नवीन लेखन...

८ वी ड – भाग ७ – कार्ट आणि मुलगा

संघर्ष! कुणाला चुकला आहे मुंगी पासून माणसापर्यंत सर्वांना आहे. अगदी लहान शाळकरी मुलांना देखील करावा लागतो. याचा अंदाज शिक्षकांना, पालकांना खरोखर आहे का? हा प्रश्न मनात आला की त्याचे उत्तर हो असेच असणार. कालच माझी एक विद्यार्थिनी भेटली, म्हणाली मुलगा ५ वीमध्ये आहे. खूप अभ्यास आहे आणि इतर आहेच, आणि आत्ता हे ‘इतर’ जे काही हे ‘पालकसापेक्ष’ असते असेच म्हणावे लागेल. आपल्या मुलाला चित्रकलेचा क्लास, स्पेशल गणिताचा क्लास, झालेच तर डान्सचा क्लास. तो एकटा मुलगा किवा मुलगी किती किती झेलणार याचा कुणी विचार केला आहे का? आज मुलांना अभ्यास का मोठा वाटतो ह्याचा विचार कधी केला आहे का? अभ्यास मोठा नसून स्पर्धा मोठी आहे असे दिसून येते, अपेक्षापण मोठ्याच असतात, आपल्या मुलाने सर्व काही करावे, रिकामे बसू नये असे अनेक पालकांना वाटते. त्याचे खेळणे, टीव्ही बघणे, भटकणे अनेकांच्या नजरेत खुपते. मग मुलांचा खरा संघर्ष सुरु होतो. अभ्यास आणि इतर यांची सांगड घालता घालता ते मेटाकुटीला येतात. अनेक विचारवंत, तज्ञ बर्‍याच गोष्टी सांगतात, मुलांना बंधने टाकू नये, किंवा आणखी काही, परंतु मुलगा जर भलतेच करत असेल तर जे त्या घरामधील पालकांना पटत नसेल किवा त्यांच्या घराच्या ‘संस्काराला’ धरून नसेल तर काय करायचे. आता ज्याच्या त्याच्या घरामधील वातवरण कसे असेल याचा विचार कोणी केला आहे का? साधे उदाहरण घेऊ काही घरात काही महिने कांदा, लसूण वर्ज असते. पण मुलाला किवा मुलीला आवडत असेल तर? हे मी अगदी साधे उधारण दिले. तर तो मुलगा तेच मागू लागला तर? त्याला माहीत आहे ते घरात मिळणार नाही मग मार्ग कुठला तर, बाहेर मित्रांबरोबर खाणे, आणि त्याने ते केले, ते घरी कळले. आत्ता त्या घरामधील वातावरण कसे होईल, कदाचित मुलाचे बंड मोडलेही जाईल परंतु तो मोठा झाल्यावर, कॉलेजमध्ये गेल्यावर तो त्याला हवे ते करणार, पण घरच्यांच्या नकळत, त्याचे हे बीज मात्र लहानपणीच रुजेलेले असते हे लक्षात ठेवावे. हे साधे उदाहरण आहे अशी अनेक प्रकारची उदाहरणे आपल्याला सापडतील. लहानपणी साध्या साध्या दबलेल्या गोष्टी कुठेतरी दबा धरून बसलेल्या असतात, हे आपणच स्वतःचे आत्मपरीक्षण केले तरच जाणवेल.

आत्ता पाचवीचा अभ्यास किती असणार, जर मुलाला वाटेल तिथे न गुंतवता अभ्यास आणि खेळणे करू दिले तर त्या अभ्यासाचे ओझे कुणालाच वाटणार नाही. परंतु मुलाच्या वाट्याला खरा वेळ येतो का, क्लास लावतात परंतु पालकांना असा क्लास हवा असतो जिथे तो मुलगा चागला दोन-तीन तास बिझी राहिला पाहिजे. एक तास चाललेला क्लास नको असतो. एक तासात काय होणार. अशी त्यांची धारणा असते. जर नीट विचार केला तर ६ ते ८ तासात शिक्षक पाचवीचा एका विषयाचा अर्धा परीक्षेचा भाग शिकवू शकतो, परंतु तो हळूहळू शिकवतो कारण मुलाच्या लक्षात राहिले पाहिजे. परंतु तो तसे करत नाही, त्या मुलाला स्वतःला स्वतःशी वेळ देणे आवश्यक असते. परन्तु त्याचे ते हळूहळू शिकवणे काही पालकांना पटत नाही, कारण तो फी देत असतो म्हणजे शिक्षकाला विकत घेत असतो अशी काही पालकांची भावना असते. ह्याचा सर्व परिणाम मुलावर होत असतो.

