नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

पं. त्र्यंबकराव जानोरीकर

भेंडीबाजार घराण्याचे गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांचा जन्म १३ जुन १९२१ रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षी पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांनी ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचेकडे पुणे येथील गंधर्व महाविद्यालयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यापुढील बारा वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली व संगीताचा कसून रियाझ केला. पटवर्धनबुवांच्या सांगण्यावरून ते तबला, हार्मोनियम व इतर वाद्येही शिकले. तसेच अहमदनगमध्ये व रत्नागिरीत […]

गझलसम्राट मेहंदी हसन

गझलसम्राट मेहंदी हसन यांचा जन्म १८ जुलै १९२७ रोजी राजस्थान येथे झाला. मेहंदी हसन यांनी गायनाचे धडे वडील उस्ताद अझीम खॉं आणि काका उस्ताद इस्माईल खॉं यांच्याकडून गिरविले. ते दोघेही पारंपरिक धृपद गायक होते. त्यांचे कुटुंब वाद्यनिर्मिती उद्योगातही होते. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात स्थलांतर केले. पंजाब प्रांतातील चिचवटनी गावात ते स्थायिक झाले. पाकिस्तानात ते एका सायकलीच्या दुकानात काम करीत होते. नंतर […]

अभिनेत्री जयश्री तळपदे ऊर्फ जयश्री टी

१९६९ मध्ये “अभिलाषा’ या चित्रपटाद्वारे जयश्री टी यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर एकापाठोपाठ एक चित्रपट त्या करीत गेल्या. एक उत्तम अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. काही चित्रपटांतील गाण्यांवर त्यांनी केलेली नृत्येही लोकप्रिय ठरली. शर्मिली या चित्रपटातील रेशमी उजाला है, तसेच मैं सुंदर हूं चित्रपटातील नाच मेरी जान फटाफट, व तराना चित्रपटातील सुलताना […]

हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक

ग्रेगरी पेक हे हॉलिवुडमधला स्टाइल आयकॉन होते. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९१६ रोजी झाला. १९४० ते १९६० पर्यतचं दशक ग्रेगरी पेक यांनी गाजवला. ‘मॅकेनाज् गोल्ड’च्या मुळे युवा पिढीमध्ये ते लोकप्रिय झाले. १९५३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘रोमन हॉलिडे’, १९६१ मध्ये आलेला ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’, ‘केप फियर’, ‘मॅकआर्थर’, ‘ओमेन-१’, ‘केप फियर’चा रिमेक यांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. ग्रेगरी पेक यांना पाच सिनेमांमधील […]

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक श्रीकांत देशपांडे

श्रीकांत देशपांडे हे रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचे नातू होत. त्यांचा जन्म १२ जून १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. वसंतराव तथा नानासाहेब देशपांडे यांचा सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या आरंभापासून महत्त्वाचा वाटा होता. श्रीकांत देशपांडे यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण सरस्वतीबाई राणे यांच्याकडून घेतले. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांच्याकडेही त्यांनी किराणा घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायक […]

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे

महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी गावदेवी, मुंबई येथे झाला. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान. त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, […]

मराठी, हिन्दीतील प्रसिद्ध गायक व संगीतकार त्यागराज खाडिलकर

त्यागराज यांची आई श्रीमती मंजुश्री खाडीलकर या ख्यातनाम किर्तनकार, त्यांनी ’किर्तन मंदाकिनी’ ही पदवी मिळविली. त्यांचा जन्म ११ जून १९६७ रोजी झाला. त्यांची आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर ह्या गंधर्व गायकीसाठी प्रसिद्ध. स्वातंत्र सैनिक, पत्रकार, नाटककार श्री. मा.कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकर हे त्यांचे पणजोबा. बालपणी त्यांनी विख्यात गायक, नट कै. डॉ वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर ’कट्यार काळजात घुसली’ या संगीत […]

मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. वडील खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. […]

मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम

मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. साहित्यसंघाच्या’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. […]

जेष्ठ संगीतकार वसंत देसाई

वसंत देसाई यांनी १९४२ साली ‘शोभा’ या चित्रपटापासून संगीतकार म्हणून प्रवास सुरू केला. त्यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी झाला. त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे तीस वर्षे चालूच राहिली. केवळ हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार केला तर वसंत देसाई हे कधीच व्यावसायिकदृष्टय़ा आघाडीचे संगीतकार नव्हते. परंतु वसंत देसाई च्या सांगितिक आयुष्याचा, हिंदी चित्रपट हा केवळ एक पैलू आहे. मराठी चित्रपट संगीत, […]

1 322 323 324 325 326 423
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..