नवीन लेखन...

भारताच्या ‘डेटा’ सुरक्षेकरता ५-जी नेटवर्कमध्ये चीनी कंपन्यांचा प्रवेश थांबवा

 

तैवानने नुकतेच सुरक्षेच्या मुद्द्यावरून चिनी कंपनी हुवावे आणि झेडटीईच्या नेटवर्क, मोबाईल व अन्य उत्पादनांवर बंदी घातली. अमेरिका, ब्रिटन, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने हुवावे व झेडटीईविरोधात याआधीच अशी पावले उचलली आहेत. १७० देशांत काम करणार्या हुवावेला हा एक मोठा झटका आहे. हुवावेच्या चीफ फायनान्शियल ऑफिसर मेंग वानझोऊ यांना अमेरिकेने काही आठवड्यापूर्वी कॅनडात बेड्या ठोकल्या. जगातील कित्येक देशांनी हुवावेवर बंदी घातली आहे, असे म्हणत तैवानी सरकारने आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तैवान आणि चीनमधील वाद नवा नाही. चीनच्या मते तैवान हा त्यांचाच भाग आहे.तैवानवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी लष्करी कारवाईची धमकीदेखील चीनने कित्येकवेळा दिली आहे.

चिनी कंपन्या हुवावे झेडटीईच्या माध्यमातून हेरगिरी करण्याचा आरोप

तैवानसह अन्य देशांकडून चिनी कंपन्यांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमागे अनेक कारणे आहेत. आपल्या उपकरणांच्या वस्तूंच्या, यंत्रांच्या माध्यमातून चीनने हेरगिरी करण्याचा आरोप अनेक देशांनी लावला आहे. सध्याचे जग माहिती आणि इंटरनेट वापराचे आहे. चिनी उत्पादनांमुळे सायबर सुरक्षेला धोका उत्पन्न होत असून सायबर हल्ल्यांत वाढ झाल्याचा आरोपही अनेक देशांनी केला आहे. हुवावे आणि झेडटीई कंपनीवर चिनी सरकारचे नियंत्रण आहे. आपल्या देशांतील गोपनीय माहिती चीनपर्यंत पोहोचू नये, अशी या देशांची इच्छा आहे. म्हणूनच हुवावेवर प्रतिबंध लादल्यात आले आहेत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने आपापल्या देशातील ५-जी नेटवर्क उभे करण्यासाठी हुवावे व झेडटीईच्या भागीदारीवर बंदी घातली आहे. अमेरिकेत सॉफ्टवेअर वायरलेस कंपनी स्प्रिंट कॉर्पने याआधीच हुवावे आणि झेडटीईला बाजूला सारले आहे. ब्रिटनच्या बीटी ग्रुपने ३-जी आणि ४-जी नेटवर्कमधून हुवावेच्या उपकरणांना हटवले आहे. सोबतच ५-जी नेटवर्कच्या विकासामध्ये हुवावेचा वापर केला जाणार नाही. आता चिनी कंपन्यांवरही जगातील अनेक देश संशय घेत आहेत.

सायबर हल्ल्याच्या भितीने अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी

सायबर हल्ल्याच्या शक्यतेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सायबर सुरक्षेला संभाव्य धोका पोहोचवू शकतील, अशा सर्व विदेशी टेलिकॉम कंपन्यांशी व्यवहारांवर सरसकट बंदी घातली आहे. दोन्ही देशांमधील व्यापारयुद्ध मोठा भडका घेण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. याला अजून एक कारण म्हणजे अमेरिकन कम्युनिकेशन सिस्टिमला हॅक करण्यासाठी सायबर हल्लेखोर संधीच्या शोधात असल्यामुळे अमेरिकेने चीनची दूरसंचार कंपनी असलेली ‘हुवावे’वर अमेरिकेत बंदी घातली. ‘हुवावे’ ही जगातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून ‘फाइव्ह जी’ मोबाईल तंत्रज्ञानातही अग्रेसर आहे.

