नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

ध्यास

अंतरी स्नेहलभाव असावा मनी नसावी असुया कटुता निर्मल मैत्रसहवास घडावा भक्ती प्रीतीचा छंद जडावा…. संस्कारी अमृतात भिजावे हॄदयी सत्यप्रकाश पडावा संतत्वाच्या जळात डूंबता जीवनाचा सत्यार्थ कळावा…. जन्म मानवी संचित युगांचे सत्कर्मी सदा जगत रहावा चैतन्याचा आत्माच हरिहर ध्यास जीवा त्याचा असावा…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र.२८९ ७ /११ /२०२२

विठु वाळवंटी

आली माऊली विट्ठलाचे भेटी नाचे परब्रह्म आनंदे वाळवंटी..।।धृ।। आषाढ़ी कार्तिकी चाले दिंडी धावते मोदे संतांची पालखी हरिदास टाळमृदंगे नाचनाचती…।।१।। तुळसीमाळ गळा गंध कपाळी मुखे हरीनाम गरजे आसमंती नेत्री राणा पंढरिचा लागे भेटी…।।२।। सोहळा सुखाचा चंद्रभागेतीरी जीवाजीवासंगे गुंतला विठ्ठल अंतरी उरला केवळ जगजेठी…।।३।। गाभारी, साक्ष द्वैत अद्वैताची निष्पाप, गळाभेट वैष्णवांची रूपडे सावळे नाचते वाळवंटी…।।४।। — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

लळा जिव्हाळा

लळा जिव्हाळा आता तोंडदेखला बेगडीच प्रेमास्था हीच खंत मनाला…. दुभंगलेली नाती हा शाप जीवाला निष्प्राण संवेदनां प्रीतभाव आटलेला…. प्रश्न कोण कुणाचे मनामनास पडला…. जीणेच केविलवाणे काय सांगावे कुणाला…. मन:शांतीवीना दूजे ? कां? स्वास्थ्य जीवाला अंतर्मुख होवूनी जगावे आळवित दयाघनाला…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २८६ ५/११/२०२२

भावशब्द

शब्दातुनी उमललो शब्दासंगे रांगलो खेळलो बागडलो शब्दातुनी नाहलो… स्पर्शता शब्दभावनां अंतरातुनी दंगदंगलो शब्दाशब्दांचा अर्थ उलगडित राहिलो.. शब्दांचेच ब्रह्मांड मी वेचित राहिलो गुच्छय संवेदनांचे मी माळीत राहिलो… शब्दशब्द संजीवनी प्रीतवात्सल्य प्राशिलो भावशब्दात पावित्र्य निष्पाप व्यक्त जाहलो… जाणुनी शब्दार्थ सारे अंतर्मुख होत राहिलो शब्द कृतार्थी, सांत्वनी गीतात गुंफित राहिलो… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २८५ ४/११/२०२२

सत्य

सांगा कुणी पाहिला देव तो त्राता जो तारतो, सकल जीव सृष्टीला सत्य अटळ भोग भोगणे प्रारब्धाचे कधीतरी चुकले कां सांगा कुणाला सातत्याने नीजकर्म करीतची रहावे त्याविण दूजा आनंद नसे जीवाला यत्न प्रामाणिक साक्षात रूप देवत्वी स्मरावे क्षणाक्षणाला अनामिकाला सत्कर्मी संकल्पाचीच कांस धरूनी निर्मोही जावे सामोरे या प्रारब्धाला मनामनातील भाव निर्मल निरागस मोक्षानंदी घेवुनी जाती पैलतीराला — […]

तिन्हीसांजा

सांजवेळ ही मनोहर स्मरणगंधलेले अंबर सुरम्य क्षितिज केशरी अस्ताचे लाघवी झुंबर उजळता तिन्हीसांजा वृंदावनी ज्योत सुंदर क्षण शांत सुखविती संस्कारी दर्शन सुंदर अगम्य प्रकाश मंदमंद मांगल्याचे भाव सुंदर गाभारी प्रभा निर्मली सात्विक साक्षात्कार पुण्यप्रदी तिन्हीसांजा समाधिस्त आत्मसुंदर लोचनी उद्याची प्रभात भूपाळी हरि श्यामसुंदर — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र.२८३ ३/११/२०२२

ध्यासभास

मना ध्यास तुझा भास चराचरात स्पर्श तो कृपाळू झुलवीतो आनंदात… वेल भावप्रीतीची नाहतेच दवबिंदूत सुगंध फुलाफुलांचा कोवळ्या ऋतुऋतुत…. गुणगुणता प्रीतरावा उमलते अंतरी गीत आभाळ भावनांचे दाटते मनामनांत…. श्वास अधीर बावरे ओघळती लोचनात मोहोळ ते लाघवांचे आळविते भावगीत…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २८२ ३/११/२०२२

स्मरणगंध

तव बकुळफुलांच्या सुगंधात अजुनही मी विरघळतो आहे.. कां? या प्रश्नाला उत्तर नाही भाग्यच भाळीचे भोगतो आहे.. तव लडिवाळ स्मरण गंधाळ चराचरातुनी दरवळतो आहे.. काय, काय, कसे विसरावे याच संभ्रमी मी जगतो आहे.. घुसमट विरही असह्य जीवा मनआभाळही गहिवरले आहे.. तव बकुळफुलांच्या सुगंधात अजुनही मी विरघळतो आहे.. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २८१ २/११/२०२२

प्रेमस्पर्ष

मुरलीधरा वाजीव रे मुरली जीवसृष्टी सारी आसुसलेली… सुर वेणुचे दशदिशा उजळती खगगण, मंजुळ स्वरे गाती… गोकुळीची जित्राबे गोधूली तुझ्याच ओढ़ी हंबरत येती… झुळझुळती मोदे वृक्षवल्ली मीरा, राधा भक्तिगीत गाती… स्वर तव मुरलीचे मनोहारी प्रेमस्पर्शे जीवास जगविती — वि.ग.सातपुते. (भावकवी) (9766544908) रचना क्र. २८० २/११/२०२२

येरे मना, येरे मना

येरे मना, येरे मना नको जावू दूर, दूर, दूर येथे नाही रे आता जीवाला हुर, हुर, हुर…..।।धृ।। सोडूनी दे रे, ते तुझे नवे, नवे बहाणे सोडूनी दे रे ते तुझे आज इथे अन उद्या तिथे झुळझुळणाऱ्या वारुसंगे नकोस उधळू दूर, दूर, दूर….।।१।। चल पाहू या रे विवेकी सुंदर गांव चल घेवूया या रे शांती सुखाचा श्वास […]

1 6 7 8 9 10 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..