नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आँधी चित्रपट

” आंधी” चित्रपट भारतभर व मुंबईत मेट्रो थिएटरमध्ये गर्दीत सुरु असतानाच देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर झाली, त्यात या चित्रपटांवर बंदी आणली गेली. हा बहुचर्चित चित्रपट काही महिन्यांनी पुन्हा सेन्सॉर करण्यात आला आणि मग पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. संजीव कुमार व सुचित्रा सेन यांचे यातील काम अप्रतिम. कोशीश आणि आंधी सारखे खास चित्रपट गुलझार […]

व्हॅलेंटाइन डे

‘संत व्हॅलेंटाईन’ याने सम्राटाच्या आज्ञेविरोधात जाऊन प्रेमी युगल असलेल्या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून दिली. सम्राटाला ‘व्हॅलेंटाइन’च्या त्या कृतीचा खूप राग आला. त्याने चिडून जाऊन ‘व्हॅलेंटाईन’ला देहदंड दिला. ज्या दिवशी ‘व्हॅलेंटाईन’ला मरण आले, तो दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ अर्थात ‘प्रेमदिन’ म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपीयन देशात सुरू झाली. […]

बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज

आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य असेच होते. त्यांची २००६-२०१० या कालावधीकरिता राज्यसभेकरिता खासदार म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच आय.आय.टी. रुरकीसहित ७ विश्वविद्यालयांची डॉक्टरेट ही मानद पदवीदेखील त्यांना प्रदान करण्यात आली होती. […]

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां सरोजिनी नायडू

सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशोल्डनंतर द बर्ड ऑफ टाइम व द ब्रोकन विंग हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. […]

किस डे

‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या केवळ एक दिवस आधी येणारा किस डे हा दिवस म्हणजे प्रेमाचा शेवटचा टप्पाच म्हणावा लागेल. आज याच किस डे निमित्त किस या शब्दाचा उगम कसा झाला याबद्दल बघू. किस (Kiss) हा शब्द जुन्या इंग्रजीमधील ‘सीसन’ (cyssan) या शब्दापासून जन्माला आला आहे. ‘सीसन’चा अर्थ होतो चुंबन घेणे. पण आता हा सीसन शब्द कुठून आला याबद्दल […]

इतिहासाचे भीष्माचार्य वासुदेव सीताराम बेंद्रे

संभाजी राजांची पराक्रमी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी, धोरणी, मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा लोकांसमोर आणण्याचं श्रेय बेंद्रे यांचंच. तसंच संभाजीराजांची वढू गावाची समाधीसुद्धा त्यांनीच शोधून जगासमोर आणली होती. […]

ढेपे वाड्याचे संस्थापक नितीन ढेपे

नितीन ढेपे यांना ह्या संकल्पनेचे पेटंट देखील १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वा्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून २०१९ मध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत. […]

ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ.तात्याराव लहाने

त्यांनी आतापर्यंत १ लाख ४९ हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. सर जे.जे. रुग्णालयात ते नेत्र चिकित्सा विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. स्वत:च्या मुत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही दिवसातून १२ ते १४ तास रुग्णालयात काम करत होते. […]

भारताचे माजी कसोटीपटू गुंडप्पा विश्वनाथ

गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. जेव्हा जेव्हा विश्वनाथ यांनी शतक झळकावले तेव्हा एकदाही भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही. […]

ज्येष्ठ रंगकर्मी शंकर घाणेकर

शारदा, सौभद्र, मृच्छकटिक, एकच प्याला, प्रेमसंन्यास, बेबंदशाही, गारंबीचा बापू, लग्नाची बेडी, वेड्यांचा बाजार, रुक्मिणीहरण अशा अनेक एकूण १०० नाटकात घाणेकरांनी भूमिका केल्या आहेत. आचार्य अत्रेंचा पहिला राष्ट्रपती पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘श्यामची आई’ या चित्रपटात मध्येही शंकर घाणेकरांनी काम केले आहे. अशा या नटवर्यला जेष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे यांनी ‘विनोदवीर’ म्हणून गौरविले होते. […]

1 107 108 109 110 111 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..