चीन आमचे तंत्रज्ञान चोरतो, गैरफायदा घेऊन व्यापाराचा अधिक लाभ मिळवतो याशिवाय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चीन आपल्या देशातील नागरिकांवर पाळत ठेवू शकतो, असे अमेरिकेला वाट्ते. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी, ‘हुवावे’ कंपनीने चीनच्या लष्कराला टेहळणी करण्यास उपयुक्त ठरतील, अशी काही उपकरणे त्यांच्या यंत्रणांमध्ये बसवली असल्याचा आरोप केला आहे. हे खरे आहे का?चीनचे आर्थिक आणी तंत्रद्यान क्षेत्रातिल वर्चस्व कमी करण्याचा सुध्दा हा प्रयत्न असु शकतो.

ट्रम्प प्रशासनाने ‘हुवावे’चा ‘एंट्री लिस्ट’ मध्ये समावेश केला आहे. ‘एंट्री लिस्ट’ ही अशा कंपन्यांची यादी आहे, ज्यांना सरकारी परवानगीशिवाय अमेरिकन कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.

जगात तंत्रज्ञान वर्चस्वाची लढाई

चीनची उत्पादने स्वस्त असल्यामुळे त्यांचा संपूर्ण जगात दबदबा आहे. इंटरनेटसाठीचे मोडेम, संगणकातले अनेक सुटे भाग, त्यासाठीच्या विविध जोडण्या व अंतर्गत जोडणी यंत्रणा, संगणकांसाठी डिजिटल कॅमेरे अशा अनेक वस्तू चीन स्वस्तात पुरवठा करतो. यामुळेच कुठल्याही देशांच्या वस्तूंपेक्षा चीनच्या वस्तूंना भारतात व जगभरात जास्त मागणी आहे. अमेरिकेच्या बंदीनंतर अमेरिकास्थित गुगलनेही ‘हुवावे’ला अॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिममधील काही गोष्टी वापरण्यास प्रतिबंध केला आहे. यामुळे ‘हुवावे’च्या स्मार्ट फोनमधून गुगलसंबंधित युट्यूब आणि गुगल मॅप्ससारखे अॅप गायब होणार आहेत. याशिवाय ‘हुवावे’ला गुगलकडून कोणताही तांत्रिक पाठिंबा मिळणार नसल्याचे गुगलने जाहीर केले आहे. ट्रम्प प्रशासनाचा आग्रह आहे की चीनने तंत्रज्ञानाची चोरी करणं बंद करावी.

ब्युरो ऑफ इंडस्ट्री अॅण्ड सिक्युरिटी’च्या परवान्याशिवाय ‘हुवावे’च नाही, तर कुठलीही विदेशी टेलिकॉम कंपनी आता अमेरिकेत तंत्रज्ञानाची विक्री अथवा हस्तांतरण सहजासहजी करू शकणार नाही. भविष्यातही काही युरोपीय देशांतही ‘हुवावे’चा मार्ग प्रशस्त नसेल. ‘हुवावे’ वर डेटाचोरीचे, बँकेतील रकमांची मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्याचेही गंभीर आरोप आहेत. पण, ‘हुवावे’ने हे सर्व आरोप फेटाळून लावत आपल्या कंपनीचे अस्तित्व चीन सरकारपासून स्वतंत्र असल्याचाच दावा केला आहे. पण, अमेरिकेच्या या आणीबाणीनंतर ‘हुवावे’वर सहजासहजी विश्वास ठेवायला कोणताही देश धजावणार नाही.

भारताने काय करावे

आज जागतिक लोकसंख्येपैकी ५६.१ टक्के नागरिक इंटरनेटशी जोडलेले आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रांतील इंटरनेटचा सक्रिय सहभागही दिवसागणिक वाढतोय. पण, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात याच महाजालाच्या माध्यमातून सायबर हल्ल्यांच्या दहशतीनेही कहर केला.२०१८ साली सायबर हल्ल्यांची संख्या तब्बल ५०० दशलक्ष इतकी प्रचंड होती. खाजगी तसेच सरकारी संकेतस्थळांवरील सायबर हल्ल्यांमुळे जगभरातील देशांना  मोठी झळ बसली. याला महासत्ता अमेरिकाही अपवाद नाहीच. २०१६च्या ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील कथित रशियन हस्तक्षेप, केम्ब्रिज अॅनालिटिकाची डेटाचोरी, ज्युलियन असांजचे ‘विकिलिक्स’ आणि अशी बरीच सायबर चोरी, घुसखोरी आणि हल्लेखोरीची प्रकरणे जागतिक पातळीवर गाजली. त्यातूनच धडा घेऊन भारताने देखिल माहिती चोरीकडे गंभिरपणे बघायला हवे.

