नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आयुष्यावर बोलू काही “ची … अठरा वर्ष..

३ ऑगस्ट २००३ ला सहज म्हणून सादर केलेला एक कार्यक्रम , संदीपच्या कविता आणि गाणी आणि मी आणि संदीपने केलेली गाणी , असा एक प्रयोग करून तर बघूया इतक्या सहज सुचलेली ही कल्पना . एक प्रयोग झाला. हाउसफुल्ल !! उत्तम दाद मिळाली . आम्हालाही मजा आली . बास्स्स … आनंदाने आपापल्या घरी गेलो … !! लगेच […]

पुण्याच्या महाराष्ट्रकलोपासक संस्थेचा स्थापना दिवस

पुण्याच्या महाराष्ट्रकलोपासक संस्थेची स्थापना ३ ऑगस्ट १९३६ रोजी झाली.. सध्या पुण्यातील पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करणारी संस्था ही या संस्थेची प्रमुख ओळख आहे. नटवर्य केशवराव दाते यांच्या ‘महाराष्ट्र’ नाटक मंडळी पासून प्रेरणा घेऊन हौशी कलाकारांसाठी सुरू झालेली संस्था म्हणजे ‘महाराष्ट्र कलोपासक, पुणे!’ ‘महाराष्ट्रीय कलोपासक पुणे’ ही संस्था नूतन मराठी विद्यालय या शाळेच्या शिक्षकांनी एकत्र येऊन सुरू […]

दादा जेपी वासवानी

साधू वासवानी मिशनचे संस्थापक, सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू हा लौकिक परिचय असलेले दादा जे. पी. वासवानी यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अनमोल योगदान दिले. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१८ रोजी पाकिस्तानमधील सिंध प्रातांतील हैदराबाद येथे झाला. जे. पी. ऊर्फ जशन पहलाजराय वासवानी असे त्यांचे मूळ नाव. आध्यात्मिक गुरू साधू वासवानी यांचे ते पुतणे होते. साधू वासवानी […]

टेलीफोनचे जनक अलेक्झांडर ग्रॅहमबेल

अलेक्झांडर मेलविले आणि एलिझा सायमंड्स बेल हे त्यांचे आई वडील. त्यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी स्कॉटलंडच्या एडीनबर्गमध्ये येथे झाला. अगदी लहान असल्यापासूनच ग्रॅहम बेलनी विविध प्रकारचे शोध लावायला सुरुवात केली होती. त्यांच्या सुरुवातीच्या पहिल्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प हा गव्हापासून त्याचा भुसा वेगळा करण्यासंदर्भातील होता. पण त्यांना आवाजाबाबत विशेष प्रेम होते. तोंडातून बाहेर पडणारा आणि कानाला […]

भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली वेंकय्या

पिंगाली वेंकय्या.. हे नाव फारसे कुणाला माहीत नाही. भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली ती याच पिंगाली वेंकय्या यांनी. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ रोजी झाला. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक […]

पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस

सतीश जकातदार, वंदना भाले, दीपक देवधर, प्रभाकर वाडेकर, प्रसन्निकुमार अकलूजकर आणि मुकुंद संगोराम या चित्रपटप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन १ ऑगस्ट १९८५ रोजी आशय फिल्म क्लबची स्थापना केली. सध्या सतीश जकातदार व वीरेंद्र चित्राव आशय फिल्म क्लबची धुरा सांभाळत आहेत. […]

लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे

मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली. […]

गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर

ग. दि. माडगूळकर यांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य आनंद माडगूळकर पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार हून अधिक प्रयोग देशात आणि परदेशांत सादर केले आहेत. […]

1 190 191 192 193 194 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..