नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

बॉम्बे टू गोवा चित्रपट

पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील ‘देखा ना हाय रे सोचा ना हाय रे’ हे गाणं. १९७२ साली मेहमुद यांनी त्याचा भाऊ अनवर अली व अमिताभ बच्चन यांच्या साठी एस. रामनाथन यांच्या निर्देशनाखाली यांच्यासाठी नितांत सुन्दर कॉमेडी बॉम्बे टू गोवा हा सिनेमा कढला होता. […]

टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा

ग्रॅज्युएट झालेल्या जमशेदजींना युरोप, इंग्लंड, अमेरिका येथे जाऊन आल्यावर समजलं की इंग्लंडचं वर्चस्व असलेल्या कापड उद्योगात खरंतर भारतानं मुसंडी मारली तर प्रचंड संधी उपलब्ध होतील.त्यादृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. सुरुवातीला एकवीस हजार रुपये भांडवल गुंतवून जमशेदजींनी त्यांची पहिली कंपनी स्थापन केली. पुढे काही बंद पडलेल्या तेल गिरण्या, कापड गिरण्या विकत घेऊन, विकून त्यांनी उद्योग वाढवण्यास प्रारंभ केला. […]

मेहता पब्लिशिंग हाउसचे अनिल मेहता

१९८६-८७ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसचा व्यवसाय खूपच लहान प्रमाणात होता. काही मोठे प्रकाशक त्या वेळी डॉमिनेटिंग स्टेजला होते. तसंच आपणही मराठी प्रकाशन व्यवसायात आपलं वेगळं स्थान निर्माण करायला हवं असं ध्येय ठेवून ते व्यवसाय वाढवत गेले. पुढे मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाउसच्या माध्यमातून प्रकाशन आणि वितरण क्षेत्रात भरारी घेतली. […]

विनोदी अभिनेते भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदम

मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात. […]

जागतिक श्रवण दिन

कर्णबधीरता व श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी तसेच श्रवणशक्तीचा काळजी घेण्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठीच तीन मार्च हा दिवस जागतिक स्तरावर श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. […]

शालिवाहन शक संवताची सूरवात

हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. […]

उत्क्रांतिवादाचा जनक चार्ल्स डार्विन

चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्सयफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. […]

सुप्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे

कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत. […]

विनोदी लेखक, नाटककार तारक मेहता

‘दुनिया ने उंढा चष्मा’ या नावाचा त्यांचा मूळ गुजराती स्तंभ प्रचंड लोकप्रिय ठरला होता. स्तंभलेखन, नाट्यलेखनही त्यांनी केले होते. गुजराती रंगभूमीवरही ते लोकप्रिय होते. ‘सब’ वाहिनीने २००८ पासून तारक मेहता यांच्या लोकप्रिय सदरावर आधारित एका मालिकेची सुरुवात केली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेद्वारे एक वेगळीच दुनिया आणि तारक मेहता यांच्या लेखणीतून साकारलेले कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. […]

जेष्ठ विनोदी अभिनेते मधु आपटे

बोबडे बोल हा एकमेव गुण असुनही केवळ त्यावर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट करणारे मधू आपटे हे एकमेव कलावंत असतील. मधुकर शंकर आपटे हे मधू आपटे यांचे पुर्ण नाव. […]

1 83 84 85 86 87 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..