Web
Analytics
बाळक्रीडा अभंग क्र.२८ – Marathisrushti Articles

बाळक्रीडा अभंग क्र.२८

नारायण भूतीं न कळे जयांसि । तयां गर्भवासी येणें जाणें ॥१॥
येणें जाणें होय भूतांच्या मत्सरे । न कळता खरे देव ऐसा ॥२॥
देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ देहबुद्धी ॥३॥
बुध्दीचा पालट नव्हे कदा काळी । हरि जळी स्थळी तया चित्ती ॥४॥
चित्त ते निर्मळ जैसे नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥
तयामाजी हरि जाणिजे त्या भावे । आपले परावे सारिखे चि ॥६॥
चिंतने तयाच्या तरती आणीक । जो हे सकळिक देव देखे ॥७॥
देव देखे तो ही देव कैसा नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥८॥
काया वाचा मने पूजावे वैष्णव । मनी शुद्ध भाव धरूनिया ॥९॥
यांसि कवतुक दाखविले रानी । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥१०॥
गोपाळांसि डोळे झांकविले हाते । धरिले अनंते विश्वरूप ॥११॥
पसरूनि मुख गिळियेले ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥
संधि सारूनिया पाहिले अनंता । म्हणती ते आता कळलासी ॥१३॥
कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥
तो तया कळला आरुषां गोपाळा । दुर्गम सकळा साधनांसि ॥१५॥
शीण उरे तुका म्हणे साधनाचा । भाविकासि साचा भाव दावी ॥१६॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

About धनंजय महाराज मोरे 42 Articles
धनंजय महाराज मोरे हे कीर्तन, प्रवचन, भागवत कथा वाचन, आळंदी ते पंढरपूर दिंडी चालक, असून त्यांचे मोबाईल वर चालणारे धार्मिक सॉफ्टवेअर गुगल प्लेस्टोर वर आहेत. ते धार्मिक संत साहित्य व आध्यात्मिक साहित्य या विषयांवर लिहितात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…

Whatsapp वर संपर्क साधा..