मर्मबंधी रेशीमगाठी
बेधुंद दरवळता गं गंधबकुळी अजूनी होतो सारा भास तुझा मनहृदयी अलवार बिलगणारा अविस्मरणीय, तो स्पर्श तुझा किती? काय? कसे स्मरावे धागे आठवांचे किती उसवावे मर्मबंधीच साऱ्या रेशीमगाठी उलगडता, सहजी भास तुझा भावगंधले ते स्पर्श मयूरपीसी अव्यक्त! सारे झरते शब्दांतूनी उमलताच लाघवी प्रितकळ्या लोचनी घट्टमिठीचा भास तुझा ब्राह्ममुहूर्तीची ही मधुरम स्वप्ने गोकुळी राधामीरा कृष्णसखा मंतरलेल्या साऱ्या कातरवेळी […]