नवीन लेखन...

मर्चंट नेव्ही रियालिटी

मर्चंट नेव्ही मध्ये जहाजांवर कामं करणारे अधिकारी आणि खलाशी हे संपूर्ण जगभरात असंख्य देशात जात असतात. त्यामुळे जगभर पर्यटनाचा आनंद घेतात. जहाजावर भरपूर दारू प्यायला मिळते. अनेक देशात आणि अनेक बंदरात त्यांच्या मैत्रिणी असतात. एकूणच काय तर सगळ्यांना असे वाटते की मर्चंट नेव्ही मध्ये सगळे खूप एन्जॉय करत असतात. […]

मर्चंट नेव्ही रँक्स

जहाजावरील अधिकारी हे कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या तर खलाशी कमीत कमी सहा ते जास्तीत जास्त नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी जहाजावर पाठवले जातात. […]

साईन ऑफ इन लॉक डाऊन

जकार्ता हुन निघाल्यावर साडे सहा ते सात तासात मुंबईत लँड झाले आणि अर्ध्या तासात इमिग्रेशन आणि सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्हाला राज्य सरकारच्या ताब्यात दिले गेले. परंतु कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे संध्याकाळी साडे सात वाजल्यापासून ते क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या वाशीच्या हॉटेल मध्ये जायला साडे बारा वाजले. […]

स्काय व्ह्यू

फ्लाईट ने ऑनटाइम टेक ऑफ केले. टेक ऑफ नंतर जकार्ता शहराचे दोन अडीच मिनिटे हवाई दर्शन झाले आणि जकार्ता जवळील समुद्रातील लहान मोठी बेटे दिसू लागली […]

फ्लेअर्ड नाईट

डोंगर माथ्यावरून निघणाऱ्या ज्वाला डोंगराच्या पायथ्यावरुन, मध्यावरून का निघत नसाव्यात याचे कुतूहल वाटू लागले पण लगेचच तो डोंगरच जर बाहेर पडणाऱ्या तप्त लाव्ह्या पासून बनला असेल असं वाटून मला पडलेले कुतूहल लगेचच शमले. बराच वेळ जहाज ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या बेटाच्या दिशेनेच चालले होते पण जहाजाची दिशा बदलली असल्याचे जाणवले कदाचित कॅप्टन ब्रिजवर गेला असावा आणि त्याने जहाज बेटाजवळून न नेता लांबून वळवण्यासाठी सूचना दिल्या असाव्यात. […]

ब्लॅक आउट

हवामान सकाळपासून खराब होणार आहे असा व्हेदर फोरकास्ट आदल्या दिवशीच मिळाला होता त्यामानाने संध्याकाळी साडे सहाला डिनर होईपर्यंत सहन करण्याइतपत जहाज हेलकावत होते. पण रात्री दहा नंतर वाऱ्याचा वेग वाढला होता. सुं सुं करत वाहणाऱ्या वाऱ्यासोबत लाटांनी सुद्धा आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. जहाज येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन दुसरी लाट यायच्या आत दोन्हीही लाटांच्या मध्ये धाडकन खाली आदळत होते आणि पुन्हा एकदा उसळी मारल्या सारखं वर येत होतं. […]

ऑनबोर्ड सरदार

आजपर्यंत जेवढ्या जहाजांवर काम केले त्या त्या सगळ्या जहाजांवर कमीत कमी एक तरी दाढी आणि पगडी असलेले सरदार हे अधिकारी किंवा खलाशी असायचे. […]

जे एस एम अलिबाग

बी ई करताना अलिबागच्या जे एस एम कॉलेज ची खूप आठवण यायची. डिग्री करताना फर्स्ट ईयर मध्ये प्रत्येक शुक्रवारी शेवटची मालदार नाहीतर अजंता पकडून अलिबागला यायचे आणि सोमवारी पहिली अजंता पुन्हा मुंबईला जायचे. साहजिकच पुढल्या वर्षी ड्रॉप लागण्यासाठी कमीत कमी जेवढ्या केट्या लागतात त्याच्यापेक्षा डबल केट्या लागल्या. […]

मकान डुलु

कितीही महत्वाचे काम असले तरी त्यांच्या नमाज पठणाची वेळ झाली की ते काम थांबवून जातात असं ऐकलं होतं पण मला तसा अनुभव कोणाकडूनच आला नाही. उलट कॉफी ब्रेक किंवा जेवणाची वेळ होतं आली की मीच त्यांना त्यांच्या भाषेत बोलायचो, मकान डुलु,मकान डुलु म्हणजे जेवायला चला जेवायला चला. […]

1 2 3 4 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..