राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर
चांदनी बार, पेज थ्री, कॉर्पोरेट, फॅशन अशा अनेक रियलिस्टिक सिनेमांचं दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केलेलं आहे. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. ग्लॅमरस जगाचं वास्तव त्यानं जगापुढे आणलं. गुरुदत्त, विमलदा, श्याम बेनेगल, व्ही शांताराम हे मधुर भांडारकर यांचे आवडते दिग्दर्शक. मधुर एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा. घरात फिल्म इंडस्ट्रीची बॅकग्राउंड नाही. पण तरीही लहानपणापासूनच त्याला सिनेमात प्रचंड इंटरेस्ट होता. […]
