नवीन लेखन...
Avatar
About डॉ.संतोष सेलूकर
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

माणसांसारखी मळताना दिसत नाहीत झाडं..!

झाड म्हणजे… पाखरांची वसाहत! झाडं म्हणजे हिरवळ! जीवन प्रसन्न करणारा निसर्गातील एक अविभाज्य घटक…! रेल्वेत बसल्यावर झाडं पळताना दिसतात… मुलांसोबत खेळताना दिसतात… माणसांसोबत जळतांना दिसतात जसे वळविले तसे वळतानाही दिसतात…झाडं! पानांसोबत गळतांना दिसतात कधी झाडं.. सर्वांसोबत रुळताना दिसतात झाडं पण माणसांसारखी मळतांना दिसत नाही कधीच झाडं …पण माणसांसारखी मळतांना दिसत नाहीत कधी झाडं…..!! […]

शाळा हेच आमचे समाज माध्यम..

तेंव्हा शिक्षकाजवळ छडी असायचीच आज जसं मोबाईल असतो तशी.. त्या छडीमुळेच तर व्हायरल व्हायचे आमचे पराक्रम.. त्या छडीचीच फ्रेन्ड रिक्वेस्ट यायची आमच्या पाठीवर.. मग काय.. त्यात वेगवेगळे राग, आलाप, ताना घेऊन सुरु व्हायचे संगीत.. थोडी धूसफूस.. हे आमचं फेसबुक.. बुकात फेस लपवून फुंदत-फुंदत रहायचं कितीतरी वेळ.. थोड्या वेळात सारं विसरलं जायचं… आजही हे आठवलं की हसू आवरता येत नाही. सगळं आमच्या सोशल मिडिया मध्ये लोकप्रिय होतं.. कारण शाळा हेच आमचं समाज माध्यम होतं.. प्रभावी !!! […]

मजेमजेचे खेळ

आज हे खेळ राहिले नाहीत. . . कुठेच. मुलांच्या बालपणातही दडपणाने शिरकाव केलेला आहे. टिव्ही, मोबाईल, गेम याकडे आकर्षित झाली आहेत मुले. खूप हुशार असलेली ही पिढी मात्र प्रचंड तणावाखाली दिसत आहे. यांना भरकटत जाण्या अगोदर त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला समृद्ध करण्यासाठी जाणीव पूर्वक भयमुक्त वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे. . . […]

आरोग्य व्यवस्थेचा हुsर्रेव

ही गोष्ट फार जुनी असून पूर्ण आठवत ही नाही तशी. पण जे मनात ठसतं ते मात्र आपण कधीच विसरु शकत नाही. वर्षानुवर्षे ते तसंच दिसतं डोळ्यासमोर. आपल्या बालपणीच्या आठवणीत रमायला सर्वांनाच आवडतं. कित्येक माणसं आपलं बालपण वारंवार आठवत आठवत च जगत असतात. इतरांना ते सांगत असतात. ते सांगताना व आठवताना खूप गंमत वाटते. […]

बाकावरचे दिवस

पूर्वी आमच्या गावात एक डॉक्टर यायचे महिण्या पंधरा दिवसातून एकवेळा. त्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आमच्या शाळेचा व्हरांडाच. तिथंच पेशंट यायचे तपासून घ्यायचे. आम्ही निरीक्षण करायचो. एकदा डॉक्टर ते त्यांचे साहित्य तिथेच सोडून थोडे कुठे तरी गावात गेले होते. आम्हाला त्या साहित्याचे खूप कुतूहल होते. आम्ही चार-पाच मुले तिथे आलो आणि व्हरांडयातील एक एक सहित्य हाताळून पाहू लागलो. कधीच न हाताळलेले ते साहित्य हातात घेऊन एकमेकांना दाखवून मजा घेत होतो बिनधास्तपणे. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..