नवीन लेखन...

ब्लड प्रेशर मॉनिटर

आपल्या शरीरातील रक्ताचे अभिसरण करण्याचे कार्य हृदय करीत असते.  हृदय हा एक प्रकारे नैसर्गिक पंपच असतो.  ऑक्सीजनने परिपूर्ण असे रक्त जर शरीरात फिरत राहिले नाही, तर आपण कुठलीही क्रिया करु शकणार नाही.

जसे सायकलच्या चाकातील हवा ट्यूबवर एक प्रकारचा दाब टाकीत असते तसेच रक्तही जेव्हा वाहिन्यांमधून फिरते तेव्हा त्याचा भित्तिकांवर दाब पडतो, त्यालाच रक्तदाब म्हणतो. हा रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढला तर रक्तवाहिन्या फुटण्याचा धोका असतो. त्यामुळेच रक्तदाब मोजणे गरजेचे असते. जास्त रक्तदाबाला हायपरटेंशन तर कमी रक्तदाबाला हायपोटेंशन म्हटले जाते. सिस्टॉलिक हा कमाल तर डायस्टॉलिक हा किमान रक्तदाब असतो. हे आकडे १२०/८० असे असायला हवेत.

रक्तदाब मोजण्यापूर्वी लघवीला जाऊन यावे. नंतर ५ मिनिटे न बोलता शांत बसल्यानंतर रक्तदाब मोजावा.

अजूनही स्फिग्मोमॅनोमीटरने रक्तदाब मोजला जातो पण नवीन डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटरवर आपल्याला रक्तदाब मोजता येतो. ॲ‍नरॉईड प्रकारची उपकरणे ही एकट्याला वापरणे अवघड असल्याने तसेच त्यात वारंवार रीडिंगचे सेटिंग करावे लागते. त्यामुळे डिजिटल स्फिग्मोमॅनोमीटर वापरणे अधिक योग्य असते. त्यात एक धाग्यांची बनवलेली पट्टी असते त्याला एलसीडी पॅनेल जोडलेले असते.

रक्तदाब मोजताना ती पट्टी हाताच्या दंडाजवळ गुंडाळली जाते व नंतर एक आवाज येतो, तो इलेक्ट्रिक मोटरचा असतो. छोट्याशा पंपाने ती पट्टी फुगवली जाते व नंतर हवा सोडलीही जाते. त्यातून सिस्टीलिक व डायस्टॉलिक हे रक्तदाबाचे आकडे एलसीडी पडद्यावर दिसतात.

काही उपकरणांना मेमरी असते त्यामुळे ते रक्तदाबाच्या आकड्यांची नोंदही ठेवतात, त्यामुळे ते रक्तदाबात दिवसाला, आठवड्याला काय बदल होतो ते कळते.

हे डिजिटल यंत्र वापरताना शरीराची हालचाल केल्यास आकडे चुकतात, त्यात बॅटरी वापरलेली असते शिवाय काही यंत्रे ही डाव्या हातालाच वापरता येतात, अशा काही मर्यादा त्यात आहेत. डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटरमध्ये ऑसिलोमीटरचा तसेच सेन्सर्सचा वापर केलेला असतो.

स्फिग्मोमॅनोमीटरचे सुधारित रुप पहिल्यांदा ऑस्ट्रियाचे सॅम्युअल सिगफ्रेड रीट व्हॉन बाख यांनी तयार केले. त्यात सिपिओन रिवा रोसी यांनी आणखी सुधारणा केल्या. पहिला स्वयंचलित ब्लड प्रेशर मॉनिटर सेमूर लंडन यांनी अमेरिकेत तयार केलाय.

— राजेंद्र येवलेकर
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..