नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

क्षण

क्षण तोच धुंद , बेभान अस्तित्वा हरवुनी गेला मी , तू सहज विसरूनी मिठितच गुंतवुनी गेला तो सोहळाच प्रीतस्पर्शी अंतरंगी विर्घळूनी गेला तादात्म्य ! भाव निर्मळी स्वत्वास ! समर्पूनी गेला तोच अवीट स्पर्शानंद श्वासास सजवुनी गेला खेळ साराच संचिताचा जन्म , हा कृतार्थ झाला –वि.ग.सातपुते ( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१८६ ३/८/२०२२

अनामिक हुरहुर

सौख्य, समृद्धीच्या पंखाखाली जरी निश्चिंती, मी सदैव जगलो… तरीही अव्यक्त हुरहुर अनामिक स्मरणगंध सारे उसवित राहिलो… उसवीणे ते, आनंदी आत्मरंगले धागे सारे शब्दात गुंफित राहिलो… प्रीतभावनांचे पदर ते दवभरलेले गीतात, नित्य आळवित राहिलो… तरीही अजुनही हुरहुर अनामिक आत्मारामा अंतरी शोधित राहिलो… हुरहुर जरी ती, तरीही शांती सुंदर मनास माझ्या समजावित राहिलो… साक्षी, उभी अंगणी प्रसन्न बकुळी […]

अनामिक

मी आजही अलवार जीवापाड कुरवाळतो काहुर अव्यक्त वेदनांचे मनोमनी शांत सुखावतो.. जे लाभले भाग्य ललाटी ते निमुटपणे मी भोगतो घेवुनीया व्रत सत्कर्माचे मी जगती विवेके जगतो.. जन्म गतजन्मांचेच कर्म ओंजळीत घेवुनी जगतो हिशेब साराच पापपुण्णी चित्रगुप्त तो चोख ठेवतो.. कावडीच सुखदुःखांच्या सोबती घेवुनी मी चालतो सरतातही क्षण जीवनाचे नकळे मज कोण सावरतो.. सारेसारेच अगम्य अतर्क्य केवळ […]

भावशब्दी गीता

तव स्मरणांचे गीत होते तूच गीता शब्दभावली तूच, प्रेरणा संवेदनांची भावशब्दात प्रसवलेली तुझ्या निरागस लोचनी भावप्रीती ओथंबलेली सोहळे रम्य ऋतुऋतुंचे लाजती मोदे तव गाली नभांगणी कृष्ण सावळा तू पावरी अंतरी घुमलेली तूच सुगंधा दरवळणारी ममहॄदयी या गंधाळलेली हवे काय, अजुनी जीवनी तुझ्या स्मरणी मती गुंतली क्षणक्षण ही अधीर स्पंदने तव भेटीसाठी आसुसलेली –वि. ग. सातपुते. ( […]

निश्चिंत

तूच अशीच निश्चिंत रमलीस इथे क्षणभर वृक्षातळी हे वृंदावन लोचनी याच निरंतर पानोपानी झुळझुळ गंधसुगंधा ती अनावर धुंदला शीतल गारवा स्पर्श रेशमी, अलवार प्रचिती सारी आल्हादी आसमंत सारे मनोहर भावप्रीती मिठीत घ्यावे ही ईछ्या मनी आजवर –वि.ग.सातपुते.( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१८१ २९/७/२०२२

सांगता

तुझी अशी तटस्थता अन ही, निःशब्दता सारेच सांगुनी जाते नित्य तुज आठविता न केला कधी दुराग्रह स्वप्नी तुझ्याच जगता सावरले क्षणाक्षणाला विरहही तुझा सोसता विवेकी संयमी जगतो अश्रु प्राशिता प्राशिता असे हे भाग्य भाळीचे झेलितो तुज आठविता अंतरीचे अस्तित्व तुझे बळ देते जगता जगता सरले जरी आयुष्य सारे तुझ्या आठवात सांगता — वि.ग.सातपुते ( भावकवी ) […]

सत्यभास

तू विसावलीस क्षणक्षण जेथे तो वृक्षही तुझीच वाट पाहतो पानोपानी तुझा स्पर्श लाघवी अजुनही अविरत झुळझुळतो शहारणारा, मस्त धुंद गारवा तनामनाला, अलवार झोंबतो तू अशी ही कोमली नार सुंदरा तुझ्या रुपात, माहोल शृंगारतो नको नां, आता खेळू जीवाशी त्या वृक्षातळी मीही वाट पाहतो जीवनी, प्रीती एक ब्रह्मसुखदा साक्षात्कार, जीवाजीवा भावतो नाते अगम्य राधेचे अन मुरलीचे सत्यभास, […]

संस्कार

अनेक जन्मानंतर मानवी जन्म मिळतो असे म्हणतात. सृष्टितील सर्व जीवसृष्टित मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवी जन्म मानला जातो परमेश्वराने माणसाला विवेकबुद्धी, वाचा, स्मरणशक्ती, श्रद्धा, भक्तिप्रीती, वात्सल्य, जिव्हाळा, निःस्पृहता, निर्मलता, विश्वास, त्याग, कृतज्ञता, नम्रता, परोपकार, साहस अशा अनेक सुसंस्कारी संस्कारशक्ती जन्मताच प्रदान केल्या आहेत. त्याच संस्करण होण म्हणजे संस्कार!! संस्कार हे करून होत नाहीत ते घडावे लागतात […]

जगणे

नकळत लोपले प्रहर , प्रहर रूप प्राचीचे पश्चिमी ढळलेले उभी यामिनी क्षितिजावरती तरीही जगणेच नाही कळलेले कळीकळीने मुक्त गंधाळावे हेच सृष्टिचे , सत्यरूप रंगलेले निर्माल्याचे , वरदान सजीवा तत्व निर्मोही चराचरी रुजलेले देतादेता सर्वस्वी मनी सजावे अंती आठवावे सारे जगलेले ओसंडिता अंतरी क्षण आनंदी उधळावे तृप्त जीवन मंतरलेले — वि.ग.सातपुते ( भावकवी ) 9766544908 रचना क्र. […]

पावित्र्य

सांगु कसे मनांतरीचे अव्यक्त, ते गुज मी तुझ्या साऱ्या आठवांचे क्षण स्मरतो सदैव मी श्वासात या भास तुझा स्वप्नातही जागतो मी छळते मज रात्र सारी विरघळतो तुझ्यात मी जाहलाच सराव आता तुजवीणही जगतो मी घायाळ अंतरीचे उसासे तवस्मृतीत, सावरतो मी नि:शब्दी जरी भावप्रीती जाणतो मौनी पावित्र्य मी — वि.ग.सातपुते ( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१७५ २१ […]

1 15 16 17 18 19 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..