नवीन लेखन...

कॅज्यूअल्टी

बंगल्याबाहेर गाडीची चाहूल लागताच चार वर्षांचा समीरने धावत धावत जाऊन त्याच्या पप्पांना गाडीतून बाहेर पडल्या पडल्या पायाला घट्ट मिठी मारली. डॉ. विजय यांनी लाडाने त्यांच्या समीरला उचलून घेतले आणि बंगल्याच्या पायऱ्या चढु लागले. मुलाला बघून त्यांचा दिवसभरातील थकवा आणि ताण तणाव कुठल्या कुठे पळून गेला. समीर सोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर डॉ. आनंद यांनी गरम पाण्याचा शॉवर घेतला , सोफ्यावर बसल्या बसल्या त्यांनी टी पॉय वर पाय ताणले आणि टीव्ही ऑन करून न्युज चॅनल लावला. पण त्यांचे लक्ष टी व्ही कडे नव्हते.हॉस्पिटल मधुन बाहेर पडता पडता त्यांच्या नजरेस पडलेले दृष्य आता निवांत बसल्यावर डोळ्यासमोर तरळू लागले.
शहरातील एका मोठ्या पंचतारांकित हॉस्पिटल मधील एक नावाजलेले आणि निष्णात सर्जन अशी डॉ. विजय यांची ख्याती होती. डॉ. विजय यांनी फार कमी कालावधीत स्वतःचे नाव मोठं केलं होते. हॉस्पिटल मध्ये त्यांना समोरून येताना बघितले तर त्यांना ओळखणारे आदराने बाजूला होउन त्यांना अभिवादन करायचे. मेन एंट्रसच्या सेन्सर ने उघड बंद होणाऱ्या काचेच्या दरवाजाचे मेंटेनन्स सुरु असल्याने स्टाफ मधील त्यांच्या सहकाऱ्याने डॉ. विजयना कॅज्यूअल्टी डिपार्टमेंटच्या एक्झीट मधुन बाहेर पडण्याची सूचना केली होती. तिथून बाहेर पडता पडता त्यांच्या समोर व्यक्ती रडत रडत माझ्या मुलाला वाचवा माझ्या मुलाला वाचवा असा टाहो फोडत होता. खाकी रंगातील त्याची शर्ट पँट रक्ताने माखली होती. त्याच्या दोन्ही हातात जेमतेम चार पाच वर्षांचा त्याचा मुलगा मान टाकलेल्या अवस्थेत होता. त्याच्या पाठीमागे आणखीन एकजण खाकी कपड्यात उभा होता. त्यांची आर्जव आणि विनंत्या अपघात विभागातील ऑन ड्युटी डॉक्टर आणि स्टाफ ऐकत होते परंतु इमर्जन्सी मध्ये त्यांच्याकडून जशा यंत्रवत हालचाली व्हायला पाहिजे होत्या तशा होत नव्हत्या. इतक्यात कोणाचा तरी आवाज आला अहो रिक्षावाले दादा आम्ही इथे तात्पुरते उपचार करतो पण त्याला इथून लगेचच सरकारी दवाखान्यात घेऊन जा इथे बेड शिल्लक नाहीयेत.
त्या अपघातग्रस्त लहान मुलाच्या बापाने पुन्हा रडत रडत सांगितले सरकारी हॉस्पिटल मध्येच घेउन चाललो होतो ह्याला पण अक्सिडेंट होऊनही मी पोहचेपर्यंत तो शुद्धीवर होता आता वाटेत त्याची शुद्ध हरपली समोर तुमचे हॉस्पिटल दिसले म्हणून वळलो. सरकारी हॉस्पिटल पर्यंत पोहचायला उशीर झाला आणि तोवर माझ्या मुलाने जीव सोडला तर मी काय करू. तुम्ही पहिले ह्याचा जीव वाचवा त्याला शुध्दीवर येऊ द्या की मी लगेच त्याला सरकारी हॉस्पिटल मध्ये हलवतो.
