नवीन लेखन...

कृषी, शेतीविषयक माहिती, घडामोडी यावरील लेखन

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ४ – शमी

याचा प्रसार भारतातील उष्ण व रूक्ष प्रदेशांत सर्वत्र आहे. जमिनीत आत ओलावा आणि वर वाळू असली तरी हा वृक्ष चांगला वाढतो. हा वृक्ष काटेरी आहे. पानांच्या विरुद्ध बाजूला अणकुचीदार, बाकदार काटे असतात. जुनी पाने गळण्याच्या वेळेसच नवीन पालवी फुटते. फुले पिवळी, गुलाबी लहान आणि एका दांड्यावर असतात. […]

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ३ – उंबर ( औदुंबर)

नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते, किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. […]

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग २ – पिंपळ

पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदू संस्कृतीत, ज्या वृक्षांना ‘तोडू नये’ असा दंडक आहे, त्यापैकी हा एक. अश्वत्थ मारुतीचे (पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे) मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. […]

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग १ – वटवृक्ष

वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे. भगवान शिवाचे हे निवासस्थान मानले असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत असतो. त्याचा पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरताता आणि आपले अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारातील सौभाग्याचे पावित्र्याचे प्रतीक मानतात. […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १० – चिकू

चिकूचे शास्त्रीय नाव Acharas sapota (family Sapotaceaae) आहे. यास Manilkara zapota (family Z      apotaceae) असेही नाव आहे. सुमधुर फळाबद्दल परिचित असलेल्या या मध्यम आकाराच्या (सु. ८–१० मी. उंचीच्या) वृक्षाचे मूलस्थान मेक्सिको असून आता उष्ण कटिबंधातील सर्व प्रदेशांत तो लागवडीत आहे. महाराष्ट्रात कुलाबा व ठाणे या जिल्ह्यांत आणि गुजरातच्या दक्षिण भागात व सौराष्ट्रात अधिक पिकवितात. महाराष्ट्रातील डहाणू येथील चिक्कू प्रसिद्ध आहेत. तेथे दरवर्षी चिक्कू महोत्सव भरतो. […]

गच्चीवर साकारली कचऱ्यातून ‘शेती’

मातीचा वापर न करता कचऱ्यातून त्यांनी ही शेती साकारली असून, त्याला ते ‘हिरवी माती’ (ग्रीन सॉइल) असे म्हणतात. गेल्या १५ वर्षांपासून भिडे या हिरव्या मातीतून शेती करत असून गच्चीवर वर्षाला चक्क तीन पिकं घेतात. […]

दुष्काळ “एका हाताने” गाडणारा ७८ वर्षांचा ढाण्या वाघ…

लातूरच्या दवणहिप्परग्यात एका हाताचा शेतकरी राहतो. जिद्द, कष्टाच्या जोरावर या बहाद्दरानं १९७२ आणि आजवरच्या तमाम दुष्काळांना दणदणीत पराभूत केलं आहे. ७८ वर्षाचा हा शेतकरी एका हातावर ४७ वर्षे शेतातली सगळी कामं करतो. बुलेट, ट्रक, ट्रॅक्टर चार चाकी चालवतो. वाऱ्याच्या वेगानं घोडेस्वारी करतो. […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ९ – फणस

फणस हा सदाहरित वृक्ष असून मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे असे समजले जाते. त्याचे शास्त्रीय नाव Artocarpus heterophyllus (Family Moraceae) आहे. यास इंग्लिश मध्ये जॅकफ्रुट म्हणतात […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ८ – अंजीर

भारतात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यात अंजिराची लागवड केली जाते. पिकलेली ताजी अंजीरे रुचकर असतात. सुकविलेली गोड फळे तसेच त्यांचा मुरंबा खाल्ला जातो. पूर्ण पिकून गळून पडलेल्या अंजिरापासून खाण्यासाठी सुकी अंजिरे तयार करतात. […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ७ – सीताफळ

सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करतात. याचे शास्त्रीय नाव Annona squamosa आहे. हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला. […]

1 3 4 5 6 7 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..