नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ठुमरी विश्वाची सम्राज्ञी शोभा गुर्टू

शोभा गुर्टू ह्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला.लोकांनी त्यांना ‘ठुमरी सम्राज्ञी’ म्हणून नावाजले होते. शोभा गुर्टूंचे लग्नाअगोदरचे नाव भानुमती शिरोडकर. संगीताचे प्रारंभिक शिक्षण त्यांना आपली आई व नृत्यांगना मेनकाबाई शिरोडकर यांचेकडून मिळाले. मेनकाबाईंनी गाण्याचे शिक्षण जयपूर घराण्याच्या […]

गझल किंग जगजित सिंह

जगजीत सिंह यांच्या वडिलांनी त्यांचे गायनातील गुण हेरून त्यांना पं. छगनलाल शर्मा यांच्याकडे पाठविले. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला. त्यांच्याकडे गायनाचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर उस्ताद जमाल खान यांच्याकडे सहा वर्षे खयाल, ठुमरी आणि द्रुपद हे गायनप्रकार पक्के करून घेतले. त्यांनी केवळ गझल गायनाबरोबरच शास्त्रीय संगीत, भक्तीसंगीत आणि लोकसंगीतातही मौलिक योगदान दिले आहे. १९७० मध्ये चित्रा यांच्याबरोबर विवाहबद्ध […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २४

“दूध आणि दही सुद्धा डायबेटीस मधे चालत नाही म्हणजे काय ?” “आहो, आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकतोय दूध पूर्णान्न आहे म्हणून.त्याचं काय ?” कच्च्या मालापेक्षा पक्का माल विकावा.त्यात जास्ती फायदा असतो. हे आजचे व्यापारशास्त्र पण सांगते. कृष्णाने सुद्धा द्वापारयुगात तेच केले होते. कृतीतही आणले होते. गोकुळातून दूध आणि दह्याची मडकी मथुरेत, कंसाच्या राज्यात जात होती. दूध आणि […]

कोरफड

कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते […]

जेष्ठ कवी,संगीतकार सुधीर मोघे

शब्दांचे जादूगार, अंधारावर ममत्वाचा अधिकार गाजवणारे आणि कवितेला “सखी’ म्हणून आपल्या अस्तित्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे सुधीर मोघे. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ रोजी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे झाला.खरे म्हणजे ते एक कवीच पण आपल्या कवितेची अभिव्यक्ती इतर माध्यमातून करायला देखील मागे राहिले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी गीतकार, संगीतकार, लेखक, चित्रकार, लघुपट निर्माते, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकातून आपले कवित्व […]

गायक रवींद्र साठे

स्पष्ट शब्दोच्चार,खर्जातील घनगंभीर स्वर,आणि भावपूर्ण गायन ही रवींद्र साठे यांची खासीयत. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला. रविंन्द्र साठे यांचे श्री. मुकुंदराव गोखले यांच्याकडे रीतसर शास्त्रीय गायनाचे शिक्षण झाले.बालकलाकार म्हणून त्यांचे कार्यक्रम होऊ लागले.पण महाविद्यालयात गेल्यावर त्यांच्या या शिक्षणात खंड पडला.त्याच वेळी सुगम संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले.आणि ते पुन्हा गाण्याकडे वळले.पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांची गानसाधना सुरु […]

रथसप्तमी

माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्याचे विशेष महत्त्व आहे. सूर्याची आराधना केल्यास सर्व रोग बरे होतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच सूर्याची आराधना केली जाते. रथसप्तमी याचा अर्थ सूर्याचा सारथी “आरुणी‘ सात घोडे असणाऱ्या रथाचे सारथ्य करीत असतो. मकरसंक्रांतीपासून सूर्य हा तीळ तीळ वाढत जातो. रथसप्तमीनंतर संक्रांतीची समाप्ती मानली जाते. रथसप्तमीच्या दिवशी तुळशी […]

माजी व्हाईस अॅडमिरल भास्कर सोमण

स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी सोमण यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. १९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते. तांबडा समुद्र व इराणचे आखात यांमध्ये हिज मॅजेस्टिज इंडियन शिप (एच्. […]

पहिला मराठी बोलपट – अयोध्येचा राजा

८५ वर्षापूर्वी आज पहिला मराठी बोलपट दाखविला गेला. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या […]

दिग्दर्शक, अभिनेते व रंगमंच दिग्दर्शक परेश मोकाशी

‘थिएटर अॅककॅडमी’ सारख्या संस्थेची नाटकं आणि काही चित्रपट-टीव्ही मालिकांत छोटया भूमिकांत दिसणारे परेश मोकाशी ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ या नाटकामुळे ख-या अर्थाने प्रकाशात आले ते लेखक- दिग्दर्शक म्हणून. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. परेश मोकाशी यांचे गाव रायगडमधलं चौक. पणजोबा पोस्टमास्टर होते. जन्म पुण्याचा असला तरी सगळं शिक्षण लोणावळ्याच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झालं. परेश मोकाशी यांचे वडील पत्रकार होते. पुण्यात […]

1 242 243 244 245 246 296
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..