नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाराष्ट्रीय चित्रकार बाबुराव नारायण सडवेलकर

बाबुराव सडवेलकर यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूलमध्ये व महाविदयालयीन शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये झाले. त्यांचा जन्म २८ जून १९२८ रोजी वेंगुर्ले येथे झाला. शालेय जीवनातच चित्रकार होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या ठायी निर्माण झाली व ह्या प्रेरणेने त्यांनी ‘ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ’, मुंबई येथे उच्च कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला. रंग व रेखाकला विषयाची जी. डी. आर्ट […]

उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी

वालचंद हिराचंद दोशी सार्वजनिक बांधकाम, सागरी वाहतूक, मोटार उद्योग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातील नवा कालखंड निर्माण करणारे उद्योगसम्राट! वालचंद हे एक वेगळ्या प्रकारचे उद्योगपती होते. वालचंद हिराचंद यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८८२ रोजी झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत […]

मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे

आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९४८ रोजी गडहिंग्लज येथे झाला. आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचा जन्म गडहिंग्लजचा. आशा काळे यांचे वडील रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते. शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली. आई, वडील, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब. रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी […]

बॉलिवूडच्या जेष्ठ गायिका मीना कपूर

मीना कपूर यांचे वडील विक्रम कपूर हे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते. चित्रपट निर्माते पी.सी. बरुआ हेही त्यांचे नातेवाईक होते. यांमुळे कपूर यांचा चित्रपटात प्रवेश सुकर झाला. मीना कपूर यांनी आपल्या लहानश्या करीयरची सुरवात १९४६ साली नीनु मुजुमदार यांच्या आठ दिन या चित्रपटापासून केली. याला संगीत एस.डी.बर्मन यांचे हो. गायिका मीना कपूर या संगीतकार अनिल […]

भारतातील आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा

स्वतंत्र भारताच्या इतिहासात आध्यात्मिक क्षेत्रात बहुधा सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळालेले आणि प्रभाव गाजविलेले व्यक्तिमत्व सत्यसाईबाबा यांचे पूर्ण नाव सत्यनारायण राजू होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, १९४० मध्ये त्यांनी आपण शिर्डीच्या साईबाबांचे अवतार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते भारतातील बहुधा सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु बनले. प्रथम त्यांच्याभोवती हवेतून विभूती […]

आधुनिक मराठी नट, दिग्दर्शक, पार्श्वनाथ यशवंत आळतेकर (अळतेकर)

१९२४ पासून त्यांनी अनेक मूकपटांत भूमिका केल्या तसेच काही मूकपटांचे दिग्दर्शनही केले. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १८९८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथे झाला. ‘इंपिरियल’, ‘सरस्वती सिनेटोन’ ‘रणजित’ ‘नटराज फिल्म्स’ इ. चित्रपट संस्थांमधून नट व दिग्दर्शक म्हणून त्यांनी कामे केली. अनेक हिंदी, मराठी तसेच कन्नड व तमिळ बोलपटांचेही त्यांनी दिग्दर्शक या नात्याने काम केले. रेझिसाँर (दिग्दर्शक/ नाट्यव्यवस्थापक) आळतेकरांनी […]

डान्स डायरेक्टर सरोज खान

बॉलीवूड मधील डान्स डायरेक्टरच्या यादीतलं अव्वल नाव म्हणजे सरोज खान. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला. निर्मला किशनचंद साधू सिंग नागपाल हे सरोज खान यांचे खरे नाव. वयाच्या तिसऱ्या वर्षीच ‘नजराना’ या चित्रपटातून त्यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण झालं होतं. या बालकलाकाराची कारकीर्द पुढे नृत्यक्षेत्रामध्ये बहरली. पुढे हा कलाकार ग्रुप डान्सर बनला. त्यानंतर असिस्टण्ट डान्सर आणि १९७४ […]

चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू

हा माणूस दिग्दर्शक म्हणून सिनेमात आला, पण त्यांनी अनेक चित्रपटात नायकाच्या भूमिका केल्या, वीस चित्रपट दिग्दर्शित केले व सात चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९१५ रोजी झाला. किशोर साहू हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. ‘दिल अपना और प्रीत परायी’ सोडल्यास त्यांनी दिग्दर्शित केलेला एकही चित्रपट लोकप्रिय बनला नाही. १९४९ मध्ये किशोर साहू यांनी आपल्या चित्रपटाचे नाव सावन […]

जेष्ठ खलनायक प्रेमनाथ मल्होत्रा

हिंदी चित्रपटात प्रेमनाथला एक अशा अभिनेत्याच्या नात्याने ओळखले, जाते ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून राज्य करणारा म्हणून नाही तर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात आपली छाप उमटविली. शोर , अमीर गरीब, रोटी कपडा और मकान या सारख्या चित्रपटात त्यांना अभिनयासाठी फिल्म फेयर अवॉर्डने नावजले गेले. […]

जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर

मोहनदास सुखटणकर यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० रोजी गोव्यातील माशेल येथे झाला. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण माशेल आणि म्हापसा येथे झाले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’. अभिनय येतो […]

1 241 242 243 244 245 423
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..