नवीन लेखन...
निनाद प्रधान
About निनाद प्रधान
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

कचरा : मोबाईल आणि संगणकाचा !

संगणकाचा जमाना जुना होऊन आता मोबाईलचा जमाना आलाय. सहाजिकच आहे. हातात आणि खिशात मावणार्‍या मोबाईलवरुन संगणकाची सगळी कामं होऊ लागली तर संगणक हवाय कशाला? बरं पुन्हा आपली क्रयशक्ती म्हणजेच खर्च करण्याची कुवत वाढल्यामुळे भारतीयांमध्येही आता “वापरा आणि फेकून द्या” ही वृत्ती रुजायला लागलेय. दर महिन्याला मोबाईलच्या नवनव्या मॉडेलच्या जाहिरातींनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. “ए” पासुन […]

गुगल की गो.. गोला

काही शब्द असे असतात की जे उच्चारताच हमखास कशाची तरी आठवण येते. काही ब्रॅंडस आपल्या डोक्यात इतके फिट्ट बसलेले असतात की त्यांच्या लोगोची अक्षरं जरी दिसली तरीही आपण पुढचं न वाचता त्या वस्तूची खरेदी करतो. यामुळेच बाजारात अनेक नामांकित ब्रॅंडसच्या वस्तूंच्या नकली मालाची मोठी बाजारपेठ तयार झालेय. कधीकधी अक्षरांची फिरवाफिरव तर कधी स्पेलिंगमधला बदल… नकली माल […]

धोतरपुराण…

काही वर्षापूर्वी दुबईच्या मेट्रोत एका भारतीयाला प्रवासासाठी एका धक्कादायक कारणासाठी प्रवेश नाकारला गेला. त्याने धोतर घातले होते. हा माणूस पहिल्यांदा दुबईत धोतराने फिरत नव्हता. यापूर्वीही त्याने दुबईत धोतर नेसून प्रवास केला होता. स्वातंत्र्य आंदोलनात भारतीय रेल्वेच्या एका डब्यातून आखूड धोतर घातलेले “बापू” एका स्थानकावर उतरत असल्याचे आपल्या परिचयाचे आहे. हे चित्र डोळ्यांसमोर उभे करा आणि दुबईच्या […]

आणि मी बरंच काही विसरलो !

माझ्या घरी टीव्ही आला.. आणि मी पुस्तकं वाचायचं विसरलो ! माझ्याकडे गाडी आली.. आणि मी चालायचं विसरलो ! माझ्याकडे एअरकंडिशनर आला.. आणि मी झाडाखाली बसून गार हवा खायचं विसरलो ! मी शहरात रहायला आलो.. आणि गावाकडच्या चिखल-मातीला विसरलो ! माझ्याकडे क्रेडिट – डेबिट कार्ड आलं.. आणि मी पैशाची किंमत विसरलो ! माझ्याकडे परफ्यूम आला.. आणि मी […]

ठाण्याचे टांगे

सत्तरच्या दशकात ठाणे शहरातली पॉईंट-टू-पॉईंट वाहतूक टांग्यानेच होत असे. रिक्षा फारच नंतर आल्या. टांगे एक घोड्याने ओढण्याचे असायचे तसेच दोन घोड्यांनी ओढायचे देखील असायचे. टॉक-टॉक..टॉक-टॉक.. असा लयदार आवाज काढत हे टांगे गावातून फिरायचे. वाहतूकीची कितीही आधुनिक साधने आली तरी ठाण्याच्या टांग्याचा तो प्रवास कायमचा आठवणीत राहील. […]

राष्ट्रीय भूमापन दिन

भारतातील जमिनींची मोजणी १० एप्रिल १८०२ रोजी  सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले? त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. […]

काळानुसार बदललेले ठाणे

मला कोणी विचारले की तुझे मुळ गाव कोणते तर सहजपणे माझ्या तोंडातून ठाण्याचेच नाव येते. खरंतर प्रधान कुटुंबीय मूळचे कोकणातले. मात्र आता कोकणात काहीही राहिले नाही. वाडवडिलांनी काही पिढ्यांपूर्वीच कोकण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आपले बस्तान बसवले. त्याचप्रमाणे माझ्याही कुटुंवाचे कोकणातून ठाण्याला स्थलांतर झाले मात्र तेही व्हाया गुजरात. माझा जन्म मुंबईतला. अगदी दादरच्या शिवाजी पार्कचा, कारण आजोळ […]

राजभाषेचे दिवस

गेले काही दिवस रस्त्यारस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावलेली मोठमोठी होर्डिंग बघतो आहे. गुढीपाडव्याचा मनसेचा मेळावा शिवाजी पार्कला होणार आहे आणि त्याचं आमंत्रण देणार्‍या या होर्डिंग्सवर राजभाषेची आठवण करुन दिलेली आहे. लवकरच महाराष्ट्र दिवस येत आहे. मोठा गाजावाजा करत तो साजरा होईल. दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी जागतिक मराठी दिवस पाळला जातो. तोसुद्धा थाटामाटात पार पडतो. कार्यक्रम होतात, […]

आमची माती आमची माणसं

भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्लीत १९५८ साली सुरू झाले. त्यानंतर २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईत दूरदर्शन केंद्र सुरू झाले. नंतरच्या काळात आशियाई क्रिडा स्पर्धांच्या वेळी भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. तेव्हा अगदी मोजकीच चॅनेल असायची आणि कार्यक्रमसुद्धा अत्यंत दर्जेदार असायचे. या दर्जेदार कार्यक्रमातलाच एक कार्यक्रम म्हणजे शेतकरी बंधूंसाठी असलेला ‘आमची माती- आमची माणसं’ ! खरंतर पहिले […]

छत्रपती शिवरायांचे पुतळे जगात सर्वात जास्त

सर्व मराठी माणसांची आणि भारतीयांचीही मान उंचावेल अशी आश्चर्यचकीत करणारी एक बातमी नुकतीच वाचली. बातमीची सत्यासत्यतता तपासता येणं कठीण आहे. पण ही संख्या जर खरी असेल तर…… महापुरुषांचे पुतळे ही काही फक्त भारतीयांची मक्तेदारी नाही. जगातील अनेक शहरांमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र जगात सर्वात जास्त पुतळे कोणाचे असतील बरे? जगात सर्वात जास्त पुतळे आहेत छत्रपती […]

1 2 3 4 5 6 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..