तोपर्यंत हवं तर माझी आणि माझ्या मित्राची पण रिक्षा तुमच्या ताब्यात ठेवा. काय रे ज्ञाना ठेवशील ना तुझी पण रिक्षा, ज्ञाना ने हो बोलून मान डोलावली. पण हॉस्पिटलच्या स्टाफला अशी परिस्थिती हाताळण्याची चांगलीच सवय होती. तिथं असणाऱ्या ज्युनिअर डॉक्टरने पुन्हा एकदा त्यांना समजावले अहो दादा इथे बेड नाहीयेत तसेच आता सगळे डॉक्टर घरी निघून गेले आहेत त्यांना संपर्क करून ते इथे येईपर्यंत तुम्ही सरकारी किंवा दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये पोहचाल. इथे वेळ घालवून उशीर करण्यापेक्षा तुम्ही इथुन मुलाला घेऊन जा, हवं तर आम्ही हॉस्पीटल ची अँबुलन्स देतो कोणी अडवणार नाही सिग्नलला वगैरे.
त्यावर रिक्षावाले दादा बोलले, माझा मुलगा मरणाच्या दारात असताना माझी रिक्षा पण कोण अडवेल तेच मी बघतो, चल रे ज्ञाना इथ उगाच आपण वेळ वाया घालवला. इथे पॉश कपडे बघून आणि ॲडवांस भरण्याची ऐपत असणाऱ्यांसाठी कधीच बेड फुल नसतात हे पटले आज.
समोर काही क्षणांत घडणारा प्रसंग बघुन डॉ. विजय थबकले होते. कॅज्यूअल्टी डिपार्टमेंटच्या स्टाफने डॉ. विजय यांना बघितल्यावर अभिवादन केले. डॉ. विजय यांनी ज्युनिअर डॉक्टर कडे बघून त्याला जवळ बोलावले आणि जखमी मुलाला घेऊन माघारी फिरणाऱ्या रिक्षावाल्या दादाला बोलवायला सांगितले.
डॉ. विजय यांनी केलेली सूचना तिथे असलेल्या स्टाफ ने ऐकली. गेल्या काही क्षणांत टाळाटाळ करणारा स्टाफ इमर्जन्सी असल्या प्रमाणे यंत्रवत हालचाली करायला लागला. पटापट इन्टरकॉम वर बटणे दाबून ऑपरेशन थिएटर, ब्लड बँक, अनेस्थेसिस्ट अशा सर्वांना सूचना दिल्या जाऊ लागल्या. दोन मिनिटात रिक्षा वाल्या दादांच्या मुलाला चौथ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटर जवळ नेण्यात आले. डॉ. विजय यांनी लिफ्ट मध्ये जाण्यापूर्वी रिक्षावाल्या दादांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले दादा मी पण एका रिक्षावाल्याचा मुलगा आहे, मी माझ्यापरीने प्रयत्न करतो. तुम्ही आता देवाकडे प्रार्थना करायला जा.
चार पाच वर्षांच्या त्या लहान मुलाला एका भरधाव बाईकस्वाराने उडवले होते. त्याच्या मांडीला जखम होऊन त्यातून रक्तस्राव सुरू होता. डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. डॉ. विजय यांना एक तास लागला पण तो मुलगा पूर्णपणे धोक्याच्या बाहेर निघाला याची खात्री पटली आणि त्यांनी ज्युनिअर्सना सगळ्या सूचना दिल्या व ते समाधानाने ऑपरेशन थिएटर बाहेर पडले. डॉ. विजय यांना बाहेर पडलेले पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य बघुन रिक्षावाल्या दादांनी त्यांचा मुलगा सुखरूप असल्याचे ओळखले. रडत रडत डॉ. विजय यांचे पाय धरायला ते खाली वाकले. डॉ. विजय यांनी त्यांना दोन्ही हातांनी धरून उभे केले आणि म्हणाले. माझे पाय धरायला मी काही देव नाही. मी एक डॉक्टर असलो तरी एक माणूसच आहे. माझी फी न घेता आणि माझ्याच्याने जेवढं बिल कमी करता येईल तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेनच परंतु तुमची जेवढी ऐपत असेल तेवढे बिल तुम्ही शक्य तितक्या लवकर भरण्याचा प्रयत्न करा. माझ्या बाबांनी रिक्षा चालवून मला डॉक्टर बनवलं. तुमच्या मुलाचा जीव वाचल्या बद्दल तुम्ही एवढं तर नक्कीच करू शकता.
