नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. तिचे लूक्स हे आजच्या पिढीतील मुलींना भावणारे आहेत. लाखो मुलींसाठी ती स्टाईल दीवा तर आहेच पण अनेकजणी तिची ही स्टाईल फॉलोदेखील करतात. दीपिकाने बॉलिवूडमध्ये ‘ओम शांती ओम’ सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा […]

सुप्रसिध्द संतूरवादक पं. उल्हास बापट

अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.  पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूर वादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, […]

मराठी कवयित्री आणि कथालेखक इंदिरा संत

पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९१४ रोजी झाला. शिक्षकीपेशात असलेल्या मा.इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले […]

गायिका बेला शेंडे

‘बेला शेंडे’ म्हटलं की आपल्याला कुठली गाणी आठवतात? ‘नटरंग’ ची ‘वाजले की बारा’ आणि ‘अप्सरा आली’ ही प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली लावणीगीते आठवतात, ‘सर सुखाची श्रावणी’, ‘का कळेना कोणत्या क्षणी’ किंवा ‘ओल्या सांजवेळी’ सारखी हळुवार प्रेमगीते आठवतात. ‘जोधा अकबर’ मधलं ‘मन मोहना’ आठवतं.. पण तुम्ही बेलाचं कधी breathless गाणं ऐकलंय का? फार लोकांना माहिती नसलेलं हे […]

पंचम, उर्फ राहुल देव बर्मन अर्थातच आर. डी. बर्मन

राहुल देव बर्मन यांचे वडील संगीतकार सचिनदेव बर्मन हे त्रिपुरा संस्थानचे प्रिन्स. त्यांचा जन्म २७ जून, १९३९ रोजी झाला. हे संगीतकार पिता-पुत्र मूळ राजघराण्यातून आलेले. पंचमच्या आई मीरादेवी या सुद्धा बंगालमधल्या एक संगीतकार. पंचम ऊर्फ आर. डी. बर्मन यांचे संगीत म्हणजे… एकीकडे तरल.. भावूक… संवेदनशील मनाचा मुक्त असा सांगीतिक आविष्कार; तर दुसरीकडे आरडीचं संगीत म्हणजे मदहोश करणारी जादू… […]

जेष्ठ अभीनेते प्रदीपकुमार बटव्याळ उर्फ प्रदीपकुमार

अभीनेते प्रदीपकुमार हे बंगाली नट. देवकी बोस यांच्या ‘अलकनंदा’ या बंगाली चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२५ रोजी झाला. त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश फिल्मिस्तानच्या ‘आनंदमठ’ या चित्रपटाने झाला. या चित्रपट संस्थेचे त्याची भूमिका असलेले ‘अनारकली’ व ‘नागिन’ हे चित्रपट तुफान गाजले. या बाबतीत ते फिल्मीस्तानचे सर्वेसर्वा शेठ तोलाराम जालन यांचे ऋण मानीत असे. कारण चित्रपट […]

ज्येष्ठ सतार वादक अब्दुल हलीम जाफर खान

भारतीय चित्रपट सृष्टीतील गाणी आपल्या सतार वादनाने अजरामर करणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजेच ज्येष्ठ पार्श्वगायक व सतारवादक उस्ताद अब्दुल हालीम जाफर खान. त्यांचे वडील जाफर खान हे स्वतः एक अष्टपैलू कलाकार व गायक होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. त्यामुळे लहानपणापासूनच उस्ताद अब्दुल खान यांच्यावर संगीत व गायनाचे संस्कार झाले होते. अब्दुल खान यांना संगीत आणि वाद्य वादनाची […]

ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक विद्याधर गोखले

ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२४ रोजी झाला.पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर […]

दिग्दर्शक व पटकथाकार चेतन आनंद

चेतन आनंद हे देव आनंद आणि विजय आनंद यांचे जेष्ठ बंधू. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९२१ रोजी लाहोर येथे झाला. देव आनंद आणि त्यांचे बंधू यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट निर्माण करून ठेवले आहेत. अॅडव्होकेट पिसोरिलाल आनंद घराण्यात जन्मलेला चेतन आनंद यांनी लाहोर शासकीय महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते डेहराडूनचा डून स्कूलमधे शिकवू लागले. कथालेखनाची आवडच असल्याने त्यांना त्यांच्या […]

ज्येष्ठ अभिनेते अरविंद देशपांडे

सुलभा देशपांडे व अरविंद देशपांडे या खरं तर दोघांचं नाटय़वेड कमालीचं, टोकाचं होतं. त्यामुळे तर ओळख झाली. त्या काळात म्हणजे १९६०च्या दशकात. त्यांचा जन्म ३१ मे १९३२ रोजी झाला. मुख्य मुंबई शहरातल्या प्रेमिकांना मलबार हिलची बाग एकांतात गप्पात रंगून जाण्यासाठी आवडत असे. हे प्रेमीयुगुल मलबार हिल चढून गेलं, पण ओढ वाटत असली तरी अजून ते कळीचं वाक्य […]

1 264 265 266 267 268 423
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..