सदाबहार चित्रपट ‘पडोसन’ची पन्नास वर्षे

२९ नोव्हेंबर १९६८ रोजी पडोसन चित्रपट रिलीज झाला. म्हणजेच पडोसन चित्रपट आता पन्नास वर्षाचा झाला.

कधीही आणि कुठेही उपयोगी पडेल असे साधन म्हणजे विनोद! विनोदाला कोणी बाप नसतो पण ते सर्व औरस असतात. काही विनोद सहजस्फुर्तीचे आणि काही समयसुचकतेचे द्योतक असतात.

अगदी एका शब्दानेही हास्याचे फुलोरे उडताना आपण कित्येकदा अनुभवले असेल.किंवा एखाद्या विनोदाला आपण ‘क्या टायमिंग है बॉस’ अशी कॉम्प्लिमेंट देऊनहि गेलेलो. ज्यांना विनोदबुद्धी नाही त्यांच्यात ती उत्पन्न करणे आणि ज्यांच्याकडे थोड्याप्रमाणात आहे त्याची वाढ करणे असे काम काही विनोदवीर करत असतात. ‘विनोद’ हे अमर असे साहित्य आहे त्यामुळे ते सर्वांच्या मालकीचे आहे. आज मी अश्याच ऐका विनोदी सिनेमा बद्ल सांगणार आहे ज्यानी आपली पाच दशक निखळ करमणुक केली.

काही विनोदी सिनेमे असतात असे जे आज ही आपणास मनमुराद आंनद देतात आपल्या कुटुंबियां सोबत ‘पड़ोसन ‘हा सिनेमा बघण्याची आज ही मज्जा काही आगळीच असते. अगदी हसवत ठेवणारा सिनेमा..

‘पड़ोसन’ १९६८ साली हा सिनेमा रिलीज़ झाला. आज पन्नाशी गाठणारा हा सिनेमा आज ही तरुण अवखळ हास्य फुलवतो…सिनेमा बघितल्या वर अस वाटत की सबनीस, वी .आ .बुआ ,पुल नाहीतर दमा मिरसदारांची मिस्कीलकथा वाचतोय,निखळ करमणुक गेली पन्नास वर्ष रसिकाना हसवतोय. हास्य अभिनेता दक्षिणी गायक पंडितजी महमुद यांच विनोदाच अप्रतिम टाइमिंग ,त्यात किशोर कुमारची विनोदाची साथ (गुरु), बावळट वाटणारा भोला सुनील दत्तचा कैरेक्टर प्रमाणे सुंदर अभीनय .चुलबुली रूपगर्विता सायरा बानो, कथेच्या अनुषंगानी सर्वच कास्टिंग सुरेख अगदी ओमप्रकाश पासून केश्टो मुखर्जी ही करमणुक करतो.

पड़ोसन चा निर्माता स्वतः मेहमूद होता, एक बंगाली सिनेमा ‘पाशेर बेर’ या सिनेमा वरुन बेतलेला हा सिनेमा साठच्या दशकात भरपूर चालला. पंचमच सुंदर संगीत लाभलेल आणि राजेन्द्र कृष्ण यांच गीत लाभलेला हा सिनेमा या दोघांचा या सिनेमाच्या यशात फार मोठा सहभाग आहे.

निर्माता मेहमूद ची प्रथम आर.डी. बर्मनला या सिनेमात हिरोचा रोल देण्याची फार इच्छया होती ; पण मोठा चष्मा घातलेला नाव नसलेल्या कलाकाराला हिरोचा रोल देवून सिनेमा करण्यास फाइनांशियल डिस्ट्रुब्यूटरने आरडीच्या नावाला नापसंती दिली.म्हणून मग मेंहमूदने भोलाच्या रोलसाठी सुनील दत्तच्या नावाचा विचार केला. पण सुनील दत्तला त्या सिनेमा स्क्रिप्ट मधे काही दम दिसला नाही आणि भोलाचे कैरेक्टर करण्यातही त्याला इंटरेस्ट नव्हता. परंतु सुनील दत्त आणि मेहमूदचे सम्बंध लहान भावा सारखे होते स्वतः नर्गिस ने त्यात मध्यस्थी करून सुनील दत्तला भोलाचा रोल करण्याची विनंती केली.बिंदुच्या रोलसाठी मधुबाला मेहमुदला हवी होती पण तीच्या तारखा मिळाल्या नाही.मग नवीन नाजुक नखरैल बिंदू म्हणून सायरा बानूला घेण्यात आले.

