नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मराठी चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी

मराठी मनोरंजन विश्वातला चॉकलेट हिरो म्हणून  प्रसिद्ध असलेल्या स्वप्नील जोशीचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७  रोजी मुंबईत झाला. स्वप्नील जोशीने वयाच्या नवव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे. स्वप्नील जोशीने श्रीकृष्णाच्या रुपात पहिली मोठी भूमिका केली; नंतर तो विविध भूमिकांत […]

मराठी गायक, संगीतकार राम फाटक

मराठी गायक, संगीतकार रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९१७ रोजी झाला. शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे १९५६ पासुन पुढील १० वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोलेआणि जे.एल.रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच […]

‘याहू’ स्टार शमशेरराज ऊर्फ शम्मी कपूर

शम्मी कपूर यांनी स्वत:ला कधी चिरतरुण म्हणवून घेतले नाही; पण जीवनावर उदंड प्रेम करणार्यास या आनंदी कलाकाराकडे ऊर्जेचा अखंड स्रोत होता. त्यांची जीवनाबद्दलची आसक्ती ही आयुष्याचा आनंद घेण्याची होती. त्यांनी आपले आयुष्य मनसोक्त उपभोगले. धसमुसळा,रांगडा प्रणय,नायिकांना थकविणारी भन्नाट नृत्यशैली ही शम्मी कपूर यांची खासियत होती. […]

संगीत संशयकल्लोळची १०१ वर्षे

संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला.तेव्हा रात्र रात्रभर नाटक चालत असल्याने तीस गाण्यांचे हे नाटकही त्या वेळी लोकांना खूप आवडले. तेव्हापासून आज शंभर वर्षांत हजारो प्रयोग होऊनही लोकांच्या मनावरची ‘संगीत संशयकल्लोळ’ची जादू ओसरलेली नाही. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला २० ऑक्टोबर २०१७ रोजी १०१ वर्षे झाली. […]

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे

सरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले […]

‘गझल किंग’ जगजित सिंह

१९७६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘अनफरगेटेबल’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजतागायत त्यांच्या नावावर ‘आईना’, ‘चिराग’, ‘कहकशॉं’ असे जवळपास ८० अल्बम आहेत. मेहंदी हसन, नूर जहॉं, बेगम अख्तर आणि तलत महमूद या गझलांच्या चमचमत्या दुनियेत ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने है’, ‘ओठोंसे छू लो तुम’ अशी अविस्मरणीय गझलांनी जगजीत सिंह यांनी आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले. […]

लेखिका प्रिया तेंडूलकर

विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. प्रिया तेंडूलकर या प्रख्यात साहित्यिक व नाटककार मा.विजय तेंडुलकर यांच्या कन्या. प्रिया लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती. तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका […]

प्रसिद्ध बंगाली व हिंदी अभिनेत्री सुमिता संन्याल

प्रसिद्ध बंगाली व हिंदी अभिनेत्री सुमिता संन्याल यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ रोजी दार्जिलिंग येथे झाला. सुमिता संन्याल यांचे खरे नाव मंजुळा संन्याल होते. पण पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःचे नाव सुचारिता असे ठेवले. पण फिल्ममेकर कनक मुखोपाध्याय यांनी तिचे नाव सुमिता केले. त्यांनी १९६० साली बंगाली चित्रपट ‘खोका बाबुर प्रत्याबर्तन’द्वारे चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. १९७० […]

राजकुमार

आज ‘जिनका घर शिशों का होता है, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करतें’ अशा दमदार डायलॉगबाजीने प्रेक्षकांच्या टाळय़ा घेणाऱ्या राजकुमार यांचा जन्म ८ आक्टोबर १९२६ रोजी झाला. राजकुमार उर्फ भूषण पंडित यांची ओळख विशिष्ट शैलीतील संवादफेक गोष्टींसाठी म्हणून अधोरेखित झाली. बी. आर. फिल्म निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ या मल्टिस्टार कास्ट चित्रपटातील त्यांनी रहेमान […]

1 290 291 292 293 294 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..