नवीन लेखन...

ज्यांच्या बॉर्न फ्री पुस्तकावर चित्रपट निघाला अशा वन्यजीव लेखीका जॉय अॅडम्सन

ज्यांच्या बॉर्न फ्री पुस्तकावर चित्रपट निघाला अशा वन्यजीव लेखीका जॉय अॅडम्सन यांचा जन्म २० जानेवारी १९१० रोजी ऑस्ट्रियामध्ये रोजी झाला. जॉय अॅडम्सन या आपल्या एल्सा सिंहिणीवरच्या पुस्तकामुळे सर्व निसर्गप्रेमी आणि जंगलप्रेमी मंडळींमध्ये विशेष प्रसिद्ध असणारी लेखिका. जॉर्ज अॅडम्सन या वन्यरक्षकाशी लग्न करून त्या केनियामध्ये स्थायिक झाल्या.

एकदा जॉर्ज अॅडम्सन यांनी स्वसंरक्षणार्थ मारलेल्या सिंहिणीचे तीन छावे त्यांना मिळाले. त्यातले दोन प्राणिसंग्रहालयाला देऊन एक तिने आपल्याजवळ ठेवला आणि तिचं नाव ‘एल्सा’ ठेवलं आणि तिला अगदी आपल्या घरातच वाढवलं. पुढे तिची पूर्ण वाढ होऊन एल्सालाही छावे झाल्यावर ती त्यांना भेटत राहिली. त्या सर्व अनुभवांवर जॉय अॅडम्सनने तीन पुस्तकं लिहिली ‘बॉर्न फ्री’, ‘लिव्हिंग फ्री’ आणि ‘फॉरेव्हर फ्री.’

बॉर्न फ्रीची कथा आहे एल्सा सिंहिण आणि तिचे पालक जॉय आणि जॉर्ज अॅीडम्सन या जोडप्याची. केनियाच्या जंगलात जंगलरक्षक असलेल्या जॉर्जने एकदा त्याच्या अंगावर चालून आलेल्या सिंहांवर स्वसंरक्षणार्थ रायफल चालवली आणि सिंह-सिंहीण ठार झाल्यावर त्याला दिसले ते या जोडीचे तीन छावे. या पिल्लांच्याच संरक्षणासाठी सिंह जॉर्जवर चालून गेले होते.

मग या तीन छाव्यांना जॉय आणि जॉर्जने वाढवले. त्यातलीच एक एल्सा. तिला आणि तिच्या भावंडांना वाढवताना आलेल्या अनुभवांवर अॅजडम्सनने बॉर्न फ्री हे अनुभवकथनपर पुस्तक लिहिलं आणि पुढे दिग्दर्शक जेम्स एच. हिल्स याने या जोडप्याच्या विलक्षण अनुभवांवर याच नावाचा सुंदर चित्रपट काढला.

एल्सा आणि तिची दोन भावंडं अॅअडम्सनच्या घरातच लहानाचे मोठे होतात. त्यापैकी दोघांची रवानगी रॉटरडॅमच्या प्राणीसंग्रहालयात केली जाते. पण एल्सा त्यांच्याबरोबरच राहत असते. दररोज धमाल मस्ती, जॉर्ज वा जॉयबरोबर भटकंती ही तिची दिनचर्या. पण तिचा खेळकरपणा इतरांना महाग पडत असतो.

एकदा ती हत्तींच्या कळपाच्या पाठी लागल्याने बिथरलेले हत्ती तिथल्याच एका गावात शिरतात, वस्तीची पार वाताहात करतात. या नासधुशीला कारणीभूत ठरलेल्या मस्तीखोर एल्साला आता एकतर जंगलात सोडायचे नाहीतर प्राणीसंग्रहालयात पाठवायचे अशी वेळ ओढवते. त्यावेळी जॉय मनसोक्त बागडणा-या, स्वच्छंद एल्साला जंगलात सोडायचा निर्धार करते.

पण, अॅतडम्सन कुटुंबात एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे वाढलेल्या एल्साला जंगलचा कायदा, शिकारीच्या त – हा कोण शिकवणार? वन्य प्राण्यांना आत्मसंरक्षणाचे, शिकारीचे बाळकडू त्यांच्या आईकडून मिळत असते. एल्सा तर पोरकी असते. शेवटी जॉयचं तिला प्रशिक्षण देते, शिकार कशी करायची ते शिकवते, जंगलातील वास्तव्यासाठी तयार करते. एल्साची जंगलात पाठवणी करून जॉय आणि जॉर्ज तिचा जड अंतकरणाने निरोप घेतात.

एल्सा जंगलात टिकाव धरेल का, इतर सिंह तिला स्वीकारतील का अशा अनेक प्रश्नांचं काहूर त्यांच्या मनात उठलेलं असतं. पण वर्षभरानं लंडनहून परतलेल्या या दोघांना एल्सा पुन्हा भेटते, ओळखते. मधल्या काळात एल्साचं जंगलाशी आणि तिथल्या सिंहांशीही नातं जुळलेलं असतं. तिच्याबरोबर तिचे तीन छावेही असतात.. या सगळ्या अनुभवांवरील पुस्तक म्हणजे बॉर्न फ्री.

ही तिन्ही पुस्तकं जगभर तुफान गाजली आणि त्यावर सिनेमे निघाले. पुढे त्यांनी चित्त्याचं ‘पिप्पा’ नावाचं एक पिल्लूही पाळलं आणि त्या पिप्पाच्या जीवनावर ‘दी स्पॉटेड स्फिंक्स’ हे पुस्तक लिहिलं. तेही लोकप्रिय झालं. बिबट्यांसंबंधी त्यांनी लिहिलेलं ‘क्वीन ऑफ शेबा’ हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. ‘दी सर्चिंग स्पिरीट’ हे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा गाजलं होतं. ३ जानेवारी १९८० रोजी एका माथेफिरूने भोसकून जॉय अॅडम्सन यांची हत्या केली.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..