‘हुवावे’ ही चिनी कंपनी भारतात ५-जी तंत्रज्ञान रुजविण्यासाठी इच्छुक आहे. पण, या कंपनीच्या व्यावसायिक चेहर्याआड चीनला भारतातील डेटावर हुकूमत गाजवायची आयती संधी मिळू शकते. तसेच, या कंपनीच्या माध्यमातून चीन भारतातुन डेटाचोरी करू शकतो, महत्त्वाचे दस्तावेज हस्तगत-उद्ध्वस्त करेल आणि एकूणच भारताचे सायबर विश्व  चिनच्या विळख्यात जखडले जाईल, म्हणून जगातिल अनेक देशांनी ‘हुवावे’ला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणतात , ‘डेटा हेच या युगातील पेट्रोल आहे.’ म्हणजे, एकतर या पेट्रोलमुळे आगही भडकू शकते किंवा अर्थव्यवस्थेवर नियंत्रणही प्रस्थापित करता येऊ शकते. म्हणून आपल्या देशातील हा बहुमूल्य डेटा चीनसारख्या शत्रु राष्ट्राच्या हाती देण्यात कुठलाही शहाणपणा नाही. ‘हुवावे’ला हाकलवून दिल्यामुळे चीनला आता अब्जावधींच्या तोट्याचाही भार सहन करावा लागेल.यामुळे त्यांची आर्थिक प्रगती मंदावेल.

‘डेटा’चा रिमोट कंट्रोल भारतिय कंपन्याकडेच असावा

मात्र‘हुवावे’ ला हद्दपार केल्यामुळे भारताच्या तंत्रज्ञान बाजापेठेवरही त्याचे विपरीत परिणाम दिसू शकतात. आपल्याला ‘हुवावे’ ऐवजी इतर तंत्रज्ञान सेवापुरवठादारांचा पर्याय शोधावा लागेल, जो तुलनेने कमी दर्जाचा व महागडाही ठरू शकतो. त्यामु ळे ‘५-जी’च्या विकासप्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यताही आहे. तसेच ‘हुवावे’ वर अवलंबून असलेल्या लहानमोठ्या भारतिय कंपन्या तसेच ग्राहकांचेही नुकसान होऊ शकते. पण, इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत जगात दुसर्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशाला देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण, ‘हुवावे’ ५-जी प्रणाली भारतातही आणण्यासाठी इच्छुक आहे. २०२० पर्यंत जिओ(किंवा ईतर भारतिय कंपनी) भारताला ५-जी तंत्रज्ञानाने व्यापून टाकेल, असा एक अंदाज टेलिकॉम क्षेत्रातही वर्तविला जातो. आजघडीला ‘डेटा’ हीच सर्वोच्च शक्ती आहे. त्यामुळे या ‘डेटा’चा रिमोट कंट्रोल विदेशी कंपन्यांच्या हातात जाणार नाही, यासाठी सायबर सुरक्षा, सतर्कता यांना आगामी सरकारला प्राधान्यक्रम द्यावाच लागेल.

चीनमध्ये आलेल्या आर्थिक मंदीचा वापर करून पुढच्या पाच वर्षामध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवला पाहिजे आणि 2025 पर्यंत एक ५ ट्रिलियन डॉलर एवढी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे .यामुळे भारत आणि चीन मध्ये असलेली तफावत भरून काढण्यास आपल्याला मदत मिळेल आणि अर्थातच यामुळे आपल्या संरक्षणाकरता मिळणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा वृद्धी होईल आणि देश अजून जास्त सुरक्षित करण्यास आपल्याला मदत मिळेल.

—  ब्रिगेडियर हेमंत महाजन

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..