नवीन लेखन...

कॅफे डेस्टिनी

एका मॅट्रिमोनिअल साईटवर दोन दिवस चॅटिंग केल्यानंतर निकिता आणि निखिल दोघे रविवारी संध्याकाळी हॉटेल कॅफे डेस्टिनीला भेटायचे ठरवतात. ठरल्याप्रमाणे निखिल निकिताला भेटण्यासाठी त्याचा मित्र निहारला सोबत घेऊन आणि निकिता तिची मैत्रीण नेहाला सोबत घेऊन येते. चौघांचे हाय – हॅलो झाल्यावर निखिल आणि निकिता हॉटेलच्या वरच्या फ्लोअरवर एकमेकांशी बोलण्यासाठी जातात आणि निहार आणि निकिता तिथेच एका टेबलवर बसून कॉफी ऑर्डर करतात.
निहार : – हाय… मी निहार, निखिलचा बेस्ट फ्रेंड
नेहा : – हॅलो… मी नेहा, निकिताची बेस्ट फ्रेंड.
निहार : – ओके. काय करतेस तू? म्हणजे जॉब वगैरे.
नेहा : – मी एका प्रायव्हेट बँकेत अकाउंटंट आहे. आणि तू?
निहार : – मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. किती अवघड असतं ना असं एकमेकांना अर्धा तास भेटून आपल्या आयुष्यभरासाठीचा निर्णय घेणं? मी तर असा विचार पण करू शकत नाही.
नेहा : – हो रे, खरंच अवघड असतं. मला पण नाही जमणार असा इतक्या पटकन निर्णय घेणं.
निहार : – पण यार, यावेळेस तरी जमलं पाहिजे निखिलचं लग्न. प्रत्येकवेळेस मुलीचा नकार ऐकून निराश झालाय बिचारा. आजकालच्या मुलींच्या अपेक्षाच फार वाढल्या आहेत. कधी यांना मुलगा दिसायला चांगला हवा असतो तर कधी वेल सेटल्ड, मोठया पॅकेजवाला हवा असतो आणि कधी कधी तर हे दोन्ही कॉम्बिनेशन असूनही मुलाला नकार देतात. मुलाचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे, सासू – सासरे नको आणि असतील तर स्वतंत्र राहायचं असतं. मुलगा शहरात राहणाराच हवा. मी तर म्हणतो आकाशातून कुबेर जरी आला ना एखाद्या दिवशी तरी त्याला, “तू दिसायला हँडसम नाही आहेस” म्हणून नकार देतील आजकालच्या मुली. कळतंच नाही नक्की या मुलींना काय हवं असतं
नेहा : – तुझं म्हणणं काही अंशी खरं असलं तरी व्हॉट डू यू मिन बाय आजकालच्या मुली? तुझ्यामते आजकालच्या सगळ्याच मुली अशा असतात का?
निहार :- हे बघ, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता की सगळ्याच मुली अशा असतात, काही अपवादही असतात. पण बहुसंख्य मुलींच्या आजकाल अशाच अपेक्षा असतात. आणि या अशा अवाजवी अपेक्षांमुळे मुलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय.
नेहा : – अच्छा, आणि काय रे आजकालची मुलं काय कमी आहेत का? त्यांच्याही किती अपेक्षा असतात मुलींकडून. मुलगी सुंदर हवी, सुशिक्षित हवी, मॅच्युअर्ड हवी, जॉब करत असेल तर अजून उत्तम आणि जॉब करत असली तरी घर आणि आईवडीलांना सांभाळणारी हवी, सगळा स्वयंपाक यायला हवा. तिला किमान टू व्हीलर तरी चालवता आली पाहिजे. किती किती अपेक्षा असतात तुम्हां मुलांच्या. आणि या इतक्या सगळ्या अपेक्षांमुळे मुलींना डिप्रेशन येत नसेल असं वाटतं का तुला? आणि प्लस मुलींना आईवडिलांचं घर सोडून नवीन घरात आयुष्यभरासाठी नांदायला जायचं प्रेशर असतं ते तर वेगळंच. एवढं सगळं झाल्यावरही सासरचे लोकं चांगले मिळाले तर ठीक, नाहीतर आयुष्याचं वाटोळं होतं.
निहार : – बरोबर आहे तुझं म्हणणं. पण सगळ्याच मुलांच्या इतक्या अपेक्षा नसतात. मी तर म्हणेल सत्तर टक्के मुलांच्या खूप बेसिक अपेक्षा असतात मुलीकडून. चल बाकीच्या मुलींचं सोड, तू तुझ्या अपेक्षा सांग. तुझ्याही याच सगळ्या अपेक्षा असतील ना मुलाकडून?
नेहा : – मी का सांगू आधी माझ्या अपेक्षा? तू एवढं बोलतो आहेस तर तू सांग ना, तू सत्तर टक्क्यातला आहेस का उरलेल्या तीस टक्क्यातला?
