लिला भ्रमण करतात.कृष्णावर रचलेल्या अनेक पदांमध्ये त्याचे ह्या वरचे प्रेम व ते मिळवण्यासाठी तो करत असलेल्या खोड्यांचे वर्णन केले जाते.अर्थातच मैया मोरी मैं नही माखन खायो इ सारखी अनेक पदे कृष्णाचे हे माखन प्रेम दर्शविते तसेच गोपी देखील त्याला माखन चोर म्हणून चिडवत.असे हे नंदलाल प्रिय माखन अर्थात लोणी ह्या सदरात […]

किचन क्लिनीक – ताकाचे काही घरगुती उपचार

१)वारंवार संडासला होत असल्यास तसेच जर संडास करताना जळजळ होत असेल तर लोणी न काढलेले ताक आहारात ठेवावे पण जर संडासला चिकट,बुळबुळीत,जड होत असेल तर लोणी काढलेले ताक आहारात ठेवावे.तसेच वैद्यांचासल्लाघेऊनत्यातसैंधव,बडीशेप,जिरे, ओवा,मिरी,असे काही द्रव्य त्यात घालावे. २)मुळव्याध झाली असता आहारामध्ये ताक वापरावे पण जर रक्त पडत असेल तर वैद्यांचा विशेष सल्ला घ्यावा. ३)अंगावर सुज येण्याची सवय […]

किचन क्लिनीक – ताकाचे सामान्य व विशेष गुण

सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के, कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे. पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया: १)गाईचे ताक: भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे. २)म्हशीचे ताक: दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे. ३)शेळीचे ताक: अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक, […]

1 2 3 13