हे सर्व सांगताना डॉ. विजय यांना जड जात होते पण तसे करण्यावाचून आणि संगण्यावाचून त्यांना दुसरा मार्गही नव्हता.
हॉस्पिटल मधुन योगायोगाने कॅज्यूअल्टी डिपार्टमेंट मधून निघाल्यावर घडलेल्या प्रसंगामुळे एम एस करताना सरकारी हॉस्पीटल मध्ये त्यांना आलेले अनुभव त्यांना पुन्हा आठवले. हॉस्पीटल मधुन घरी पोहचे पर्यंत ताबडतोब त्यांनी शिक्षण घेतलेल्या सरकारी हॉस्पीटलच्या हेड ऑफ दी डिपार्टमेंट डॉ. प्रणव यांना फोन केला आणि त्यांना सांगितले, सर आजपासून जेव्हा केव्हा इमरजन्सी मध्ये माझी गरज भासेल तेव्हा मला फोन करण्याच्या सूचना आपल्या स्टाफ ला देऊन ठेवा तसेच आपण मी सर्जन झाल्यावर माझ्यासमोर जो प्रस्ताव ठेवला होता तो अजुनही असेल तर त्या प्रस्तावाला मी विना अट स्वीकारणार आहे. पलीकडून डॉ. प्रणव यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला आणि तोपर्यंत डॉ. विजय यांच्या पायाला समीरने घट्ट मिठी मारलेली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यावर डॉ. विजय यांनी त्यांच्या स्वर्गवासी बाबांच्या फोटोला हात जोडले आणि म्हणाले, बाबा काल मला तुम्ही डॉ. प्रणव यांना मी बारा वर्षांचा असताना त्यांना दिलेले शब्द आठवले, तुम्ही म्हणाला होतात ना, डॉक्टर साहेब तुम्ही माझ्या मुलाला वाचवलेत एक दिवस तो पण आयुष्यात जे काही बनेल ते तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरिबांची आणि सर्वसामान्यांची सेवा करेल. बाबा काल मला तुम्ही दिलेल्या शब्दांची जाणीव झाली कारण ते रिक्षावाले दादा माझे पाय धरायला खाली वाकले होते. त्यांचा मुलगा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला होता म्हणून त्याला वाचवता आले. जर तो तिथं येण्यापूर्वीच मरण पावला असता तर. मी डॉक्टर आहे, मरण्या पासून कोणाला वेळेत उपचार करून वाचवू शकतो. पण उशीर झाल्याने उपचाराअभावी मरण पावलेल्या पुन्हा जिवंत तर नाही ना करू शकत.
पंचतारांकित हॉस्पिटल मधील टार्गेट पूर्ण करणारे, अवाढव्य डोनेशन भरुन डॉक्टर झालेल्या कित्येक डॉक्टरांमध्ये आजही डॉ. विजय यांच्या प्रमाणे परिस्थितीतील गांभीर्य ओळखून सामाजिक भान जपणारे कित्येक डॉक्टर्स आजही बघायला मिळतात.
(लेखातील नावं आणि प्रसंग काल्पनिक आहेत)
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनिअर
B.E.( mech), DIM,DME.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..