नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

‘प्रताधिकार’च्या नावानं चांगभलं

आजकाल सर्वांना आयतं हवं, स्वतः काहीही न लिहिता दुसऱ्याचं लेखन स्वतःच्या नावावर खपवणारे व स्वतःला लेखक म्हणवून घेणारे, उदंड झाले आहेत. परदेशात काॅपीराईटचा भंग केल्यास, शिक्षा आहे. भारतात अजून तरी सवलत आहे. त्याचा फायदा अजून काही वर्षं तरी, ही मंडळी घेणारच!! […]

‘सुंदरा’ मनामंदी भरली

एखाद्या अभिनेत्रीला तिच्या कारकिर्दीत एकाच चित्रपटाने ओळखलं जातं, असा हंसा वाडकरचा चित्रपट होता.. ‘सांगत्ये ऐका’!! पुण्यामध्ये तब्बल १३१ आठवडे चाललेल्या या विक्रमी चित्रपटाची ‘ऐतिहासिक नोंद’ झालेली आहे. […]

मायमराठीचा भाषाप्रभू

‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’ व ‘राजसंन्यास’ या पाच नाटकांतूनच राम गणेश गडकरी, हे किती थोर नाटककार होते हे समजते. […]

वो भारत देश है मेरा

आज सकाळीच सोसायटीच्या मैदानावर, झेंडावदनाची तयारी चालू झालेली दिसली. ते पाहून मला माझे शाळेचे दिवस आठवले. पहिली ते चौथी, मी सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेत होतो. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला, सकाळी सात वाजता गणवेशामध्ये झेंडावंदन होत असे. कार्यक्रम संपल्यावर मुलांना चाॅकलेट्स वाटली जात असत. शाळेच्या फाटकातून बाहेर पडताना. झेंडे, खिशाला लावायचे बॅज, झेंड्याची भिरभिरं विकणारे […]

‘नारायण’चं ‘सत्य’

आत्ताचं जीवन हे, ‘रेडी टू कुक’ झालंय. कुणालाही स्वतःहून हातपाय हलवण्याची इच्छा नाही. कष्ट, तडजोड, संघर्ष, संकटं कशाला म्हणतात हे देखील माहीत नाही. अवास्तव अपेक्षा ठेवल्याने शेवटी त्यांच्या पदरी नैराश्यच पडतं. […]

सावित्रीची लेक

१२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले व पुणे शहराची अपरिमित हानी झाली. हजारो कुटुंबांचे संसार वाहून गेले. त्या पुरामध्ये डेक्कन परिसरात आपल्या आईसोबत राहणाऱ्या पारू या तरुणीचं घरही वाहून गेलं. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या भिल्ल समाजातील पारूला लहानपणापासून शिक्षणाची ओढ होती. ती लहान असतानाच वडिलांचे निधन झाल्यावर आईने तिला घेऊन पुणे गाठलं. धुणी भांड्यांची कामे करुन […]

चहाच्या चवी

कोणी शेजारी पाजारी, पाहुणे रावळे आले की, घेणार का? असं न विचारता पहिल्यांदा चहाच होतो.. रविवारी सकाळी उशीरा उठल्यावर चहा, जेवण देखील उशीराच होतं.. दुपारी डुलकी झाली असेल तर, उठल्यावर चहाच लागतो. […]

नानाऽ करते

विजया मेहतांच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या व्यावसायिक नाटकात त्याने सत्तारची भूमिका साकारली तर ‘पुरुष’ या नाटकात, गुलाबराव साकारला.. ‘पुरुष’ नाटक सादर करताना काही अतिउत्साही प्रेक्षक नानाचेच संवाद ऐकण्यासाठी इतर कलाकारांच्या सादरीकरणाचे वेळी थिएटरमध्ये गोंधळ घालायचे, अशावेळी तो व्यथित होत असे. […]

भरत-भेट

शुटींग सकाळी आठला सुरु झालं होतं.. मला जायला थोडा उशीर झाला.. तोपर्यंत भरत जाधवचा सीन शूट झालेला होता.. साधा झब्बा व धोतर नेसलेल्या अभिनेत्याची व माझी, ती दुसरी ‘भरत-भेट’ होती. […]

छडी रे छडी

वसुधाला, वसंतरावांच्यात झालेला हा अचानक बदल सुखावत होता.. त्यांनीही वसंतरावांना, मनापासून साथ देण्याचे ठरविले. […]

1 15 16 17 18 19 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..