नवीन लेखन...

८ वी ड – भाग ३

मुलाला-मुलीला नवीन गणवेश आणला नाही म्हणून बातमी आपण वाचतो तर कधी शाळेत बाईनी बाकावर उभे केले याचा राग, संताप किवा लाज वाटल्यामुळे एखादा आत्महत्या करतो. अर्थात २०२१ मध्ये वातावरण अत्यंत अलग आहे, हे माझे शिक्षक म्ह्णून आलेले अनुभव सुमारे १९१७ च्या आधीचे आहेत असे अनेक प्रसंग आपल्या वाचनात येतात, थोडी चर्चा होते आणि मग परत सारे सुरु. अनेकांच्या मनात आपण आत्महत्या करावी असे येते तसे होत नाही . परंतु ती भावना कुठेतरी धुमसत असते. कोणी मुलगा एकदम आत्महत्या करत नाही तर कुठेतरी तिरस्कार, भिती, राग साचत आलेला असतो. अर्थात याचे भान त्याचे भान त्याच्या पालकांना, शिक्षकांना नसते करण कुणाकडे इतका वेळाही नसतो. घटना घडून गेलेली असते. जो परिणाम होणार असतो तो मुलाच्या मनावर झालेला असतो. म्हणून मुलाला शिक्षा करू नये किंवा तो मागेल ते त्याला आणून देणे हा उपाय नाही. त्याला समजावणे हे महत्वाचे असते. शिक्षक, पालक कुठेतरी कमी पडत आहेत असे वाटते का हा प्रश्न उभा रहातो. हल्ली मुले खूप हुशार झाली आहेत. ती अनेक प्रकारच्या माध्यमामुळे त्याचप्रमाणे अनुकरण करणे किंवा दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे नाही ही भावना मुलामध्ये असतेच, परंतु अनेक माध्यमामधून प्रलोभने त्यांना काय सर्वांनाच दाखवली जातात ते तर कोण बंद करू शकत नाही कारण मार्केटींगच्या वाढत्या प्रभावाला कोणीच रोखू शकणार नाही आणि शेवटी आपणच ठरवायचे असते काय हवे आणि काय नको ते.

सर्वप्रथम आपण आपल्या मुलावर किती अन्याय करतो आहे आहे हे बघितले पाहिजे. अगदी साधी गोष्ट आहे, एखाद्या मुलाला एक शर्ट आवडला तर पहिली प्रतिक्रिया असते आता नको मग घेऊ पगार झाला की किंवा पैसे आले की. आता क्लासची फी भरायची आहे. मुलगा ऐकतो परंतु असे अनेक वेळा होऊ लागले की तो विचार करतो सगळे खर्च घरात होतात मग मलाच का नाही, किंवा शेजारचा मुलगा चांगले बूट घालतो, कपडे घालतो हे सर्व तो बघत असतो नकळतपणे तो आतल्याआत धुमसत असतो. कधीकधी उलटेही होते नेहमी त्या मुलाचा हट्ट पुरवला जातो पण एखाद्यावेळी तो पुरवला जात नाही आणि मुलगा असे वेडेवाकडे कृत्य करतो. मुलामधील ही समांतर रेषा शोधणार कोण. हा प्रश्न उभा रहातो. जर मुलाला लहानपणापासून चांगले वाचनाचे, छोट्या गोष्टींच्या पुस्तकांचे छंद लावले तर त्याला ओढ कदाचित कपड्याची न लागता पुस्तकाची लागेल. परिणामी तो एखादा शर्ट नाही मिळाला तर अडून बसणार नाही. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची पुस्तके वाचून वाचून त्याचे मन निश्चित विचारी बनते, काय चांगले? काय वाईट? ह्यातला फरक कळू लागतो.

पुस्तके म्हणजे काय संवाद असतो स्वतःचा आणि लिहिणाऱ्याच्या प्रतिमेचा. जर सततच्या वाचनाने किंवा विचाराने मुलगा अशा मागण्या करणारच नाही असे नाही परंतु त्याची सहनशक्ती वाढेल. मुलामध्ये सहनशक्तीचा अभाव असल्यामुळे असे कृत्य करायला ती धजावतात. आपण काय करतो ह्याचे भान नसते फक्त त्याच्या मनामधल्या धुमसणाऱ्या रागाला ती वाट करून देतात प्रतिक्रियेमध्ये आणि ही प्रतिक्रिया आत्महत्या, आत्मक्लेश!

ह्यासाठी पालकांनी मुलांना शांतपणे समजावले पाहिजे. परंतू त्याआधी त्याचे मन समजूतदार बनवणे आवश्यक आहे त्यासाठी आधीपासून तयारी करावी लागते ती म्हणजे मुलाकडून चांगली पुस्तके, आत्मचरित्रे जी मुलाच्या वयाला झेपतील ती वाचून घेतली पाहिजेत. तात्पर्य त्याला वाचनाचा छंद पाहिजेच कारण तो वाचनाने योग्य विचार करायला शिकतो. एखादी गोष्ट नाही मिळाली की हात सुरीने कापून घेणारा मुलगा मी पहिला आहे, आईच्या झोपेच्या गोळ्या घेणारी मुलगी पाहिली आहे त्याचे मतपरिवर्तन किंवा स्वभाव परिवर्तन करण्यास वेळ लागतो हे माहित आहे, परंतु काही मुले अचानक कृती करून टाकतात ती त्यांना घातक ठरते मग चर्चा होतात, बातम्या येतात, अर्थात हवे ते लवकर मिळत नाही हे लहान मुलांना कळले पाहिजे. आपण त्यांना हवे ते आणून देतो आणि इथेच घोळ होतो. आपण नक्की काय करत आहोत आणि याचा काय परिणाम होईल याची त्यांना अजिबात कल्पना नसते पुढे पुढे हे वाढत जाते.

हल्ली मॉडेल म्हणून काम करणाऱ्या मुली आत्महत्या करतात कारण हेच अपयश सहन करण्याची मानसिक ताकत त्याच्यात नसते. जे यशस्वी असतात त्याच्यात ती ताकत निश्चित असते म्हणून ते नीट राहू शकतात. त्यानाही हवे ते मिळतेच असे नाही परंतु त्याच्याकडे संयम हा असतो आणि असावाच लागतो. लहानपणी रिमोटचा वापर करून हवे ते बघता येते पण इथे मात्र रिमोट नाही तर संयम हवा तो असेल तर एस मिळतेच मिळते अर्थात काहींना मिळत नाही तेव्हा त्यांनी स्वतःला तपासून पहावे आपण आपल्या कुवतीपेक्षा जास्त अपेक्षा करत आहोत का?

मुलाचेही पण तेच आहे फक्त त्यांना स्वतःला समजत नाही, समजावे लागते आणि हे समजावणे घरातून, वाचनातून, घराच्या वातावरणातून तो हळूहळू शिकतो. अनुकरण करणे ही लहान मुलाची मानसिकताच आहे फक्त तो कसे वागतो, कसा विचार करतो हे बघितले पाहिजे. पालकांनी, शिक्षकांनी त्याचा आरसा होणे आवश्यक आहे. अर्थात हे हल्ली कठीणच आहे म्हणा किंवा मुलाला लवकर समज येईल असे संयमी, सयंत वातावरण घरात ठेवले पाहिजे. तरच मुलामध्ये फरक पडेल नाहीतर बटन दाबले की हवे ते मिळते ही भावना वाढीला लागून मुलगा नको त्या गर्तेत जाईल.

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..