नवीन लेखन...

बॉलीवुड चे दिग्गज गिटार वादक गोरख शर्मा

बॉलीवुड चे दिग्गज गिटार वादक गोरख शर्मा यांचा जन्म २८ डिसेंबर १९४६ रोजी झाला. गोरख रामप्रसाद शर्मा हे संगीतकार प्यारेलाल यांचे धाकटे बंधू होते. गोरख शर्मा यांनी आपल्या वयाच्या १२ व्या वर्षापासून मेन्डोलिन वाजवण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात ते हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमात मेन्डोलिन वाजवत असत.

वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी संगीतकार रवी यांच्या चौदवीका चांद या गाण्याला मेन्डोलिन वाजविले होते. जागतिक कीर्तीचे गोरख शर्मा यांनी अनेक अविस्मरणीय गाण्यांना गिटार वादन केले ते ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ यांचे मुख्य सहाय्यक होते. त्यांनी आपल्या १९६० ते २००२ मधील करीयर मध्ये १००० हून अधीक गाण्यांना गिटार वादन केले व ५०० हून अधीक चित्रपटात गिटार व इतर तार वाद्य वाजवली होती.

‘कर्ज़’ या चित्रपटातील ‘एक हसीना थी, एक दीवाना था’ च्या गाण्याचा गिटार गोरख शर्मा यांचा होता. आशिकी या चित्रपटातील गिटारचा पिस पण गोरख शर्मा यांचाच होता. गोरख शर्मा यांचे २७ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..