जागतिक आर्थिक महासत्तेची चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. वेळप्रसंगी एकाधिकारशाहीच्या जोरावर संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध झिडकारण्यातही ते मागे-पुढे पाहणार नाहीत. नुकत्याच झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेत बँकेच्या मूळ भांडवलापासून ते आकस्मिक निधीपर्यंत जागतिक अर्थकारणात चीनची ‘दादा’ गिरी आता पाहायला मिळणार आहे. […]
संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या चौकोनातील एका बाकावर बसून वर्दळ व सभोवताल बघत होतो. समोर एका स्थानिक व्यक्तीचे प्रचंड मोठे होर्डींग ( Hording- Cut out) लावलेले होते. वाढदिवस आणि जनतेकडून शुभेच्छा मिळाव्यात ही अपेक्षा होती. शेजारीच कांही सामाजिक, राजकीय व्यक्तींची पण चित्रे काढलेली होती. […]
नक्षलग्रस्त भागांत भारताची सत्ता चालत नाही. पाकव्याप्त काश्मिरप्रमाणेच या प्रदेशांची अवस्था बनलेली आहे. नक्षल चीनचे भारतात नेमले गेलेले सैनिक आहेत. त्यांना होणारा शस्त्रास्त्र पुरवठा पूर्वोत्तर राज्यांच्या सीमांवरुन केला जातो. […]
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूक दीड महिन्यांवर आली असताना सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेतृत्वातच तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षाचे प्रमुख व पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज झालेले त्यांचे पुत्र बिलावल भुत्तो-झरदारी हे देश सोडून थेट दुबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) प्रचार मोहिमेस मोठा धक्का बसला आहे. […]
घातपाताचा कट रचल्याप्रकरणी ‘हिज्ब-उल-मुजाहदीन’चा अतिरेकी लियाकत अली शाह याला दिल्ली पोलिसांनी अटक
केल्याच्या मुद्द्यावर जम्मू-काश्मीर विधिमंडळ सभागृहात चर्चा करण्यासाठी सत्ताधारी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सने मांडलेल्या तहकुबीच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्षांनी परवानगी नाकारली.
1948 ते 1972 या सालांच्या मध्ये काश्मीर मध्ये शांती होती. 1972 पासून ऑपरेशन टॉपेझ च्या प्लॅन प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोरी सुरू झाली. अनेक तरूणांना भडकवून पाकिस्तानी आतंकवादी ट्रेनींग कॅम्पस् मध्ये पाठवण्यात आले. या काळामध्ये आपले सरकार पूर्णपणे झोपले होते. […]
माओवाद्यांच्या नुकत्याच झालेल्या मध्यवर्ती बैठकीत आपल्या कारवायांचे क्षेत्र विस्तारण्याचा व त्यात शहरी विभागांचा समावेश करण्याचा झालेला निर्णय गंभीर व चिंतेचा आहे. अबूज महाड या गडचिरोली व बस्तरच्या सीमेवर असलेल्या पहाडावर नुकत्याच झालेल्या या बैठकीत आदिवासींसोबतच दलित, अल्पसंख्य व महिलांच्या वर्गांना आपल्या चळवळीत ओढून आणण्याची योजना आखली गेली. […]
पाकिस्तानात सत्ता कुणाचीही असो, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कुणीही असो, खरी सत्ता तर लष्कराचीच असते. पाकिस्तानी राष्ट्रपती किंवा पंतप्रधानापेक्षा पाक लष्कराचा सेनापती अधिक शक्तिशाली असतो. सध्या पाकिस्तानात निवडणुकांचे वातावरण आहे त्यामुळेच खरी राजवट कुणाची हा प्रश्न उद्भवला. निवडणुकीत जिंकून कुणीही येवो, सत्ता तर लष्कराचीच असणार आहे. तहिरुल कादरीसुध्दा दहा दिवसांतच गप्प झाले. पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय जाहीर केले. […]