नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

स्वाईन फ्लूचा भस्मासुर !

” हे परमेश्वरा  काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ?  ” बघ किती माणसे  दगावलीत,  त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. ? काय बिचाऱ्यांचा दोष?  तू तर ह्या जगाचा कर्ता करविता.  ही तर क्षुलक बाब तुझ्यासाठी. कर ह्यावर काहीतरी उपाय. दे त्यांना आशिर्वाद.” […]

झाडावारले निर्माल्ये !

रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने,  हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध  रंगांची  अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते. एक दिवस माझे मित्र श्री एकनाथराव  यांची भेट झाली.  हातात पिशवी घेऊन ते हलके हलके फुले तोडून जमा करु लागले होते.  माझे लक्ष जाताच मी त्यांच्याजवळ गेलो. ” काय पूजेसाठी फुले गोळा करीत आहात वाटते? परंतु ही फुले देवाला कशी चालतील? “      माझ्या विचत्र वाटणाऱ्या वाक्याने  त्यांना एकदम आश्चर्य वाटले.  काहींच उलगडा न झाल्यामुळे त्यांनी मला त्या वाक्याचा अर्थ विचारला. मी म्हणालो ” थोड्या वेळापूर्वी मी समोर बसून मानस […]

अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात तैनात असलेल्या आपल्या फौजा मागे घेण्याची केलेली घोषणा भारताएवढीच त्या क्षेत्रातील अन्य देशांची चिंता वाढविणारी आहे. सध्या त्या क्षेत्रात अमेरिकेचे १४ हजार सैनिक आहेत आणि त्यापैकी निम्मे लोक माघारी बोलाविण्याची ट्रम्प यांची तयारी आहे. […]

महाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल

भारतीय रेल्वेने हा बांधलेला अजस्त्र पूल म्हणजे रेल्वे इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारी घटना आहे. आसाम मधील दिब्रुगड ते धेमजी अरुणाचल प्रदेश अशी दोन महत्वाची राज्ये जोडली जाणार आहेत. या पुलामुळे नेहमीचा रेल्वे प्रवास ११० ते १३० किमीने कमी होणार आहे, तर रस्त्याने प्रवासात ४०० ते ५५० किमी अंतराची बचत होणार आहे. […]

सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे

पार्लियामेंटरी स्टॅंडिंग कमिटी ने एक महत्त्वाचे सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात त्यांना नोकरीच्या पहिले पाच वर्षे सैन्यात नोकरी करणे अनिवार्य केले जावे. […]

आजी ग आजी!

सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते. लहान मुलगी कुमारिका विवाहित स्त्री माता, ह्या सर्व भूमिका, तिने जगाच्या व्यासपिठावर  […]

सशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना

भावी पिढीतील युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भविष्यात एखादे मोठे युद्ध झाले, तर त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचदृष्टीने आता भारतीय लष्कराने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. […]

डी. बी. के. रेल्वे प्रकल्प

हा रेल्वे मार्ग बांधणी म्हणजे इंजीनियरिंगचा एक पराक्रम म्हणून त्याकडे पाहिले जाते. रेल्वेने १९६३ च्या सुमारास या खडतर विभागातून ११० किमी अंतराची कठिण रेल्वे लाईन बांधली. समुद्रसपाटी पासून सुरु होणारा हा मार्ग अनंतगिरी घाटमार्ग पार करत अराकू हिल स्टेशन पर्यंत गेलेला आहे. […]

सोनेरी तसवीर !

तोच तो भाग्यवान    कागदाचा तुकडा, ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तस्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या  पाऊलखुणा दाखवीत होता. […]

संकल्पांचे घोडे

१ जानेवारी जशी जशी जवळ येऊ लागते तसे मला संकल्पांचे वेध लागतात. आता ह्या नवीन वर्षात आपण कोणकोणत्या संकल्पांच्या घोड्यांना गंगेत न्हाऊ घालायचे ह्यावर माझे विचार मंथन सुरू झाले. […]

1 52 53 54 55 56 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..