ज्येष्ठ दिग्दर्शक वसंत पेंटर
वाङ्मयीन कथा ही चित्रपटासाठी आवश्यक असते कारण ती शाश्वत असते, ही वसंतरावांची महाराष्ट्र फिल्म कंपनीपासून पक्की झालेली भावना. त्यानुसार त्यांनी प्रसिद्ध ग्रामीण कादंबरीवर ‘टिळा लाविते मी रक्ताचा’ हा ग्रामीण चित्रपट दिग्दर्शित केला. जयश्री गडकर, सूर्यकांत, राजशेखर यांनी कामे केलेला हा चित्रपट गाजला. यानंतर परत अण्णाभाऊंच्या कादंबरीवर वसंतरावांनी ‘वारणेचा वाघ’ हा चित्रपट केला. तोही यशस्वी झाला. द. का. हसबनीस या साहित्यिकाने लिहिलेला, ४२च्या स्वातंत्र्य चळवळीवरील ‘सुगंधी कट्टा’ हा तमाशाप्रधान चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. पण ‘पाच नाजूक बोटे’ या लोकप्रिय लेखक बाबा कदम यांच्या कथेवरील रहस्यमय चित्रपट होय. यानंतर मात्र वसंतरावांनी स्वत:ची चित्रपटनिर्मिती सुरू केली. बाबा कदमांच्याच कथेवर त्यांनी ‘दगा’ हा चित्रपट काढला. ‘ग्यानबाची मेख’ हा विनोदी चित्रपट काढला. […]
