जेष्ठ संगीतकार रोशन
रोशनलाल नागरनाथ उर्फ रोशन यांनी लहानपणीच प्रसिद्ध गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर बालगायक म्हणून संपूर्ण भारत दौरा केला होता. त्यांचा जन्म १४ जुलै १९१७ रोजी पाकिस्तानातील गुजरानवाला येथे झाला. पुढे उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी वर्षभर काढले. पण अल्लाउद्दीन खाँ साहेबांची त्यांच्या शिकवण्याव्यतिरिक्त आठ तास रियाझ करण्याची कडक शिस्त न मानवल्याने पळ काढला. त्यानंतर लखनौच्या मॉरिस संगीत […]
