ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे हे सदर अत्यंत लोकप्रिय आहे.

चीनच्या आव्हानांला तोंड देण्यासाठी मेक इन इंडियाला चालना देण्याची गरज

भारताची शस्त्रसिद्धता किती मागे पडली आहे यावर पूर्वीही अनेकदा लेख लिहिले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण ही गोष्ट चर्चेचा नवा विषय नाही. पारंपरिक युद्ध क्षमता, शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण, रस्ते, रेल्वेमार्ग बांधणे आणि सर्व शस्त्रे – रणगाडे, तोफा आणि इतर शस्त्रास्त्रे यांचे मेक इन इंडिया अंतर्गत आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. […]

सुरक्षा सामान्य माणसांची, सरकारी आणि खाजगी संपतीची

गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात आणि एकच एक दृष्य, फोटो सतत दाखवली जातात. या प्रकारचे वृत्तांकन थोडक्या शब्दांत न करता सतत तेच ते दाखवून त्यात तेल ओतण्याचे काम का केले जाते?.हिंसाचाराच्या बातम्यांना पान १ वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे. […]

ऑस्ट्रेलियाशी संबंध मजबुत करण्याची भारतास संधी

मॉरिसन सरकारच्या नव्या कार्यकाळात भारताशी मैत्रीसंबंध वाढविण्यावर तेथील सरकारचा भर असेल. दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये परस्परांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या चतुष्कोनी संवादाबाबतही भारताची भूमिका महत्वाची आहे. […]

दलाई लामा यांचा उत्तराधिकारी – भारताची भुमिका

१९३३ मध्ये सध्याचे दलाई लामा म्हणजे ज्ञानाचे सागर असलेले तेन्झिन ग्यात्सो यांची नियुक्ती झाली. ते तिबेटचे राष्ट्राध्यक्षही झाले. चीनने कुरापती काढून १९५५पासून तिबेटवर आक्रमण करण्यास आणि हक्क सांगण्यास सुरुवात केली. दलाई लामांनी नियुक्त केलेल्या पंचेन लामांचे पद चीन सरकारने १९९५ साली बरखास्त केले. त्यांच्या जागी त्यावेळी सहा वर्षांच्या बेनकेन एरदिनी या बालकाला बसवले. त्यानंतर चीनने जबरदस्तीने ताबा मिळवलेल्या तिबेटवर कडक निर्बंध लादले. […]

सिलिगुडी कोरिडॉरला पर्याय : म्यानमार, बांगलादेशचा समुद्र-नदी-रस्ता मार्ग

ईशान्येच्या राज्यांना शेजारी देशांशी जोडल्याशिवाय त्यांचा खर्‍या अर्थाने विकास होणार नाही. संपूर्णत: भूवेष्टित असल्यामुळे बाह्य जगताशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आजूबाजूच्या देशांतूनच जावं लागणार, ही निकड ओळखून सरकारने त्या दिशेने पावलं उचलली. […]

मुंबईच्या पोलीस दलाचे सक्षमीकरण कसे करावे ?

आज मुंबई आणि महाराष्ट्रासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत.पोलीस दलाचे सक्षमीकरण ही काळाची आवश्यकता आहे ! पोलीस यंत्रणा अजुन सक्षम होण्यासाठी पोलीस प्रशासनात काय सुधारणा करणे अपेक्षित आहे, त्यावर संक्षिप्त विचार या लेखात दिले आहेत. […]

माओवाद्यांचे आव्हान : सध्याची परिस्थिती आणि उपाय योजना

माओवाद्यांचे आव्हान : सध्याची परिस्थिती आणि उपाय योजना हे  ब्रिगेडियर  हेमंत महाजन यांचे, भारतीय विचार साधना,पुणे यांनी प्रकाशित केलेले,नक्षली  चळवळीचे, इतिहास, आजचे स्वरुप, रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे. […]

पाकिस्तानी सैन्यात पडलेली फूट : दहशतवाद कमी करण्यास भारतास संधी

लष्कर म्हणेल तो पंतप्रधान होतो, अशी स्थिती असताना, सध्या तिथे लष्करप्रमुखाचे पद वादाच्या भोवर्यात सापडणे, ही अभूतपूर्व घटना आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा २९ नोव्हेंबरला निवृत्त होणार होते. त्यांना इम्रान खान सरकारने १९ ऑगस्ट रोजी एकदम तीन वर्षांची मुदतवाढ देऊन टाकली. […]

बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांची अवस्था

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात १२ ऐवजी ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. ‘या देशातील अल्पसंख्यकांना जाण्यासाठी भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही म्हणुन हे जरुरी होते. […]

भारताची सागरी सुरक्षा : सद्य परिस्थिती आणि उपाय योजना

26 नोव्हेंबर 2019 ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेचे अवलोकन केले पाहिजे. गेल्या पाच वर्षात सागरी सुरक्षेमध्ये काय सुधारणा झाल्या, सध्याची परिस्थिती कशी आहे आणि येणाऱ्या काळात अजून काय जास्त सुधारणा करणे गरजेचे आहे या सगळ्या विषयावर चर्चा होणे जरुरी आहे. […]

1 2 3 4 28