सुरंगीचे शास्त्रीय नाव Mammea suriga.हा कॅलोफायलेसी कुळातील वृक्ष आहे. (गोडी उंडी, पुन्नाग; हिं. नागकेसर, सुरंगी; गु. रतिनागकेसर; क. गार्दुंडी, पुने; सं. पुन्नाग, नागकेसर; लॅ. Mammea suriga). सुमारे १२–१८ मी. उंचीचा (घेर साधारण १.८मी.) हा सदापर्णी वृक्ष पश्चिम भारतातील गर्द जंगलांत खंडाळा ते दक्षिणेस मलबार व कोईमतूरपर्यंत (समुद्र सपाटीपासून पासून सु. ६०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. तो ओडिशा, […]
लहानपणी बेहड्याची फळं दगडाने ठेचायची आणि त्यातील पिवळा गर खायचे मुलांचे उद्योग असायचे. बांधाच्या कडेने असणारे बेहडा खरं तर लक्ष्य वेधून घेणारा वृक्ष कधीच नव्हता. हिवाळा संपून उन्हाळा चालू झाला की यांच्या पिवळसर फुलांची रास झाडाखाली पडलेली दिसते आणि तेवढाच घमघमाट. बेहडा वर्षभर एवढी रूपे बदलतो की प्रत्येक ऋतू मध्ये त्याच्या नव्याने प्रेमात पडावं. लालसर पालवी […]
पृथ्वी वरील अमृत वृक्ष हिरडा: हिरडा हा पर्णझडी जंगलामध्ये आढळणारा वृक्ष आहे. हा काँब्रेटेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नांव Terminalia chebula आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिण भारतातील राज्यापर्यंत ही प्रजाती मुबलक आढळते. बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य भारत, महाराष्ट्र इ. ठिकाणी ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण प्रांत, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे, विदर्भ इत्यादी ठिकाणी हा वृक्ष […]
‘शाक’ ह्या संस्कृत नावापासून ‘साग’ हे मराठी आणि इतर भारतीय भाषांतील तत्सम नावे आली असणे शक्य आहे. महाभारतात (इ.स.पू. ३१००–१०० वर्षे ) आणि सुश्रुतसंहितेत ‘शाक’ व चरकसंहितेत ‘द्वारदा’ असा उल्लेख आढळतो. याची इतर काही संस्कृत नावेही प्राचीन वैद्यक ग्रंथांत आढळतात. लॅटिन नावातील टेक्टोना हे नाव मूळचे ग्रीक भाषेतील टेक्टन म्हणजे सुतार या अर्थाचे असून ग्रँडिस हे गुणनाम त्यांच्या मोठ्या पानाला उद्देशून वापरले आहे. ‘टेका’ या पोर्तुगीज नावावरून इंग्रजी ‘टीक’ नाव पडले आहे. मलायी भाषेतील ‘टेक्कू’ या नावाचा इंग्रजी ‘टीक’ या नावाशी संबंध दिसतो. […]
कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करुन येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८ मे १९७२ रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी या विद्यापीठाकडे दापोलीचे कृषी महाविद्यालय, मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालय आणि कोकणातील १६ संशोधन केंद्रे होती. […]
महाराष्ट्रातील वनश्रींचे आढळणारे विविध प्रकार आणि विविधता यांचे अस्तित्व स्थानिक परिसरात असलेली भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, जमिनीचा मगदूर, चढउतार, समुद्रसपाटीपासून उंची यांवर अवलंबून असलेले दिसतात. वनश्रीच्या जडणघडणीमध्ये वरील नैसर्गिक व काही अनैसर्गिक कारणांचाही म्हणजे बोगदा जंगलतोड, अनिर्बंध गुराढोरांची चराई, वणवे इ. मोठा भाग असतो. या कारणांमुळे विद्यमान वनश्रींच्या प्रकारात पूर्णपणे आविष्कार झालेली वने फारच क्वचित ठिकाणी, अतिदुर्गम ठिकाणी, अभयारण्यातून अथवा देवरायांतून आढळतात. […]
बागेत पिरॅमिडसारखा दिसणारा, शोभेसाठी लावलेला जो ‘अशोक’ म्हणून ओळखला जातो, तो अशोक वृक्ष नसून ‘आशुपल्लव’ वृक्ष आणि सीतेला अशोकवनात ठेवले होते तो वृक्ष म्हणजे अशोक किंवा सीता अशोक. दोन्हींची कुळे वेगळी आहेत. सीता अशोक सीसॅल्पिनिऑइडी,लेग्युमिनोजी ) व हिरवा अशोक अनॊनेसी कुळातील आहे. मूळचा भारत-श्रीलंकेतला असलेला ‘सीता अशोक’ हा वृक्ष सुंदर दिसणाऱ्या सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो. […]
पारिजातकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते. गावात बहुतांश लोकांच्या अंगणात पारिजातचे झाड असतेच. पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण अतिशय प्रसन्न असते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे. […]
निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. हिरवाकंच डेरेदार पसारा आणि त्यात मधेमधे डोकावणारी पिवळी गोल फळं. कदंबाला दृष्ट लागेल असा डोळ्यांना सुखावणारा वृक्ष. कदंबाचा पसारा आणि दैवी गुण यामुळे त्याला देव वृक्ष असे संबोधतात. […]
बेल वृक्ष (बिल्व वृक्ष) : बेल हा पानझडी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ईगल मार्मेलॉस आहे. लिंबू व संत्रे या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. बेल हा वृक्ष मूळचा उत्तर भारतातील असून नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, बांगला देश, कंबोडिया, थायलंड इ. देशांत निसर्गत: वाढलेला आढळतो. भारत, श्रीलंका, जावा, फिलिपीन्स व फिजी या देशांत बेलाची लागवड […]