नवीन लेखन...
Avatar
About सुरेश कुलकर्णी
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

रात्र अजून भिजत होती !

…… तशा हि परिस्थितीत शशांकचे लक्ष गादीजवळच्या लाईटच्या पोलवरील ‘पोल क्रमांक १७’ने खेचून घेतले. जणू ‘आहे ना लक्षात हा क्रमांक?’ हाच प्रश्न तो हि शशांकला विचारत होता! जन्मजात एक पाय विकसित न झालेलं, दोन्ही डोळ्याच्या पापण्या नसलेलं कुरूप मुलं शशांक(आणि शिखातरी) कस सांभाळणार होता? म्हणून त्याने शिखास ‘मृत मुलं’ जन्मले म्हणून सांगितले होते. […]

रुद्रा – कादंबरी – भाग १०

मनोहरने हात डोक्याच्यावर ताणून मोठा आळस दिला. आपला हरामखोर बाप कुबेर आहे आणि त्याचा काटा परस्पर काढायचाय हे त्याने जेव्हा नक्की केले,तेव्हा त्याचा घरातील बित्तंबातमी हाती असणे आणि ती पुरवणारी व्यक्ती हुडकणे गरजेचे होते. […]

रुद्रा – कादंबरी – भाग ९

राघवने राकेशला जसवंतचे फिंगर प्रिंट्स डेड बॉडी वरील प्रिन्टशी जुळवून पाहण्यास सांगून फोन कट केला. कॉफी मगात राहिलेल्या कॉफीचा शेवटचा सिप घेतला. काही क्षण विचार केला. मोबाईल उचलला. […]

रुद्रा – कादंबरी – भाग ८

बदल्याची आग घेऊन मनोहर संतुकरावांचा माग काढत मुंबईत पोहंचला. जमेल त्या प्रकारे त्याने संतुकरावची सखोल माहिती काढली,आणि समोर जे आले ते अविश्वसनीय होते! […]

वाचक !

जेव्हा ‘मुख-पुस्तकावरी'(याला हल्ली मराठीत फेसबुक म्हणण्याचा प्रघात आहे.) ‘लाईक’ न देऊन आमुची लायकी दाखवायला वाचकांनी सुरवात केली, तेव्हा आम्ही हबकलो. भिडे खातर येणारे बदाम सुद्धा बंद होऊ लागले! मग मात्र वाचकांना -तुला पाहतो रे -म्हणण्याची पाळी आली. मुळात ‘वाचक’ म्हणजे कोण?आणि काय? तसेच त्यांचे प्रकार कोणते? हे पहाणे आमच्या साठी अगत्याचे होऊन बसले. […]

वेडा घुम्या !

लहानपणा पासून मी कमी बोलणारा आणि एक्कलकोंडा आहे. लोक माझी खिल्ली उडवतात मला पाहून खिदी -खिदी हसतात. मला वाईट वाटत. मग मी त्यांच्या पासून दूरच रहातो. माझ्या अश्या वागण्याने घरचे लोक मला ‘घुम्या’ म्हणू लागले , मग बाहेरचे पण याच नावाने बोलावू लागले! आज माझी हीच ओळख आहे. घुम्या !! […]

रुद्रा – कादंबरी – भाग ७

रुद्राला सुपारी दिल्या पासून मनोहर त्याच्यावर लक्ष ठेवून होता. रुद्राच्या फ्लॅट समोरच्या टपरीवर चहा, जवळच्या ‘बनारस पान महल’ मध्ये पान -तंबाखू. आणि कोपऱ्यावरच्या वडापावच्या गाड्यावर क्षुधा शांती!  […]

रुद्रा – कादंबरी – भाग ६

मेसेज मध्ये केवळ पाच सेकंदाची व्हिडीओ क्लिप होती! रुद्राला दरदरून घाम आला! तो खून करताना त्याने संतुकरावांच्या तोंडावर दाबलेल्या हाताची ती क्लिप होती! त्यात फक्त त्याचा चेहरा दिसत नव्हता. नसता ती क्लिप त्याला फासावर चढवण्यास पुरेशी होती!  […]

रॉक ! …. (लघुकथा)

राकेशने ‘त्या’ कामा साठी दहा डिसेम्बर हि तारीख ठरवून टाकली.तेव्हा कोठे त्याला थोडे हलके वाटले.  हवी असलेली पूर्व तयारी,(म्हणजे प्लॅनिंग ) झाली होती. आता फक्त अम्मलबजावणी! […]

रुद्रा – कादंबरी – भाग ५

‘अब्जाधीश संतुकराव सहदेव यांची हत्या! — (आमच्या क्राईम रिपोर्टर कडून) – संतुकराव सहदेव (६५) हे ‘चहा साम्राज्याचे ‘अधिपती यांची त्यांच्या ‘नक्षत्र’ नामक बंगल्यात हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांचा मृत देह त्यांच्या आउट हाऊस मध्ये सकाळी त्यांच्या वॉचमनला आढळला. […]

1 7 8 9 10 11 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..