किशोर कुमार ने मेहमुदला पूर्वी आपल्या सिनेमात काम देण्यास नाकार दिला होता ,कालांतराने मेहमुदने स्वतःच्या सिनेमात किशोर कुमारला नौटंकी गायक( गुरु) चा रोल दिला आणि त्याने त्याच सोन केल एवढं की किशोर कुमारची एक्टिग बघून मेहमुदला वाटल की किशोर कुमार हा सिनेमा खाऊंन टाकेल म्हणून स्वतः मेहमुदनी या सिनेमाची एडीटिंग केली आणि किशोर कुमारच्या रोलला कात्री लावली.

‘एक चतुरनार ‘हे गाण पंचम ने मन्नाडे कडून गाउन घेतल पण मन्नाडेजी ने त्यात बऱ्याच सुधारणा करण्याच्या अटि वर ते गाण गायल .आणि पुढे या गाण्याच्या लोकप्रियते बद्दल आपल्या सर्वाना माहित आहेच.’मैं चली मैं चली’,’भाई भतूर’,’मेरी प्यारी बिंदू’,’मेरे सामने वाली खिड़की’,’एक चतुर नार’,’कहना है तुमसे आज’,’मेरे भोले बलम’,सगळी गाणी अप्रतिम ऐका पेक्षा सरस. राजेंद्र कृष्ण के गीत आणि पंचम चे प्रयोगशील अप्रतिम संगीत. पंचम ने आपल्या संगीतात बरेच वेगळे प्रयोग केले केसातील फणीचा वापर कर तर कधी आदिवासी लोकसंगीताचा ठेका उचल जे म्हणून सुर वापरायचे ते सारे प्रयोग पंचम ने केले म्हणूच पडोसनच संगीत हे आज ही श्रवणीय आणि लोकप्रिय आहे.

मेहमूदचा विनोदी साउथ इंडियन पंडित तर कोण विसरु शकत नाही.कमल हसन ने सांगितलेला किस्सा आठवला त्या वेळेस हिंदी बद्दल साऊथ मधे प्रचंड नाराजी होती ते ह्या भाषेला स्विकारण्यास तयार नव्हते त्यात ह्या सिनेमात मेहमूद ने साउथ इंडियन पंडितच विडंबन केल होत त्यामुळे हा सिनेमा मद्रास मधे होउ देणार नाही असा फतवा काही तमिळ युवकानी काढला त्यात कमल हसन ही होता , सिनेमागृहात सीटकव्हर फाडण्या पासून आरडा ओरड करण्याचा पुढाकार या तमिळ युवकानी केला पण या सिनेमाची प्रसिद्धि एवढी झाली की असे प्रकार काही उपयोगी झाले नाही आणि आजही तो प्रसंग आठवला की कमल हसनला स्वतःच हसू येत.

मित्रांनो जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आणि सभोवताली असतो; परंतु तो बघण्याची दृष्टी आपणाजवळ नाही ती निर्माण झाल्यास आपले जीवन एकदम बदलून जाईल. मग बघूया परत एकदा
एक चतुर नार बड़ी होशियार ….अपने ही जाल में फसत जात हम हसत जात अरे हो हो हो हो हो !

लेखक : श्रीकांत
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पडोसन मधील गाणी.
https://youtu.be/szm4maLk89w

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2160 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…