सतत मुलाने अभ्यास करावा असे पालकांना वाटते, काही मुले करतात, तर काही बंड करतात आणि पुढे कोडगी होतात. जी मुले अभ्यासात कमी असतात, घाबरट असतात त्यांची अवस्था भयानक होत असते, अशी कितीतरी गोंधळलेली मुले पाहिली आहेत की परीक्षेच्या वेळी भेदरलेली असतात. त्यांचे तुम्ही ब्लड प्रेशर पाहिले तर खूप फरक जाणवेल. त्यांचे हात अक्षरशः गार पडलेले असतात, त्यांना भयमुक्त किवा समजावणे हे पालकांचे आणि शिक्षकाचे काम असते आणि त्या भीतीमुळे ती हमखास गाणित या विषयात येत असले तरी गोंधळ करतात. तर काही जण ‘पाठ’ केलेली उत्तरे विसरतात. तशी काही मुले चाणाक्ष असतात, त्यांना समजत असते की आपण पेपर लिहिताना एखादा प्रश्न नाही आला तर तितकी जागा मोकळी ठेव्तात, जोड्या लावा, वाक्यात उपयोग करा, गाळलेल्या जागा भरा आणि उरलेले शेवटचे काम, शेवटच्या दहा मिनिटात करतात. मला अशी गुरु मुले भेटली आहेत. ती कुठल्याच संघर्षाला मागे पडत नाहीत.

एकदा एक मुलगा पेपर घेऊन आला, काठावर पास झाला होता. तो पास होणे मुश्कील होते, पण झाला कसा हे त्याचा पेपर बघितल्यावर कळले. त्याने गाळलेल्या जागा किवा जोड्यासाठी वरचा फोर्मुला वापरला, शेवटची दहा मिनिटेचा उपयोग केला. त्याने भन्नाट चावटपणा केला होता. कोणतेही सहा प्रश्न लिहा असे दोन तीन प्रश्न असतात, विशेषतः इतिहास ह्या विषयात. त्याला सर्व प्रश्न येत नव्हते. त्याने जे येते त्याची उत्तरे लिहिली, अर्थात ती मोठी होती, त्यामुळे तो प्रश्न दुसर्‍या पानावर गेला, दुसऱ्या शेवटच्या पानावर त्याने तोच प्रश्न लिहिला जरा शब्द बदलून, शिक्षकाने घाईघाईने त्यालाही मार्क दिले. सहा प्रश्न झाले त्याची बेरीज शिक्षकाने लिहिली, शेवटच्या पुरवणीमध्ये दुसऱ्या प्रश्नाच्यावेळी तोच प्रकार. दुसर्या पेपरला त्याने टीपा द्या मधली टीप दोनदा लिहिली, त्यालाही मार्क मिळाले. मी त्याला मारूही शकत नव्हतो, आणि ‘क्या बात है’ असे म्हणूही शकत नव्हतो. हा फोर्मुला मग सर्व मुलाच्या मनात फिट बसला. अशी हे बुद्धिमान मुले असतात राव, हे मला दिसले आणि एक गोष्ट मनात पक्की बसली जर मुलांच्या मनाने एखादी गोष्ट करायची म्हटली की ती करतातच. काही मुले घाबरत असतात पण त्यांना प्रोत्साहन अशी बिनधास्त मुले देतात, आपले आज्ञाधारक कार्टे कधी हातातून कधी गेले हे पालकांना कधीच कळत नाही. कळते तेव्हा ते हैराण होतात, मग तोंड दाबून बुक्कीचा मार सहन करावा लागतो. मुलांनी ठरवले तर ते कसाही मार्ग काढू शकतात परंतु ती वेळ का येऊ द्यायची, म्हणून आधीच अपेक्षांचा डोंगर उभा करू नका. लेट्स देम एन्जॉय.

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..