नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

जागतिक एड्स दिवस

समलिंगींचा आजार अशी ओळख बनलेल्या या व्हायरसने कुणाला कळायच्या आतच अमेरिका आणि आफ्रिका खंडात थैमान घालायला सुरुवात केली. अमेरिकेत त्याचे ‘गे प्लेग’ असे वर्णन केले गेले. १९८६नंतर भारतात शरीरविक्रय करणारया महिलांचा रोग म्हणून एड्सची लोकांना ओळख झाली. १९८७ उजाडेपर्यंत तब्बल ४० हजार अमेरिकन नागरिक एचआयव्ही- एड्सला बळी पडले होते. […]

फ्रेंच कलाकार मादाम तुसाँ

त्या काळात सिनेमा व टेलिव्हिजन नसल्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींचे चेहेरे पाहण्याचे साधन नव्हते. ते कसे दिसतात याचे कुतुहल सर्वसाधारण लोकांच्या मनात असायचे, पण थोरामोठ्या लोकांशी प्रत्यक्ष संबंध येऊ शकत नसे. यामुळे या मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहाला भेट देऊन ते आपली औत्सुक्याची तहान भागवून घेत असत. […]

ठाण्याच्या मामलेदार मिसळचे लक्ष्मणमामा मुर्डेश्वर

नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना अधिवेशनाच्या कालावधीत एकदातरी ठाण्याच्या मामलेदार मिसळचा बेत व्हायचा असे सांगितले जाते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही चिरंजीव अमित ठाकरे व अन्य नेत्यांसह मामलेदार मिसळची चव चाखलेली आहे. […]

महाराष्ट्र फिल्म कंपनी निर्मिति संस्थेची स्थापना

इंग्लंडमध्ये १९२५ साली भरलेल्या वेम्बले येथील चित्रपट-प्रदर्शनात बाबूराव पेंटर दिग्दर्शित कल्याण खजिना व सती पद्मिनी हे दोन भारताचे प्रातिनिधिक चित्रपट म्हणून दाखविण्यात आले होते आणि त्यांबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र आणि पदकही मिळाले होते. […]

एक रूपयाच्या नोटेची एकशे चार वर्षे

भारतावर इंग्रजांचे राज्य असताना त्यांनी देशात प्रथम १८६१ मध्ये नोटा छापण्यास सुरुवात केली. पण ब्रिटीश सरकारने सर्वात प्रथम एक रूपयाची नोट ३० नोव्हेंबर १९१७ मध्ये चलनात आणली. ही नोट इंग्लंडमध्ये छापण्यात आली होती. या नोटेवर पाचव्या जॉर्जचे छायाचित्र होते. […]

स्वदेशीचे प्रणेते राजीव दीक्षित

भारताचा काळा पैसा विदेशी बँकांमध्ये अनधिकृतरित्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले. स्वदेशीचा प्रचार गावोगावी जाऊन केला. जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशी वस्तू वापरल्या तर देशात रोजगार निर्माण होईल व देशातला पैसा देशातच फिरत राहील हे तत्त्व त्यांनी लोकांसमोर मांडले. […]

झी समूहाचे चेअरमन सुभाषचंद्र गोयल

विपश्यना या संकल्पनेचा त्यांनी प्रसार केला. त्यासाठी त्यांनी आपल्या एस्सेल वर्ल्डमध्ये मुंबईला स्तूपही बांधला. मुलांसाठी किड झी, झी लर्न आणि ब्रेन ट्रस्ट ऑफ इंडिया हे उपक्रमही ते राबवतात. आपल्या झी चॅनेलवर तरुण वर्गासाठी समुपदेशन करतात. […]

लेखक वसंत वसंत लिमये

ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात असताना त्याला उनाडक्या करण्यातच रस होता. शाळेत नंबर एकतिसावा आला. वडील फक्त म्हणाले, “तिनावर एक एकतीस! यातला ‘तीन’ नंबर काढून टाकलात तर बरं!” त्रागा न करता एका ओळीत सांगितलेलं सूत्र चिरंजीव वसंताच्या मनात रुजलं आणि मग कुठलाही छंद चौफेर भटकत जोपासताना नंबर वनचीच गुणवत्ता दाखवण्याचा ध्यास ‘वसंत वसंत’ने घेतला. […]

सायबर सोमवार (सायबर मंडे)

२०१४ पर्यंत सायबर सोमवार हा वर्षातील सर्वात व्यस्त दिवस होता, मात्र यावेळी ऑनलाइन डेस्कटॉप विक्री $2 अब्ज पेक्षा जास्त होती आणि त्यात यूएस हा इतिहासातील सर्वात व्यस्त दिवस होता. […]

टीव्हीच्या रिमोट कंट्रोलचा शोध लावणारे अमेरिकन अभियंता युजीन पॉली

चित्रवाणी संच दुरून किंवा कोचावर बसल्या बसल्या बंद करायचा, तर दहा फुटी वायर जोडावी लागत असे. बिनतारी रिमोट नव्हतेच, ते युजीन यांच्या कल्पनेतून साकारले. तेव्हा रिमोट म्हणजे रेडिओ लहरी सोडणारी आणि आजच्या ‘हेअर ड्रायर’यंत्रासारखी दिसणारी एक बंदूकच होती ती.. या रिमोट कंट्रोलने चार कामे करता येत असत. […]

1 2 3 4 5 299
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..