नवीन लेखन...

बाईपण..

बाईपण म्हणजे काय हे बाईला समजले पाहिजे. पुरुषांना आपला पुरुषार्थ गाजवावा लागतो. अगदी तसेच बाईला बाईपण निभावून न्यायला लागते. म्हणजे किमान नम्रता. शालीनता. चारित्र्य. त्याग.संयम.सुगरण.स्वच्छता टापटीप. अशा अनेक गोष्टी असतात. शिवाय माया प्रेम आपुलकी. बांधिलकी निष्ठा यादी खूप मोठी आहे आणि हे सगळे अगदी काटेकोरपणे पाळणे शक्य नसेल तर किमान थोडे बहुत असणे आवश्यक आहे नव्हे गरजेचे आहे…

स्वच्छता टापटीप हे उपजतच असतात तिच्यात पण उगाच पाट्या टाकल्या म्हणून असे होत नाही. साध उदाहरण कपडे धुणे आणि वाळत घालणे. आता हे सगळे मशीन वर आहे पण वाळत घालतांना फटकणे. आणि व्यवस्थित रितीने वाळत घातलेले कपडे सुद्धा बघावेसे असे आणि परत ते घालावेसे वाटले पाहिजेत. नाहीतर नाडी लोंबकळत. बाह्या उलटसुलट. विजारीचे दोन भाग आतबाहेर. आणि किती तरी कपडे यांचे सगळेच उलटसुलट. आणि वरुन घड्या घातल्या गेल्या त्याच प्रमाणे तर काय होते ते सांगायची गरज नाही..आणि हातात करंट असते की काय असे वाटते कारण प्रत्येक वस्तू खाली पडणारच. भाजणे. बोट कापणे. वगैरे नेहमीच.
आता स्वयंपाक करणे म्हणजे जबाबदारी. पार पाडणे एवढेच नसते. साधा स्वयंपाक भाजी भाकरी भात वरण चटणी कोशिंबीर हे सुद्धा चांगले रुचकर असले तरी चालते. भाजी चिरणे निवडणे फोडणीस टाकणे. आता तेल किती घालायला लागते. नतंर मोहरी जिरे हिंग
कडिपत्ता किती कसे घालायचे हे सगळं माहित असायला हवे. नाहीतर फोडी की फोड. तेलात आणि कडिपत्ता यात घालून लगेचच न वाफवता तांब्या भर पाणी घालून शेंगदाण्याचे कूट भाजीत की कुटात भाजी हे समजत नाही. आणि पानात वाढताना भाजी बिचारी जागेवर आणि तिचा रस्सा सोडून पार घरंगळत गेला. भाकरी म्हणजे काय एकच खावा गप्प राव्हा अशी परत मागायचे नाही. एवढी वजनदार. पोळी वरचे ब्युटी स्पॉट्स लहान मोठे पाहून ग्रहगोल आठवतात. आता बाकीचे सगळे कसे असतील हे जाणून घ्या. वाढणे म्हणजे बापरे. आणि इतर कामात तर एकदम भारी घर झाडणे. घरातील चालणे बोलणे एकसारखेच. बाईच चालण असे नखऱ्याच
की घरातील फर्निचर ही लटपट कापतात. आणि यांच्या पायाला हाताला गुडघ्याला धडकतात आणि वरुन त्यांना रागाने लाथ बसते ते वेगळेच हे सगळे जास्त प्रमाणात आहे पैसे घेऊन काम करणाऱ्या गृहसेविकात. भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व
बाई म्हणून लागणारे हे सगळे गुण नसतील तर काय होईल त्या घराची हालात. मग ती घरातील असो की पैसे देऊन लावलेली बाई असो. हे कल्पनेने रंगवलेले नाही तर पाहिले आहे अनुभवले आहे. त्यामुळे बहिणाबाई म्हणतात ते बरोबर आहे. तुला दिले रे देवान दोन हात दहा बोटे. थोड्या दिवसांसाठी आपल्या पिला साठी घरटं बांधणारी तिला म्हणतात सुगरण.

सौ कुमुद ढवळेकर
All reactions:
219

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..