नवीन लेखन...

बाळक्रीडा अभंग क्र.३४

आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥
खेळ मांडियेला यमुनेपाबळी । या रे चेंडुफळी खेळू आतां ॥२॥
आणविल्या डांगा चवगुणांतू काठी । बैसोनिया वाटी गडिया गडी ॥३॥
गडी जंव पाहे आपणासमान । नाही नारायण म्हणे दुजा ॥४॥
जाणोनि गोविंदे सकळांचा भाव । तयांसी उपाव तो चि सांगे ॥५॥
सांगे सकळांसी व्हा रे एकीठायीं । चेंडू राखा भाई तुम्ही माझा ॥६॥
मज हा नलगे आणीक सांगाती । राखावी बहुती हाल माझी ॥७॥
माझे हाके हाक मेळवा सकळ । न वजा बरळ एकमेका ॥८॥
एका समतुके अवघेचि राहा । जाईल तो पाहा धरा चेंडू ॥९॥
चेंडू धरा ऐसे सांगतो सकळा । आपण निराळा एकलाचि ॥१०॥
चिंतूनिया चेंडू हाणे ऊर्ध्वमुखे । ठेली सकळिक पाहातचि ॥११॥
पाहातचि ठेली न चलता काही । येरू लवलाही म्हणे धरा ॥१२॥
धरावा तयाने त्याचे बळ त्यासी । येरा आणिकांसी लाग नव्हे ॥१३॥
नव्हे काम बळ बुध्दि नाही त्याचे । न धरवे निचे उंचाविण ॥१४॥
विचारी पडिले देखिले गोपाळ । या म्हणे सकळ माझ्यामागे ॥१५॥
मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥
चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय माग पाहोनिया ॥१७॥
या मागे जे आले गोविंदा गोपाळ । ते नेले शीतळ पंथ ठाया ॥१८॥
पंथ जे चुकले आपले मतीचे । तया मागे त्याचे ते चि हाल ॥१९॥
हाल दोघा एक मोहरा मागिला । चालता चुकला वाट पंथ ॥२०॥
पंथ पुढिलांसी चालता न कळे । मागिलांनी डोळे उघडावे ॥२१॥
वयाचा प्रबोध विचार ज्या नाही । समान तो देही बाळकांसी ॥२२॥
शिकविले हित नाईके जो कानी । त्यामागे भल्यांनी जाऊ नये ॥२३॥
नये ते चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥२४॥
रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥
लाज सांडूनिया मारितील हाका । कळले नायका वैकुंठीच्या ॥२६॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची ॥२७॥
गोपाळांचा धांवा आइकिला कानी । सोयी चक्रपाणि पावविले ॥२८॥
सोयी धरूनिया आले हरिपाशी । लहान थोरांसी सांभाळिले ॥२९॥
सांभाळिले तुका म्हणे सकळही । सुखी झालें तेही हरिमुखे॥३०॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

Avatar
About धनंजय महाराज मोरे 42 Articles
धनंजय महाराज मोरे हे कीर्तन, प्रवचन, भागवत कथा वाचन, आळंदी ते पंढरपूर दिंडी चालक, असून त्यांचे मोबाईल वर चालणारे धार्मिक सॉफ्टवेअर गुगल प्लेस्टोर वर आहेत. ते धार्मिक संत साहित्य व आध्यात्मिक साहित्य या विषयांवर लिहितात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..