दिवाळीचा फराळ आणि आपले आरोग्य!!

लाडू, चिवडा, शेव, करंज्या, शंकरपाळे, अनारसे…..वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या पदार्थांची यादी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर चॉकलेटस् चे डबेसुद्धा. दिवाळी आली म्हणजे आठवडा- पंधरा दिवसांत हे सगळे पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच निराळी. अशा माहौलात वजनावर नियंत्रण कसे ठेवावे  याकरता पाच सोप्या टिप्स. १. […]

परदेशी खाद्यपदार्थ वाईट असतात का?

ब्रेड, नुडल्स, पास्ता इत्यादि गोष्टी आरोग्यास अपायकारक आहेत असे म्हणणे असेल तर परदेशातील लोक अशाच गोष्टी खाऊनही निरोगी कसे असतात?’ अशा काहीशा आशयाचा प्रश्न काल-परवा विचारला गेला. खरं तर यावर त्या त्या देशातील खाद्यसंस्कृती आणि पदार्थ यांवर सविस्तरपणे एखादे पुस्तक लिहिता येईल इतका मोठा विषय आहे. तरी यावरील स्पष्टीकरण थोड्क्यात देतो. १. वरील पदार्थ वाईट आहेत […]

पालेभाज्यांचा बागुलबुवा!!

आजकाल जिथे तिथे ‘Green leafy vegetables’ चा बोलबाला ऐकू येतो. कित्येक आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर्सदेखील नियमितपणे पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. इतक्या प्रमाणात पालेभाज्या खाण्याची सवय आपल्याकडे पूर्वीपासून होती का? या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी नकारार्थीच मिळते. मग आताच हा गवगवा का? याचे उत्तर नेहमीप्रमाणेच दडलेले आहे ते परदेशी संशोधनांत! Green leafy vegetables नियमितपणे आहारात घेतल्याने आतड्यांचा कर्करोग होण्याचा […]

दिवाळीचा फराळ आणि वाढते वजन!

लाडू, चिवडा, शेव, करंज्या, शंकरपाळे, अनारसे…..वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या पदार्थांची यादी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर चॉकलेटस् चे डबेसुद्धा. दिवाळी आली म्हणजे आठवडा- पंधरा दिवसांत हे सगळे पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच निराळी. अशा माहौलात वजनावर नियंत्रण कसे ठेवावे  याकरता पाच सोप्या टिप्स. १. […]

पिशवीबंद दूध आणि आपले आरोग्य

या विषयावर लिहा अशी सातत्याने विचारणा होत असल्याने मुद्दाम लिहितोय. आपल्या घरी येणारे दूध हे बहुतांशी एखाद्या विशिष्ट ब्रँडचे पिशवीबंद दूध असते. थोडक्यात; होमोजिनाईस्ड आणि पाश्चरायस्ड असे हे दूध असते. यातील पाश्चरायझेशन म्हणजे उच्च तापमानावर दूध तापवणे; जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया मरतील आणि दूध अधिक काळ टिकेल. सध्या याकरता बहुतांशी अल्ट्रा-पाश्चरायझेशन ही पद्धत वापरली जाते. यात २८०° […]

दिवाळी आणि आरोग्य – वसुबारस

आज वसुबारस…….. आपल्या या कृषिप्रधान देशातील गोवंशाचे महत्व जितके निर्विवाद आहे तितकेच आयुर्वेदातही गोवंशास व त्यातही गायींस अनन्यसाधारण महत्व दिले आहे. ज्या-ज्या ठिकाणी दूध वा तूप कोणत्या प्राण्याचे वापरावे याचा निर्देश नसेल तिथे ते गायीचेच समजावे असे आयुर्वेद सांगतो! गायीला आपण मातेसमान मानतो; इतकेच नव्हे तर तिला आपण ३३ कोटी देवांचे स्थानही मानतो..(येथे कोटी हा शब्द संख्यादर्शक […]

जागर स्त्री आरोग्याचा

‘भारतीय संस्कृती आणि स्त्रिया’ असा विषय चर्चेला आला की स्वाभाविकपणे सतीप्रथा, विधवा पुनर्विवाह बंदी इथपासून ते शिक्षणाचा अभाव आणि ‘चूल आणि मूल’ इतकेच बंदिस्त आयुष्य अशा गोष्टी हमखास वाचायला, ऐकायला मिळतात. मात्र प्रत्यक्षात तसेच आहे का? याचा पूर्वग्रहरहित विचार तथाकथित बुद्धिवादी लोक मुळीच करत नाहीत. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी ते अगदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माँसाहेब, महाराणी […]

पुतनामावशी – एक दंतकथा?

श्रीकृष्णकथेत वर्णन केलेली ही पूतना खरंच कोणी राक्षसी होती की पूतना ग्रहाच्या वर्णनाचा विपर्यास होत ही दंतकथा तयार झाली?! दंतकथा तयार होण्यास फार काळ लागत नसतो. जिथे स्वामी विवेकानंद वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांसंबंधी दंतकथा निर्माण होतात तिथे प्रत्यक्ष भगवंतांचीही काय कथा?! मात्र एका परीने आयुर्वेद हा भारतीय मनात किती रुजला आहे याची ही साक्षच नव्हे का?! […]

1 4 5 6 7