नवीन लेखन...
Avatar
About सतिश चाफेकर
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

अजरामर महाराष्ट्र गीताचे लेखक राजा बढे

राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. शाहीर साबळे यांनी तर त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे अजरामर ‘ महाराष्ट्र गीत ‘ गायले. […]

माझा मित्र सतीश भिडे

अखंड भारताच्या घोषणांनी मसुरी, नैनितालची थंडी गायब. देशातील अब्दुल -नारायण – डिसुझा हाच भारताचा मालक असून, खरा धर्म हा केवळ राष्ट्रधर्म आहे असे कळकळीचे आवाहन वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे ह्यांनी नुकतेच मसुरी, नैनिताल येथे केले. […]

माझा मित्र कवी प्रवीण दवणे

नुकतेच प्रवीण दवणेचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले , त्यापैकी एकाचे प्रकाशन दुबईमध्ये झाले. ‘ आमी ‘ नावाची आखाती देशांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यांनी मिळून पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा दुबईत नुकताच झाला झाला .,तेथे प्रवीण दवणेचा ‘ नवी कोरी सांज या मराठी कविता संग्रहाचे प्रकाशन झाले , त्या कवितांचे वाचन तिथे झाले तेव्हा सर्व जणांनी त्याला उस्फुर्त प्रतिसाद दिला. […]

कवी, गीतकार प्रवीण दवणे

अनेक कविता प्रवीण दवणे यांनी लिहिल्या दुर्देवाने का सुदैवाने तो कुठल्याही कंपूत सामील झाला नाही हे महत्वाचे . आजही त्याचा कार्यक्रम झाला की तो तिथून निघतो , नंतरचा अंक नसतो , म्हणून संयोजकांना तो परवडतो. पाकीट घेतले, झोळी घेतली की निघाला इतका प्रक्टिकल . कार्यक्रम झाला आता ‘ बसू ‘ हा सर्वमान्य प्रकार त्याच्या आयुष्यात नाही , कारण तो कधीच स्वतःला ‘ संपवणारी ‘ कामे करत नाही . तो तसे करत नाही म्हणून तो आजही भरपूर लिहितो, टीकाकार काहीही बोलो त्याला काहीही फरक पडत नाही , फरक टीकाकार यांनाच पडतो कारण त्याच्यावर जळण्यातच त्यांची शक्ती खर्च होते. […]

८ वी ड – भाग ३

मुलाला-मुलीला नवीन गणवेश आणला नाही म्हणून बातमी आपण वाचतो तर कधी शाळेत बाईनी बाकावर उभे केले याचा राग, संताप किवा लाज वाटल्यामुळे एखादा आत्महत्या करतो. […]

चित्रकार रायबा

रायबा यांची जुन्या मुबईचे चित्रण असलेली चित्रमालिका खूप लोकप्रिय झाली. त्यांनी कॅनवासच्या ऐवजी ज्यूट म्हणजे पोत्याचा वापर केला. त्यांनी काहीसे भडक रंग वापरून ती चित्रे रंगवली होती. त्यातून मुबईचे बहुरंगी स्वरूप प्रकट होत असे. ज्यूट आणि कॅनव्हासवर चित्रे काढता काढता त्यांनी म्युरल्स म्हणजे काचेवरील चित्रे काढायला सुरवात केली. त्यांची अनेक म्युरल्स एअर इंडिया , सिडनी विमातळावर , अशा अनेक ठिकाणी आहेत . इजिप्तच्या म्युझियममध्ये रायबांची चित्रे जशी पाहायला मिळतात तशी ती नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक संग्रहालयात आणि महाराष्ट्रात नागपूर येथेही आहेत. […]

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू बापू नाडकर्णी

बापू नाडकर्णी हे खऱ्या अर्थाने ऑल राऊंडर स्पोर्स्टमन होते , ऑल राऊंडर होते. ते कॉलेजमधून स्टेट लेव्हलला टेनिस खेळले . क्रिकेट खेळतच होते. नॅशनल लेव्हलला बॅडमिंटन खेळले , खो-खो , टेबल टेनिस हे सर्व खेळ खेळले . इतकेच नव्हे ते अभ्यासामध्येही ग्रेट होते . […]

८ वी ड – भाग २

कालपरवाची गोष्ट आहे. रंगपंचमीच्या आदल्या दिवसाची ८ वी मधला मुलाला सांगितले, “अरे रंगीत पाण्याचे फुगे फोडू नको, पोलीस पकडतात.” तेव्हा तो म्हणाला काही पकडत नाहीत, अमुकतमुक आरोपी राजकीय नेता आहे त्याला उमारकैद झाली आहे तरी तो बाहेर आहे, काही होत नाही. […]

मराठी संपादक पां. वा. गाडगीळ

पां . वा . गाडगीळ हे पहिले मराठी संपादक आहेत. जे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक होते. दिल्लीला जाणं-येणं त्यांना न झेपणारं होतं. तरीसुद्धा प्रेस कौन्सिलची एकही बैठक गाडगीळसाहेबांनी कधीही चुकवली नाही. बैठक एका दिवसाचीच असायची. त्या बैठकीला समितीच्या सदस्याला निवासस्थानाहून यायला गाडी असायची. गाडगीळ त्यावेळच्या महाराष्ट्र सदनात राहायचे. प्रेस कौन्सिलचे कार्यालय समोरच्याच फुटपाथवर त्यावेळी होते . त्यावेळी प्रेस कौन्सिलतर्फे आलेली गाडी ते परत पाठवायचे आणि चालत जायचे आणि चालत परत यायचे. […]

८ वी ड – भाग १

शिक्षक मुलांना शिकवता शिकवता बरेच काही मुलांकडून शिकतो, अर्थात तो हे कबूल करणार नाही. काही प्रमाणिक शिक्षक मात्र हे कबूल करतीलच. मुळातच शिक्षकाने सर्वप्रथम स्वतःचा ‘अहं’ बाजूला ठेवला पाहिजे. […]

1 39 40 41 42 43 45
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..