ज्येष्ठ दिग्दर्शक दिनकर द. पाटील
आपल्या या संवाद लेखनाचे इंगीत सांगताना, स्वत: दिनकरराव म्हणत, ‘मेळ्याचे संवाद लिहिताना संवाद लेखनाची गुरूकिल्ली सापडली. संवाद कलापथक-नाटक अथवा चित्रपटातले असोत, ते बोलीभाषेत लिहावेत, ऐकता क्षणीच प्रेक्षकांना कळलं पाहिजे. भालजी पेंढारकरांच्या साध्या-सोप्या-खटकेदार संवादाची छाया माझ्या संवादलेखनावर पडली आहे. त्यामुळे या क्षेत्रातले ते माझे गुरू आहेत.’ असे आवर्जून ते कबूल करताना आणि संवाद-लेखनाचे महत्त्व पटवून देताना गुरूबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करत असत. […]