निहार : – माझ्या तर अजिबात फार जास्त अपेक्षा नाहीत मुलीकडून. मुलगी एकदम दीपिका पादुकोणच हवी अशीही अपेक्षा नाही, नॉर्मल असली तरी चालेल. जॉबवालीच पाहिजे असंही नाही पण तिला लग्नानंतर जॉब करायचा असेल तर त्यालाही माझा नकार नसेल. स्वयंपाकात एकदम सुगरण पाहिजे असंही नाही. फक्त आईवडीलांचा आणि कुटुंबियांचा आदर करणारी पाहिजे. सणवार आनंदाने साजरे करणारी आणि पाहुणे आल्यावर त्यांचे स्वागत करणारी असावी एवढ्याच अपेक्षा आहेत माझ्या. मी तर माझ्या अपेक्षा सांगितल्या, आतातरी तू तुझ्या अपेक्षा सांग.
नेहा : – माझ्यापण मुलाकडून खूप काही अपेक्षा नाही आहेत. मुलगा मला समजून घेणारा असावा. एकदम दिसायला देखणाच हवा असं काही माझं म्हणणं नाही. खूप मोठ्या पगाराचीही मला अपेक्षा नाही, पण जॉब किंवा बिझनेस जे काही करत असेल ते कष्ट घेऊन करणारा हवा. मुलाचं स्वतःचं घर असावं अशीही माझी अट नाही, मी रेंटच्या घरातही राहायला तयार आहे. सासूसासऱ्यांना सोडून वेगळं राहायची तर माझी अजिबात इच्छा नाही. फक्त मी जशी त्याच्या आईवडीलांची काळजी घ्यावी असं त्याला वाटत असेल तसेच त्याने पण माझ्या आईवडीलांची काळजी घ्यावी एवढी माझी इच्छा आहे. घरी पाहुणे आलेले तर मला आवडतातच. आणि मी अगदी सुगरण वगैरे तर नाहीये पण नॉर्मल भाजी, पोळी, वरणभात, आमटी मला चांगली बनवता येते. आणि हो, पुरणपोळी आणि पिझ्झाही येतो बरं का मला. त्यामुळे नवरा उपाशीपोटी राहणार नाही याची मी खात्री देते. अरे मी एवढी तुझ्याशी बोलते आहे आणि तू काय त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला आहेस?
निहार : – अगं मी तुझं फेसबुक प्रोफाइल शोधलं, त्यात तुझी बर्थडेट पाहून Kundali app मधून आपली कुंडली जुळवून पाहिली. तीस गुण जुळतायेत आपले.
नेहा :- काय? अरे पण तुला माझं आडनाव कुठून कळलं फेसबुकवर शोधायला?
निहार : – काल मला निखिलने सांगितलं होतं. ते जाऊ दे, मला तुला एक गोष्ट सांगायची आणि विचारायची आहे, मला तू आवडली आहेस नेहा, So will you marry me? लग्न करशील माझ्याशी?
नेहा : – अम्म…तसा मलाही तू आवडला आहेस…So yes…yes…yes…!! (तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात.) पण मला एक गोष्ट विचारायची आहे, माझ्या घरच्यांचा तर आपल्या लग्नाला विरोध नसेल पण तुझ्या घरच्यांना असा आपण दोघांनीच घेतलेला लग्न करण्याचा निर्णय मान्य होईल का?
निहार : हो, माझ्या घरच्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट इतकी चांगली सून बघून ते खुशच होतील. आय लव्ह यू नेहा.
नेहा : (लाजून) लव्ह यू टू. (असे म्हणून ते एकमेकांचा हात घट्ट धरतात. तेवढ्यात निखिल आणि निकिता येतात.)
निहार : – काय निखिल जुळलं का नाही तुमचं?
निखिल : – बघू आता, एक – दोन दिवसांत विचार करून सांगतो असं सांगितलं आहे आम्ही एकमेकांना.
निहार : -तुमचं जुळेल का नाही माहित नाही, पण तुमच्या दोघांमुळे आमचं नक्की जुळलं आहे.

(निखिल आणि निकिता आनंदाने एकाचवेळेस ओरडून बोलतात) :- काय सांगता काय?

अभिनंदन

… खूप खूप

अभिनंदन

…!!! चलो पार्टी…अरे पण हे सगळं इतकं अचानक घडलं कसं?

नेहा आणि निहार त्या दोघांना थँक्स म्हणून एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात, हे आमच्या डेस्टिनीमध्ये लिहिलेलं होतं म्हणून घडलं.
–By Sandip
तुम्हांला जर ही माझी “छोटीशी कथा” आवडली असेल तर पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..